शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून अज्ञात कार घुसली आत, तपास सुरू!
2
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
3
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
4
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
5
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
6
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
7
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
8
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
9
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
10
राहुरीत शरद पवार गटाचा उमेदवार ठरला, गोविंद मोकाटे निवडणूक लढवणार, प्राजक्त तनपुरेंची माघार?
11
७ दिवसांत दुप्पट झाला 'हा' शेअर; १००% पेक्षा अधिक वाढली किंमत, IPL टीमची मालक आहे कंपनी
12
इराण-इस्रायल संघर्षाचा भारतीय PMI वर परिणाम! सर्व्हिस सेक्टरची गती मंदावली; महागाईने कंबरडे मोडणार?
13
सलग तीन पराभवनानंतर CSK साठी गुड न्यूज, धोनी आणि ब्रेव्हिस ‘या’ सामन्यातून करणार पुनरागमन 
14
Petrol Price In US: ट्रम्प यांच्या निर्णयाचा अमेरिकेच्या लोकांनाच फटका; पेट्रोलच्या दरात जून २०२२ नंतरची सर्वात मोठी वाढ
15
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
16
बंगळुरू-चेन्नई लढतीत पाण्याच्या बाटलीवरून वाद, RCBचा कर्णधार पंचावर भडकला, नेमकं घडलं काय?
17
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
18
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
19
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
20
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
Daily Top 2Weekly Top 5

रेल्वेत बोगस जात चोरीप्रकरणी शुद्धीकरणास प्रारंभ, उच्च न्यायालयाचे आदेश

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 13, 2017 16:00 IST

मॉडेल रेल्वे स्थानकावरील तिकीट आरक्षण कक्षाच्या पर्यवेक्षकपदी कार्यरत शीला नंदनवार यांचे जात प्रमाणपत्र बनावट असल्याप्रकरणी त्यांना बडतर्फ करण्यात आले.

- गणेश वासनिकअमरावती : येथील मॉडेल रेल्वे स्थानकावरील तिकीट आरक्षण कक्षाच्या पर्यवेक्षकपदी कार्यरत शीला नंदनवार यांचे जात प्रमाणपत्र बनावट असल्याप्रकरणी त्यांना बडतर्फ करण्यात आले. मध्य रेल्वे भुसावळ विभागाचे वरिष्ठ वाणिज्य प्रबंधकांनी मुंबई उच्च न्यायालयीच्या नागपूर खंडपीठाच्या आदेशानुसार ही कारवाई केली आहे. या कारवाईमुळे रेल्वेत जात चोरीप्रकरणी शुद्धीकरण होत असल्याचे चित्र आहे.सर्वोच्च न्यायालयाने गतवर्षी रेल्वेत जात चोरून नोकरी बळकावणारे अधिकारी, कर्मचा-यांच्या जात पडताळणीचे आदेश दिले होते. त्याअनुषंगाने मध्य रेल्वे मुंबई विभागाने अनुसूचित जाती, जमातीच्या कर्मचा-यांना मूळ कागदपत्रे सादर करण्यासंदर्भात नोटिशी बजावल्या होत्या. त्यानुसार भुसावळ रेल्वे विभागांतर्गत १९, तर नागपुरात १७ बोगस जात प्रकरणांची चौकशी आरंभली होती. अमरावती रेल्वे स्थानकावर प्रारंभी वाणिज्य लिपिकपदी रुजू झालेल्या शीला नंदनवार या मूळ कोष्टी संवर्गाच्या असताना त्यांनी हलबी संवर्गाचे जात प्रमाणपत्र रेल्वे विभागाकडे सादर करून अनुसूचित जमाती संवर्गात लाभ घेतला.या प्रकरणाची तक्रार रेल्वेचे सेवानिवृत्त अधिकारी नंदराज मघाळे यांनी अमरावतीच्या विभागीय अनुसूचित जाती प्रमाणपत्र पडताळणी समितीकडे केली होती. त्यानुसार एसटी जात प्रमाणपत्र पडताळणी समितीने नंदनवार यांची कागदपत्रे तपासली तेव्हा त्या हलबी संवर्गात येत नसल्याचा निर्णय समितीने दिला होता. मात्र, समितीच्या निर्णयाला शीला नंदनवार यांनी आव्हान देत मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात न्यायासाठी धाव घेतली. परंतु नागपूर खंडपीठाने देखील शीला नंदनवार यांनी जात चोरी केल्याचा ठपका ठेवत त्यांची याचिका फेटाळली. शीला नंदनवार या हलबी नसून कोष्टी संवर्गात असल्याचा निर्णय उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने दिला.उच्च न्यायालयाने सदर आदेश मध्य रेल्वे मुंबईच्या वरिष्ठांकडे पाठविले. त्याअनुषंगाने भुसावळ मध्य रेल्वे विभागाचे वरिष्ठ वाणिज्य प्रबंधक सुनील मिश्रा यांनी शीला नंदनवार यांना पदावरून बडतर्फ करण्याचे आदेश ८ नोव्हेंबर २०१७ रोजी जारी केले. या आदेशाची अंमलबजावणी अमरावती रेल्वे स्थानकाचे प्रबंधक आर.टी. कोटांगळे यांनी सोमवारी १३ नोव्हेंबर रोजी केली असून नंदनवार यांना पदावरून बडतर्फ करण्याची कार्यवाही केली आहे.अन्य ३५ बोगस अधिका-यांचे काय?बोगस जात प्रमाणपत्र तयार करून त्याआधारे रेल्वेत नोकरी बळकावली आहे. यात अमरावतीत १९, तर नागपुरात १७ जणांचा समावेश आहे. सर्वोच्च न्यायालयाचे आदेश असताना बनावट अधिकारी, कर्मचारी कसे कार्यरत राहतात, हा सुद्धा संशोधनाचा विषय आहे. शीला नंदनवार हे नाममात्र उदाहरण असून अनेक बड्या पदावर जात चोरून अधिकारी खुर्चीवर कायम असल्याची खंत तक्रारकर्ते नंदराज मघाळे यांनी व्यक्त केली.वरिष्ठांच्या आदेशानुसार तिकीट आरक्षण पर्यवेक्षक शीला नंदनवार यांना बडतर्फ करण्याची कारवाई करण्यात आली आहे. वरिष्ठांचे हे आदेश ९ नोव्हेंबर रोजी प्राप्त झाले होते.- आर. टी. कोटांगळे,रेल्वे स्टेशन प्रबंधक, अमरावती

टॅग्स :Courtन्यायालयAmravatiअमरावती