शहरं
Join us  
Trending Stories
1
हीच ती वेळ! अचूक टप्प्यावर 'करेक्ट कार्यक्रम' करत इंग्लंडचा 'बालेकिल्ला' जिंकण्याची संधी
2
12 देशांवर पडणार डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफचा हातोडा, स्वाक्षरीही झाली! म्हणाले...
3
गिल है की मानता नहीं...; 'द्विशतकी' खेळीनंतर 'शतकी' डाव, इंग्लंडवर आणखी एक 'घाव'
4
"भाजपची दुसऱ्यांदा माघार, केंद्राकडे राज यांच्या प्रश्नांची उत्तरे नाहीत"; स्टॅलिन यांचा ठाकरेंना पाठिंबा
5
Unplayable Delivery! आकाश दीपसमोर जो रुट चारीमुंड्याचित! विजयातील मोठा अडथळा दूर (VIDEO)
6
VIDEO: प्रचंड गर्दी तरीही वारकऱ्यांनी दाखवली शिस्त! रुग्णवाहिकेसाठी क्षणात मोकळी करून दिली वाट
7
ENG vs IND :आता यजमान इंग्लंडची खैर नाही! टीम इंडियानं 'बॅझबॉल'वाल्यांसमोर सेट केलं मोठं टार्गेट
8
Neeraj Chopra Wins Gold NC Classic 2025: घरच्या मैदानातील पहिली स्पर्धा! 'गोल्ड'सह इथंही नीरज चोप्राची हवा
9
"त्यासाठी मनगटात जोर लागतो, नुसत्या तोंडाच्या वाफा..."; एकनाथ शिंदे यांचा राज-उद्धव मेळाव्याला टोला
10
Video: "डाव घोषित करतोस का? उद्या पाऊस पडणार आहे"; हॅरी ब्रुकच्या प्रश्नाला गिलचे मजेशीर उत्तर
11
"मुंबईला नवा चेहरा दिल्याने उद्धव ठाकरेंचा जळफळाट"; CM फडणवीस म्हणाले, "एकमेकांशी भांडूनच ते…"
12
"ठाकरे ब्रँड असता, तर बाळासाहेब असतानाच २८८ आमदार असते"; शिंदेंच्या आमदाराचे धक्कादायक विधान
13
सर्वात जलद सेंच्युरी! १४ वर्षीय वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास; मोडला पाक फलंदाजाचा रेकॉर्ड
14
Photo: आजच दुकान गाठलं पाहिजे, बजाजची नवीन स्पोर्ट्स बाईक पाहून तुम्हीही हेच म्हणाल!
15
Viral Video: रेल्वे स्टेशन आहे की हायवे? प्लॅटफॉर्मवरून गाड्यांना धावताना पाहून प्रवाशी शॉक!
16
PHOTOS: जसप्रीत बुमराहच्या बाजूला बसून हळूच हसणारी 'ती' तरूणी कोण? जाणून घ्या तिच्याबद्दल...
17
COVID19: महाराष्ट्रावरचं कोरोना संकट आणखी गडद, आज १२ नव्या रुणांची नोंद, २४ तासात एकाचा मृत्यू
18
उद्धव-राज ठाकरेंसंदर्भात रामदास आठवले यांची मोठी भाविष्यवाणी, म्हणाले, 'आमच्या महायुतीला...!'
19
जयजयकार...मराठी शक्तीचा, 'ठाकरे ब्रँड'वरील भक्तीचा! उद्धव-राज एकत्र येतात तेव्हा...
20
आशा आहे, मी आणखी 30-40 वर्षे जगेन आणि...; दलाई लामांकडून उत्तराधिकारी वादाला पूर्णविराम

जिल्ह्यातील कला, क्रीडा शिक्षक एकवटले

By admin | Updated: October 20, 2015 00:27 IST

उच्च न्यायालयाने शालेयस्तरावर कला, क्रीडा अध्यापनासाठी कायमस्वरूपी शिक्षकांची आवश्यकता असून शासनाने या शिक्षकांची पदे निर्माण करावी, असा महत्वपूर्ण निर्णय दिला.

शिक्षण विभागाच्या निर्णयाचा निषेध : जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देऊन न्याय देण्याची मागणी अमरावती : उच्च न्यायालयाने शालेयस्तरावर कला, क्रीडा अध्यापनासाठी कायमस्वरूपी शिक्षकांची आवश्यकता असून शासनाने या शिक्षकांची पदे निर्माण करावी, असा महत्वपूर्ण निर्णय दिला. शिक्षण विभागाने मात्र शासनाच्या तिजोरीवरील आर्थिक भार कमी करण्याकरिता कला व क्रीडा शिक्षकांच्या कायम पदभरतीच्या निर्णयाला बगल दिली. या निर्णयाविरूध्द जिल्ह्यातील कला व क्रीडा शिक्षक एकवटले आहेत. या शासन निर्णयामुळे राज्यातील ए. टी. डी., बी. पी. एड. पदवीधारण केलेल्या लाखो बेरोजगार तरूणांना याचा फटका बसणार आहे. या निर्णयामुळे राज्यातील कला, क्रीडा प्रेमी व शिक्षक यांचेमध्ये तीव्र असंतोष निर्माण झाला असून या अन्यायकारक शासन निर्णयाविरूद्ध जिल्ह्यातील कला व क्रीडा शिक्षक एकत्र येवून दि. ७ आॅक्टोबर २०१५ चा शासन निर्णय त्वरीत रद्द करून शालेय स्तरावर कला, क्रीडा शिक्षकांची उच्च न्यायालयाचे निर्देशान्वये कायम पदे भरण्याकरिता त्वरीत नवीन शासन निर्णय निर्गमीत करून सकारात्मक निर्णय घेण्याची विनंती विदर्भ कला शिक्षक संघ व शारिरीक शिक्षक संघटनेच्या संयुक्त निवेदनामधून निवासी उपजिल्हाधिकारी मोहन पातुरकर यांचेमार्फत शासनाच्या शालेय शिक्षण प्रधान सचिवांना केली आहे. या निवेदनावर शासनाने त्वरीत सकारात्मक निर्णय न घेतल्यास राज्यभर या निर्णयाविरुद्ध शिक्षकांचे आंदोलनाद्वारे उग्ररुप धारण केल्यास याची सर्वस्वी जबाबदारी शासनाची राहील असा इशाराही विदर्भ कला शिक्षक संघ व शारिरीक शिक्षक संघाचे पदाधिकाऱ्यांनी दिला आहे. निवेदन देतेवेळी विदर्भ कला शिक्षक संघाचे व शारिरीक शिक्षक संघटनेचे विनोद इंगोले, गणेश भुतडा, एस. आर. पाटील, अनिल लांडे, विलास सिरसाठ, संजय धाकुलकर, आशीष देशमुख, राजेश ढिगवार, संजय श्रीखंडे, हरिविजय कळमखेडे, वैभव काळे, तेजस काळे, किशोर जिरापुरे, शत्रुघ्न टाकसाये, संदीप राऊत, चेतन राठोड, नितीन चव्हाळे, संदीप इंगोले, संदेश गिरी, संतोष अरोरा, अजय आळशी, विजय मानकर, हफीज खान, अब्दुल नईम, मेहंदी अली, दिनेश देशमुख, नुरुद्दीन, आकाश भोयर, कमीर जमील अहमद, वकील अहमद काजी, साजीद खाँ आदी उपस्थित होते. (प्रतिनिधी)