शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
4
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
5
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
6
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
7
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
8
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
9
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
10
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
11
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
12
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
13
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
14
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
15
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
16
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
17
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
18
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
19
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
20
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
Daily Top 2Weekly Top 5

आदिवासी समाजाचे १२ हजार ५०० पदे विनाविलंब तात्काळ भरतीचे आदेश

By गणेश वासनिक | Updated: August 16, 2024 18:14 IST

Amravati : सामान्य प्रशासन विभागाचे निर्देश; आदिवासी बेरोजगार युवकांची होणार स्वप्नपूर्ती, आता पदभरतीच्या जाहिरातीची प्रतीक्षा

अमरावती : राज्यातील आदिवासी समाजाच्या १२ हजार ५०० पदांच्या पदभरतीची कार्यवाही विनाविलंब तत्काळ करण्याचे निर्देश सामान्य प्रशासन विभागाने सर्व मंत्रालयीन विभागातील अपर मुख्य सचिव, प्रधान सचिव, सचिवांना दिले आहे. यासंदर्भात १३ ऑगस्ट २०२४ रोजी आदेश निर्गमित केले असून या आदेशावर उपसचिव र. अं. खडसे यांची स्वाक्षरी आहे. आदिवासी बेरोजगार तरुणांना नोकरीची संधी उपलब्ध व्हावी, यासाठी ‘लोकमत’ने रखडलेल्या या पदभरतीबाबतचा विषय सातत्याने प्रकाशित केला. परिणामी, आदिवासी समाजाचे आमदार, खासदारांसह शासनाला दखल घ्यावी लागली, हे विशेष.

पदभरतीसाठी विधिमंडळातील कार्यवाही एक नजर...

  • २ मार्च २०२१ रोजी आमदार डॉ. संदीप धुर्वे यांनी ३१ क्रमांकावर तारांकित प्रश्न विचारला होता.
  • १० मार्च २०२२ रोजी सभागृहात आदिवासी भरतीबाबत आदिवासींचे नेते म्हणून बोलण्याची संधी.
  • पदभरतीसाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना २८ जून २०२४ रोजी निवेदन दिले होते.

 

"बेरोजगार आदिवासी उमेदवारांच्या रखडलेल्या १२ हजार ५०० पदांच्या भरतीसाठी सातत्याने सरकार आणि शासनाकडे दोन वर्षभरापासून पाठपुरावा करण्यात आला. यात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची समर्थ साथ मिळाली. आता सामान्य प्रशासनानेनिर्देश जारी केल्यामुळे आदिवासी युवकांना न्याय मिळणार आहे."- डॉ. संदीप धुर्वे, आमदार आर्णी-केळापूर

टॅग्स :AmravatiअमरावतीTrible Development Schemeआदिवासी विकास योजना