शहरं
Join us  
Trending Stories
1
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
2
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
3
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
4
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
5
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
6
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
7
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
8
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
9
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
10
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
11
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
12
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
13
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
14
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
15
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
16
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
17
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
18
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
19
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
20
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
Daily Top 2Weekly Top 5

शाळाबाहेरची पोरं हुडकणार; शिक्षणाच्या प्रवाहात आणणार

By जितेंद्र दखने | Updated: June 28, 2024 21:10 IST

जिल्ह्यात ५ जुलैपासून शाळाबाह्य विद्यार्थ्यांचे सर्वेक्षण

जितेंद्र दखणे, अमरावती : राज्यातील विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी दरवर्षी शिक्षण विभागाकडून शाळाबाह्य विद्यार्थ्यांचे सर्वेक्षण करण्यात येते. तसेच सापडलेल्या शाळाबाह्य विद्यार्थ्यांना शिक्षण देण्याचा प्रयत्न केला जातो. यंदाही प्राथमिक शिक्षण संचालकांच्या निर्देशानुसार जिल्ह्यात शाळाबाह्य विद्यार्थ्यांचे ५ ते २० जुलै यादरम्यान सर्वेक्षण केले जाणार आहे. याच अनुषंगाने शुक्रवार, २८ जून रोजी निवासी उपजिल्हाधिकारी अनिल भटकर यांच्या अध्यक्षतेखाली नियोजन बैठक पार पडली. यावेळी शिक्षणाधिकारी, महिला व बालकल्याण विभागाचे अधिकारी व अन्य संबंधित विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

जिल्ह्यासह राज्यात विविध कारणांमुळे बालके शाळाबाह्य होत असतात. तसेच विविध प्रकारच्या कामानिमित्त कामगारांचे वेगवेगळ्या ठिकाणी स्थलांतर होत असते. अशा शाळाबाह्य होणाऱ्या व स्थलांतरित होणाऱ्या कामगारांच्या बालकांना शोधून त्यांना शिक्षणाच्या प्रवाहात दाखल करून शिक्षण अबाधित राखण्यासाठी प्राथमिक शिक्षण संचालनालयाने पाच ते २० जुलै यादरम्यान सर्वेक्षण राबविण्याचे निश्चित केले आहे. शाळाबाह्य विद्यार्थ्यांचे सर्वेक्षण हे महत्त्वपूर्ण सामाजिक काम केवळ शासनाच्या एकाच विभागाकडून पूर्णत्वास नेणे अशक्यप्राय आहे. त्यामुळे यात शासनाच्या संबंधित सर्व विभागांचा सहभागही तेवढाच महत्त्वाचा असल्याने सर्व विभागांनी एकजुटीने काम करणे गरजेचे आहे. यामध्ये प्रामुख्याने महसूल, ग्रामविकास, नगर विकास, सामाजिक न्याय व विशेष साहाय्य विभाग, महिला व बालविकास विभाग, दिव्यांग कल्याण आयुक्तालय, साखर आयुक्तालय, कामगार विभाग, आदिवासी विकास विभाग, अल्पसंख्याक विकास विभाग आणि सार्वजनिक आरोग्य व गृह विभाग या विभागांचा सहभाग आवश्यक आहे. त्याअनुषंगानेच शाळाबाह्य मुलांच्या शोध मोहिमेसाठी वरिष्ठांच्या मार्गदर्शनानुसार शिक्षण विभागाने नियोजन केले आहे.

या ठिकाणी राबविणार शोधमोहीम

जिल्ह्यात ५ ते २० जुलै यादरम्यान शाळाबाह्य अनियमित व स्थलांतरित बालकांच्या नोंदी घरोघरी जाऊन घेतल्या जाणार आहेत. याशिवाय बसस्थानक, रेल्वेस्थानक, सिग्नलस, हॉटेल, खानावळ, सार्वजनिक ठिकाणे, बाजार तळ, वीटभट्ट्या व अन्य महत्त्वाच्या ठिकाणी शाळाबाह्य व अनियमित तसेच स्थलांतरित मुलांची शोधमोहीम राबविली जाणार आहे.येत्या ५ ते २० जुलै यादरम्यान शाळाबाह्य मुलांच्या सर्वेक्षणासाठी शोधमोहीम राबविली जाणार आहे. या अनुषंगाने वरिष्ठांच्या मार्गदर्शनात शिक्षण विभागामार्फत नियोजन केले आहे. - बुध्दभुषण सोनवने, शिक्षणाधिकारी प्राथमिक

टॅग्स :Schoolशाळा