शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
4
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
5
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
6
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
7
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
8
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
9
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
10
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
11
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
12
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
13
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
14
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
15
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
16
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
17
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
18
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
19
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
20
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

समग्र शिक्षा अभियानाचे बँक खाते बदलविण्याचे आदेश; वारंवार खातेबदल, मुख्याध्यापकही त्रस्त

By जितेंद्र दखने | Updated: July 28, 2023 18:40 IST

जिल्हा परिषद शाळास्तरावर पीएफएमएस प्रणालीसाठी असलेले राष्ट्रीयीकृत बँकेतील खाते यापूर्वी बंद करण्याचे प्राथमिक शिक्षण परिषद बजावले होते.

अमरावती : जिल्हा परिषद शाळास्तरावर पीएफएमएस प्रणालीसाठी असलेले राष्ट्रीयीकृत बँकेतील खाते यापूर्वी बंद करण्याचे प्राथमिक शिक्षण परिषद बजावले होते. आता मात्र पुन्हा हे बँक खाते एचडीएफसी बँकेत तातडीने उघण्याबाबतचे आदेश २७ जुलै रोजी दिले आहेत. या संदर्भातील लेखी पत्र जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे धडकले आहे.

समग्र शिक्षा अभियानअंतर्गत शाळांना शाळा अनुदान व गणवेश अनुदान दरवर्षाला दिले जाते. समग्र शिक्षा अंतर्गत २०२२-२३ करीता प्रत्येक शाळेला १० हजार, १५ हजार आणि २० हजार पटसंख्येनुसार वर्षभर खर्च करण्यासाठी दिला जात होता. तो निधी महाराष्ट्र बँकेत शाळांच्या खात्यावर टाकण्यात येत होता. शिक्षक संचालकांनी शाळांचे खाते एचडीएफसी बँकेत काढण्याचे आदेश दिले. आणि महाराष्ट्र बँकेत जमा झालेले शाळा अनुदान व गणवेश अनुदान ३० सप्टेंबरला शासनाने परत घेऊन ते खाते झीरो केले. अशातच पीएफएमएस प्रणालीमुळे सर्व अडचणी येत असल्याने ही प्रणाली बंद करून जुनीच पद्धत सुरू करावी अशी मागणी शिक्षक संघटनांनी केली आहे. त्यामुळे आता पुन्हा समग्र शिक्षा अभियानचे शाळा खाते आता एचडीएफसी बँकेत काढण्याचे आदेश प्राथमिक शिक्षण संचालकांनी दिले आहे. याबाबतचे आदेश गुरुवार २७ जुलै रोजी झेडपीत धडकलेत. त्यानुसार प्राथमिक शिक्षणाधिकारी यांनी सर्व शाळांना आता पुन्हा एचडीएफसी बँकेत खाते काढण्याची लेखी सूचना २८ जुलै रोजी जिल्हाभरातील शाळांना दिल्या आहेत. एचडीएफसी या बँकेच्या शाखा ग्रामीण भागात नाही. शहरात किंवा काही तालुकास्तरावर आहेत. मग शाळांनी कोठे खाते काढावे हा प्रश्न निर्माण झाला आहे. जिल्हा परिषदेच्या शाळा ग्रामीण भागात आहे. यापूर्वी नॅशनल बँकेत असलेले सर्व शिक्षा अभियानाचे खाते बंद करून मागील वर्षी ते महाराष्ट्र बँकेत काढायला लावले. आता ते बंद करून एचडीएफसी बँकेत काढायला लावले आहेत. वारंवार खाते बदलामुळे मुख्याध्यापकांना मानसिक त्रास सहन करावा लागत असल्याची प्रतिक्रिया प्राथमिक शिक्षक समितीचे राज्य प्रतिनिधी राजेश सावरकर यांनी दिली. 

टॅग्स :Amravatiअमरावती