शहरं
Join us  
Trending Stories
1
विमान अपघातात सापडलेली भगवदगीता, कृष्ण मूर्ती कोणाची? एअर इंडियाची क्रू मेंबर असलेल्या पनवेलच्या लेकीची...
2
इराणच्या आकाशात इस्रायलची विमाने, गॅस रिफायनरीवर हल्ला; डिफेंस सिस्टीम उध्वस्त
3
आयुष्यात कधीच विमानात बसणार नाही; व्हिडीओ रेकॉर्ड करणाऱ्या आर्यनने घेतली धास्ती, पोलीस चौकशीनंतर...
4
अमेरिकेत मोठी घटना! दोन खासदारांवर घरात घुसून गोळीबार; महिला खासदार, पतीचा मृत्यू
5
नीट-यूजीचा निकाल जाहीर! राजस्थानचा महेश कुमार पहिला, तर महाराष्ट्राचा कृष्णांग जोशी तिसरा
6
एअर इंडियाकडून मदत जाहीर, मृतांच्या नातेवाईकांना २५ लाखांची मदत देणार; टाटा सन्सचेही १ कोटी मिळणार...
7
दुबईतील ६७ मजली गगनचुंबी इमारतीला भीषण आग; ३,८२० रहिवाशांना बाहेर काढले
8
पहिल्या डावात झिरो, तोच फायनलचा हिरो! मार्करम हा शतकातील असा पहिला 'शतकवीर' ज्यानं...
9
उल्हासनगरला पावसाने झोडपले, नाल्यावरील पूल कोसळला 
10
टेम्बा बावुमाच्या कॅप्टन्सीला तोड नाही; आतापर्यंत एक टेस्ट नाही हारला! ऑस्ट्रेलिया तोंड पाडून घरला
11
Ahmedabad Plane Crash : "माणुसकी दाखवा, माझी मुलगी रुग्णालयात..."; विमान अपघातानंतर डॉक्टरची हात जोडून विनंती
12
राज-उद्धव ठाकरे एकत्र आले तर महापालिका निवडणुकीत ५४ टक्के मते मिळतील; सर्व्हे आल्याचा शिवसेना नेत्याचा दावा
13
बलात्कार करणाऱ्याला महिलेने घडवली जन्माची अद्दल; विळ्याने नराधमाचे गुप्तांगच कापले
14
लंच ब्रेक झाला म्हणून २० वर्षीय तरुणी घरी गेली; बेडरुममध्ये तिचा बॉस... 
15
SA Won WTC Final 2025 : 'चोकर्स'चा शिक्का पुसला, द. आफ्रिकेने इतिहास रचला; ऑस्ट्रेलियाला हरवून २७ वर्षांनी जिंकली ICC ट्रॉफी! मार्करमचे धमाकेदार शतक
16
Israel Rran War: 'हल्ले थांबवा नाहीतर तेहरानला आग लावू'; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इराणच्या खोमेनींना इशारा
17
आत्महत्येबाबत इन्स्टावर तरूणाने टाकली पोस्ट; १२ मिनिटांत पोलिसांनी फासावरून खाली उतरवला
18
WTC 2025 Final Prize Money : चांदीची गदा अन् IPL चॅम्पियन्स RCB पेक्षा अधिक रक्कम; दक्षिण आफ्रिकेसह कोणत्या संघाला किती बक्षीस मिळालं?
19
रोज विमाने उडतात, पण या विमानातून आवाजच येत नव्हता...; व्हिडीओ काढणाऱ्या तरुणाच्या काकीला वाटले...
20
इराण-इस्रायल युद्ध लांबलं तर 'या' महत्वाच्या वस्तू महागणार! जाणून घ्या, या देशांकडून काय-काय आयात करतो भारत?

विद्यार्थी सक्षमीकरणासाठी संस्थांची भूमिका महत्त्वाची

By admin | Updated: September 6, 2016 00:17 IST

विद्यापीठ व संलग्नित सर्व महाविद्यालयांचा विद्यार्थी हा केंद्रबिंदू असून त्याला जास्तीत-जास्त सुविधा कशा पुरविता येतील,...

 विद्यापीठात सभा : संस्थाध्यक्ष, सचिवांची उपस्थिती अमरावती : विद्यापीठ व संलग्नित सर्व महाविद्यालयांचा विद्यार्थी हा केंद्रबिंदू असून त्याला जास्तीत-जास्त सुविधा कशा पुरविता येतील, त्याचा सर्वांगीण सक्षम विकास कसा करता येईल, यासाठी संस्थांची भूमिका महत्त्वपूर्ण असल्याचे प्रतिपादन कुलगुरू मुरलीधर चांदेकर यांनी केले. के.जी. देशमुख सभागृहात आयोजित संलग्नित महाविद्यालयांचे संस्थाध्यक्ष, सचिवांची सहविचार सभा संपन्न झाली. याप्रसंगी मार्गदर्शन करताना ते बोलत होते. व्यासपीठावर विदर्भ संस्थाचालक संघाचे सचिव मोहन पावडे, कुलसचिव अजय देशमुख, बीसीयूडीचे संचालक राजेश जयपूरकर, वित्त व लेखाधिकारी शशीकांत आस्वले, परीक्षा नियंत्रक जे.डी.वडते, उपकुलसचिव अशोक चव्हाण, उपकुलसचिव मंगेश वरखेडे, प्रौढ व निरंतर शिक्षण विभागाचे संचालक श्रीकांत पाटील, विद्यार्थी कल्याण संचालक गणेश मालटे उपस्थित होते. विद्यार्थी केंद्रित विद्यापीठ करण्याचे अधोरेखित करून विद्यार्थ्यांसाठी अनेक योजना राबवावयाच्या आहेत. अशा सगळ्या योजनांची माहिती संस्थाध्यक्ष, सचिवांना व्हावी आणि त्यांच्या सूचनेतून व विचारातून विद्यार्थीहितार्थ योजना सक्षमपणे राबविता याव्यात, असा उद्देश असल्याचे कुलगुरूंनी स्पष्ट केले. राजेश जयपूरकर यांनी यावेळी फंडिंग एजन्सीच्या विविध योजनांची माहिती देऊन त्याचा अधिकाधिक लाभ महाविद्यालयांनी करून घ्यावा, असे आवाहन केले. कुलसचिव अजय देशमुख यांनी स्वागतपर व प्रास्ताविक भाषणातून सहविचार सभा आयोजनामागील भूमिका स्पष्ट केली. विदर्भ संस्थाध्यक्ष चालक संघाचे अध्यक्ष मोहन पावडे यांनी संस्थेला भेडसावणाऱ्या समस्या मांडल्यात. त्या सोडविण्यासाठी प्रयत्न करण्याबाबत विनंती केली. विद्यापीठाच्या विविध विभागांशी संबंधित योजना संदर्भातील माहितीचे सादरीकरण करून संस्थाध्यक्ष व सचिवांच्या अडचणींवर चर्चा करण्यात आली. प्रौढ, निरंतर व शिक्षण विभागाच्या योजना संचालक श्रीकांत पाटील यांनी, विकास विभागाचे उपकुलसचिव मंगेश वरखेडे यांनी, विद्यापीठ ग्रंथालय विषयक माहिती ग्रंथापल मोहन खेरडे यांनी, परीक्षे संदर्भात परीक्षा नियंत्रक जे.डी. वडते यांनी व महाविद्यालयीन विभागाची माहिती उपकुलसचिव अशोक चव्हाण यांनी दिली. संचालन व आभार प्रदर्शन जनसंपर्क अधिकारी विलास नांदुरकर यांनी केले. (प्रतिनिधी)