शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन उपराष्ट्रपती पदाची निवडणूक लढणार; भाजपाची घोषणा
2
योगींच्या गोटात खळबळ! १०० हून अधिक आमदारांचा पत्ता कट होण्याची शक्यता; सपाही टेन्शनमध्ये...
3
लग्नानंतर ४५ दिवसांत असं काय घडलं, २७ वर्ष युवकानं स्वत:ला संपवलं?; आईला केला होता शेवटचा कॉल
4
पावसाळ्यात बेडूक येतात तसं निवडणूक आल्यावर जरांगे बाहेर पडतात; भाजपा आमदाराची बोचरी टीका
5
न्यायालयात लेखी स्वरुपात देणार का? निवडणूक आयोगाच्या 'त्या' वक्तव्यावर काँग्रेसचा पलटवार
6
'आता तरी उठा' या पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी मौन सोडलं, म्हणाले, "हे माझं दुर्दैव..."
7
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
8
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
9
दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली
10
आई-पत्नी आणि मुलीसमोर तरुणावर तलवारीने हल्ला; एका व्हॉट्सअॅप फॉरवर्डमुळे गेला जीव
11
७ दिवसांत प्रतिज्ञापत्र द्या अन्यथा देशाची माफी मागा; निवडणूक आयोगाचं राहुल गांधींना चॅलेंज
12
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
13
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींना निवडणूक आयोगाचे उत्तर
14
आता अफगाणिस्तानही पाकिस्तानचे पाणी रोखणार; नद्यांवर धरणे बांधण्यास सुरुवात 
15
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन
16
यंदा दिवाळीला डबल बोनस मिळणार; पंतप्रधान नरेंद्र मोदींची मोठी घोषणा
17
एल्विश यादवच्या घरावरील गोळीबाराचा व्हिडीओ समोर, ते आले अन् धाड धाड गोळ्या झाडल्या!
18
चोरट्यांनी शोधला बँक खाती रिकामी करण्याचा नवा मार्ग; काय आहे 'व्हॉट्सअ‍ॅप स्क्रीन मिररिंग फ्रॉड'?
19
कार-बाईक खरेदी करायचीय? दिवाळीपर्यंत थांबा; GST दरात बदलाची शक्यता, स्वस्तात मस्त दर मिळतील
20
बाजारातून परदेशी गुंतवणूकदारांचा काढता पाय? १५ दिवसात २१ हजार कोटी काढले; कारण आलं समोर

ग्रामपंचायतींमध्ये घरपोच भाजीपाला विक्रीचे आदेश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 1, 2020 05:00 IST

सीईओ अमोल येडगे यांच्या आदेशानुसार ग्रामपंचायतींनी निश्चित केलेल्या झोननुसार भाजीपाला विक्रेते ठरवून देण्यात यावे, सदर विक्रेत्यांना ठरवून दिलेल्याच झोनमध्ये विक्री करता येईल. अन्य ठिकाणी नाही. ग्रामपंचायतींकडून भाजीविक्रेत्यांना ओळखपत्र द्यावे, तसेच प्रतिबंधात्मक नियमांचे पालन करणे बंधनकारक आहे.

ठळक मुद्देजिल्हा परिषद : तातडीने अंमलबजावणी करण्याचे बीडीओंना बजावले

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : लॉकडाऊनचे काळात नागरिकांना ताजी फळे व भाजीपाला घरपोच देण्याच्या दृष्टीने जिल्ह्यातील १०६ मोठ्या ग्रामपंचायतींमध्ये नागरिकांची भाजीपाला खरेदीसाठी गर्दी होऊ नये, याकरिता लोकसंख्येच्या प्रमाणात वार्ड, प्रभागनिहाय झोन निश्चित करावे. त्यानुसार झोननिहाय हातगाडीवर, छोट्या गाडीव्दारे अथवा घरपोच भाजी विक्रीसाठी विक्रेते ठरवून देण्याचे आदेश १४ पंचायत समितीचे गटविकास अधिकाऱ्यांना जिल्हा परिषद सीईओंनी गुरूवार, ३० एप्रिल रोजी दिले आहेत.सीईओ अमोल येडगे यांच्या आदेशानुसार ग्रामपंचायतींनी निश्चित केलेल्या झोननुसार भाजीपाला विक्रेते ठरवून देण्यात यावे, सदर विक्रेत्यांना ठरवून दिलेल्याच झोनमध्ये विक्री करता येईल. अन्य ठिकाणी नाही. ग्रामपंचायतींकडून भाजीविक्रेत्यांना ओळखपत्र द्यावे, तसेच प्रतिबंधात्मक नियमांचे पालन करणे बंधनकारक आहे. याबाबत स्वतंत्र नोंदवहीत नोंद घ्यावी, भाजीविक्रेत्यांचे नाव, मोबाईल क्रमांक झोन ग्रामपंचायत स्तरावर प्रसिद्ध करावे, याशिवाय जीवनावश्यक वस्तूंच्या खरेदीसाठी किराणा साहित्य, दूध, डेअरी व औषधालय आदी दुकानांमध्ये गर्दी टाळण्यासाठी संबंधितास सेवा घरपोच देण्यास प्रवृत्त करावे, गावातील ग्राहकांना घरपोच सेवा देण्यासाठी व्हॉट्सअ‍ॅप क्रमांक जाहीर करावा, त्याची प्रसिद्धी करून त्यावर वस्तूची मागणी करावी. यासाठी झोननिहाय दुकाने ठरवून द्यावीत, गावातील बँक, टपाल कार्यालयात व्यवहारासाठी ग्राहकांची गर्दी होते, ते टाळण्यासाठी बँक व पोस्ट आॅफिसने टोकन क्रमांक देण्यासाठी दूरध्वनी, मोबाईल क्रमांक प्रसिद्ध करावा, सदर दूरध्वनीवरू न टोकन पद्धत सुरू करावी व ग्राहकांना टोकन क्रमांकानुसार बँकेत येण्याची संभाव्य वेळ कळविण्यात यावी. परिणामी होणारी गर्दी टाळता येऊ शकते.याशिवाय शेजारील गावांतील नागरिक किराना व अन्य वस्तू खरेदीसाठी मोठ्या गावात आवागमन मर्यादित ठेवल्यास शेजारील गावातील एका व्यक्तीस मोठ्या गावात येता येईल याबाबत नियोजन करावे, अशा प्रकारच्या कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना कराव्यात, असे आदेश झेडपीचे सीईओ अमोल येडगे यांनी सर्व पंचायत समितींच्या गटविकास अधिकाऱ्यांना दिले आहेत.सूचनांचे पालन करा- सीईओकोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी कुठल्याही परिस्थितीत नागरिकांची गर्दी होऊ नये याकरिता आवश्यक त्या प्रतिबंधात्मक उपाययोजना कराव्यात. याशिवाय प्रत्येक गावात स्वच्छता, सामाजिक अंतराचे पालन, वारंवार हात धुणे, सॅनिटायझर मास्कचा वापर, नागरिकांना स्वत:च्या आरोग्याची काळजी घेण्याबाबत ग्रामपंचायतींनी वेळोवेळी जनजागृती करावी. दिलेल्या सूचनांचा सादर करण्याचे आदेश सीईओ अमोल येडगे यांनी दिले आहेत.

टॅग्स :vegetableभाज्याgram panchayatग्राम पंचायत