शहरं
Join us  
Trending Stories
1
'बीडच्या रेल्वेखाली जीवन संपविणारा मी पहिला असेल'; तरुणाचे मुख्यमंत्र्यांना पत्र, कारण काय?
2
टीम इंडियाला ज्या ज्या कंपन्यांनी स्पॉन्सर केले, त्यापैकी तीन कंपन्या बुडाल्या, बंद झाल्या...
3
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लांबणीवर; ३१ जानेवारी २०२६ पर्यंत मुदतवाढ, सुप्रीम कोर्टात काय घडलं?
4
भारतावर आणखी टॅरिफ लावण्याची धमकी अमेरिकेवरच उलटू शकते, जाणून घ्या का?
5
“देवाभाऊंच्या जाहिरातीला कोट्यवधी उधळले, तेच पैसे शेतकऱ्यांना दिले असते तर...”: उद्धव ठाकरे
6
गायीने कहरच केला... धावता-धावता उडी मारून थेट कौलावरच चढली, Video पाहून व्हाल थक्क
7
सोन्याच्या किंमतीनं रचला इतिहा, विक्रमी पातळीवर पोहोचला भाव; पटापट चेक करा सोन्या-चांदीचा लेटेस्ट रेट!
8
झोमॅटोने रचला नवा विक्रम! टाटा-अदानी समुहातील मोठ्या कंपन्यांनाही 'या' बाबतीत टाकलं मागे
9
Pitru Paksha 2025: पितृ पक्षात एखादी अंत्ययात्रा दिसणे शुभ की अशुभ? काय करावे उपाय? वाचा
10
"जे झालं ते अचानक अन् चुकून झालं"; BMW कार अपघातातील आरोपी मागतेय जामीन
11
अपोलो टायर्स प्रत्येक मॅचमागे ४.५ कोटी रुपये मोजणार; टीम इंडियाला नवा स्पॉन्सर मिळाला
12
इस्राइल-गाझाचं उदाहरण देत शाहिद आफ्रिदीने भारताविरोधात ओकली गरळ, मोदींबाबत म्हणाला... 
13
धोक्याची घंटा! कच्ची केळी बादलीत टाकली अन् १ मिनिटात पिकली; लोकांच्या जीवाशी खेळ?
14
दबंग सून... मध्यरात्री गुंडांना घेऊन सासरी आली आणि केला धडाधड गोळीबार, त्यानंतर...  
15
IND vs PAK: पाकिस्तान जय शाहला घाबरला; आधी 'बड्या बाता' केल्या, आता गपचूप बसला, काय घडलं?
16
स्विगीने खास पुणेकरांसाठी लाँच केले 'Toing' ॲप; केवळ ५० रुपयांत मिळणार भरपेट जेवण, काय आहे वैशिष्ट्ये?
17
३ वर्षात १ लाखाचे झाले १५ लाखांपेक्षा अधिक, ६ महिन्यांत १८०% नं वधारला स्टॉक
18
"हे विजयाचं परिमाण असू शकत नाही, भारताने...!"; भारत-पाकिस्तान सामन्यासंदर्भात काय म्हणाले ओवेसी?
19
Royal Enfield ने जारी केली यादी; Hunter, Classic, Meteor..; पाहा सर्व गाड्यांची नवी किंमत

शिवाजी शिक्षण संस्थेच्या पुनर्निवडणुकीचे आदेश

By admin | Updated: July 28, 2015 00:21 IST

श्री शिवाजी शिक्षण संस्थेच्या अध्यक्षांव्यतिरिक्त तीन उपाध्यक्ष, कोषाध्यक्ष आणि चार सदस्यांची निवड अवैध ...

