शहरं
Join us  
Trending Stories
1
मस्साजोग सरपंचपदाची पोटनिवडणूक बिनविरोध होणार? संतोष देशमुखांच्या पत्नी उमेदवारी अर्ज भरणार
2
पाकिस्तान खोटारडा निघाला...! सीजफायरच्या नावाखाली इराणचा गेम? की अमेरिकेनं मोडला करार...? लेबनानवरून नवा वाद
3
इराणनं विश्वासघात केला तर, सर्वनाश अटळ! ट्रम्प यांचा इशारा, होर्मुजजवळ अजूनही युद्धनौका तैनात
4
Top Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीची निवडणूक बिनविरोध करावी; शरद पवारांचा सल्ला
5
स्मृती मानधना आणि पलाश मुच्छल यांच्यातील दुरावा मिटला? कुटुंबातील सदस्यांचा एकत्रित फोटो व्हायरल
6
“इराणच्या १० कलमी प्रस्तावाला ट्रम्प यांनी दाखवली केराची टोपली”; व्हाइट हाऊसने सगळे सांगितले
7
"पाकिस्तान विश्वासार्ह नाही!" इस्रायली राजदूताचा अमेरिकेला घरचा आहेर; जेडी व्हॅन्स यांच्या पाकिस्तान दौऱ्यापूर्वीच खळबळ
8
Numerology: नशिबाची साथ हवीय? मग महत्त्वाच्या कामाला जाताना आपल्या जन्मतारखेनुसार वापरा 'हा' खास रंग!
9
पाकिस्तानचा पोपट झाला, युद्धविरामाच्या अटींबाबत शाहबाज शरीफ यांचा दावा जेडी वेन्स यांनी फेटाळला
10
Gold Silver Price Today: बाजार उघडताच सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण; Silver ₹४,७०० नं स्वस्त, Gold चे दर काय?
11
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
12
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
13
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
14
Post Office च्या 'या' स्कीममध्ये व्याजाद्वारेच मिळतील ४.४० लाख; ३०० रुपयांच्या बचतीतून तयार होईल १५ लाखांचा फंड
15
Share Market: शेअर बाजारात घसरण: सेन्सेक्स ५०० हून अधिक अंकांनी घसरला, निफ्टी २३,९०० च्या खाली
16
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
17
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
18
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
19
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
20
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
Daily Top 2Weekly Top 5

अमरावतीत मासिक पाळीसंदर्भात विद्यार्थिनींमध्ये जनजागृती, मार्गदर्शन वर्गाचं आयोजन

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 16, 2017 16:12 IST

 मुली मोठ्या होत असताना त्यांना अनेक समस्यांचा सामना करावा लागतो. विशेषत: मासिक पाळीच्या दिवसांत मुली लाजेपोटी चार दिवस शाळेत येत नाहीत. त्यामुळे त्यांचे शैक्षणिक नुकसान होते.

अमरावती-  मुली मोठ्या होत असताना त्यांना अनेक समस्यांचा सामना करावा लागतो. विशेषत: मासिक पाळीच्या दिवसांत मुली लाजेपोटी चार दिवस शाळेत येत नाहीत. त्यामुळे त्यांचे शैक्षणिक नुकसान होते. तसेच आपल्या बाह्य अवयवात होणारा बदल पाहून घाबरून न जाता मनात येणाऱ्या प्रश्नांचे उत्तर आपल्या आईला, बहिणीला किंवा आपल्या शिक्षिकेंना विचारावे. मासिक पाळी येणे ही स्त्रीत्वाची निशाणी आहे. ती नैसर्गिक गोष्ट आहे, असे प्रतिपादन मुख्याध्यापिका ज्योत्स्ना शेटे यांनी केले. 

भातकुली पंचायत समितीच्या पूर्व माध्यमिक शाळा दाढी येथे विद्यार्थिनींसाठी ‘मासिक पाळीत घ्यावयाची काळजी’ यावर उद्बोधन वर्ग घेण्यात आला. यावेळी शाळेच्या मुख्याध्यापिका मार्गदर्शन करीत होत्या. ज्योत्स्ना शेटे म्हणाल्या, मुलींचा जन्म फक्त चूल व मूल यापुरताच मर्यादित नाही. तुम्हाला खूप शिकून आपल्या पायावर उभे राहायचे आहे. तेव्हा शारीरिक मजबुतीसोबत मानसिक ताकद किती आवश्यक आहे, तेही समजावून घेतले पाहिजे. स्वत:चे रक्षण वाईट प्रवृत्तीपासून कसे करावे, याबद्दलही ज्योत्स्ना शेटे यांनी माहिती दिली. याप्रसंगी शाळेच्या शिक्षिका ज्योती गायकी, पुष्पलता वसुकर, सुरेखा अटाळकर यांनी मुलींनी कोणती काळजी घ्यायला पाहिजे ते समजावून सांगितले. उपस्थितांचे आभार ज्योती गायकी यांनी मानले.

शिक्षिका म्हणाल्या, आम्ही तुमच्या मैत्रिणीच यावेळी मुलींना सॅनेटरी नॅपकीनचे वाटप करून त्याचा वापर कसा केला पाहिजे, ते समजावून सांगितले. ज्योती गायकी, अटाळकर यांनी शारीरिक व मानसिक बदल याची माहिती चर्चेद्वारे समाजवून दिली. आम्ही तुमच्या मैत्रिणी आहोत, असे शिक्षिकांनी सांगताच मुलींना आनंद झाला. अन् अनेक समस्यांची माहिती जाणून घेतली. त्यांच्या सर्व समस्यांचे निराकरण करण्यात आले. यामुळे मुलींच्या मनावर असलेले दडपण कमी झाल्याचे समाधान झळकत होते.