सहधर्मदाय आयुक्तांचा निर्णय : आठ पदाधिकाऱ्यांची निवड अवैधलोकमत विशेष

अमरावती : श्री शिवाजी शिक्षण संस्थेच्या अध्यक्षांव्यतिरिक्त तीन उपाध्यक्ष, कोषाध्यक्ष आणि चार सदस्यांची निवड अवैध ठरवून आठ पदांसाठी २७ आॅक्टोबरच्या आत पुनर्निवडणूक घेण्याचा आदेश सहधर्मदाय आयुक्त ओ.पी.जयस्वाल यांनी सोमवारी दिला. या आदेशाने शिवपरिवारात खळबळ उडाली आहे. श्री शिवाजी शिक्षण संस्थेच्या ३१ मे २०१२ रोजी झालेल्या निवडणुकीसाठी हेमंत काळमेघ, प्रदीप महल्ले व संजय जगताप यांचे उमेदवारी अर्ज निवडणूक अधिकाऱ्यांनी अवैध ठरविले होते. ही मंडळी संस्थेचे प्रतिनिधी असण्याचे कारण त्यापोटी दर्शविण्यात आले होते. निवडणूक अधिकाऱ्यांच्या निर्णयाविरुद्ध अमरावती सहायक धर्मदाय आयुक्तांच्या न्यायालयात तिघांनीही एकत्रित याचिका दाखल केली. त्यावर २० मे रोजी निवडणूक रद्द ठरविणारा निकाल देण्यात आला. या निर्णयाला आव्हान देणाऱ्या दोन याचिका सहधर्मदाय आयुक्तांच्या न्यायालयात दाखल करण्यात आल्या. संस्थेच्यावतीने सचिव विनय भांंबुरकर यांनी तसेच निवडून आलेल्या आठ उमेदवारांनी दुसरी वैयक्तिक याचिका दाखल केली. या आठ जणांमध्ये अरुण शेळके, महादेवराव भुईभार, वसंतराव चर्जन, सुरेश ठाकरे, हरीभाऊ ठाकरे, जगन्नाथ वानखडे, नरेशचंद्र ठाकरे, गजानन पुंडकर यांचा समावेश होता. संस्थेचे नउवे सदस्य एम.के. नाना देशमुख हे याचिकाकर्त्यांमध्ये सहभागी नव्हते. या दोन्ही याचिकांवर सहधर्मदाय आयुक्तांनी सोमवारी हा निकाल घोषित केला. निर्णयानुसार, शिवाजी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष अरुण शेळके यांची निवड वैध ठरविण्यात आली. मात्र त्यांचे अधिकारी गोठविण्यात आलेत. तीन उपाध्यक्षांसह कोषाध्यक्ष व चार सदस्यांनी निवडणूक नियमबाह्य असल्याचे दिलेल्या आदेशात स्पष्ट केले. आदेश जारी झाल्यापासून तीन महिन्यांच्या आत निवडणूक कार्यक्रम नव्याने जाहीर करण्याचेही सचिवांना आदेशित करण्यात आले आहे. या प्रकरणात हेमंत काळमेघ यांची बाजू अ‍ॅड. अनिल ठाकरे यांनी मांडली. प्रदीप महल्ले यांनी स्वत: बाजू मांडली तर संस्थेच्यावतीने अ‍ॅड. अनिल कडू व अ‍ॅड. विवेक काळे यांनी बाजू मांडली. अध्यक्ष अरुण शेळके यांचे अधिकार गोठविलेनिर्णयानुसार संस्थेचे अध्यक्ष अरुण शेळके हे उर्वरित पदाधिकाऱ्यांची निवड होईपर्यंत (२७ आॅक्टोबर) कुठलाही धोरणात्मक निर्णय घेऊ शकणार नाहीत. संस्थेंतर्गत नियुक्त्या तसेच प्रवेश प्रक्रियेमधील विशेष कोट्याचाही अधिकार ते वापरु शकणार नाहीत. निवडणूक अधिकारीही घोषितआगामी निवडणुकीसाठी अ‍ॅड. सी.एस. पाठक यांची निवडणूक अधिकारी व एस.व्ही. देव (अधीक्षक, न्यायिक), यांची सहायक निवडणूक अधिकारीपदी नियुक्ती करण्यात येत असल्याचे या आदेशात स्पष्ट करण्यात आले आहे.