शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेष्ठींनी समज दिली, नाईकांची नाराजी मिटली; नरेश म्हस्केंचा अर्ज भरायला 'ते' सगळे येणार
2
"कृष्ण आहेत रेवण्णा...",  प्रज्वल यांच्याबाबत काँग्रेस मंत्र्याचं वादग्रस्त वक्तव्य, भाजपाचा हल्लाबोल
3
Lok Sabha 2024 Rahul Gandhi :सस्पेन्स संपला! अखेर राहुल गांधींच्या नावाची घोषणा, पाहा कुठून लढणार लोकसभा, अमेठीत कोण?
4
सूर्य पश्चिमेला उगवेल मात्र उद्धव ठाकरे निर्णय बदलत नाहीत; जयंत पाटील थेट बोलले
5
तुम्ही महाराष्ट्राचे वाघ तर आम्हीही सांगलीचे वाघ; ठाकरेंसमोरच विश्वजित कदम गरजले
6
भाजप v/s काँग्रेस; उद्धवसेना v/s शिंदेसेना; शरद पवार गट विरुद्ध शिंदेसेनेत एकही लढत नाही
7
ईडीवर विशेष न्यायालयाचे ताशेरे, ‘खटल्यांना विलंब केल्यास आरोपी अनिश्चित काळ तुरुंगात राहतील’
8
आजचे राशीभविष्य - ३ मे २०२४; नोकरी करणाऱ्यांसाठी आजचा दिवस शुभ फलदायी
9
एकेकाळी मोबाइल फोन क्षेत्र गाजवलं, आता त्यांचं वर्कप्लेस अपग्रेड करणार Wipro; मिळाली मेगा डील!
10
मतदानाच्या वाढीव टक्केवारीवर संशय; काँग्रेसने नोंदवला केंद्रीय निवडणूक आयोगाकडे आक्षेप
11
पाकमधील हिंदू मुलींचे बळजबरी धर्मांतर रोखा; दानेशकुमार पलानी यांनी उठवला आवाज
12
आनंद दिघे यांच्या पावलावर पाऊल ठेवून मुख्यमंत्री शिंदेंनी काबीज केले ठाणे
13
ते सीबीआय, इन्कम टॅक्स, ईडीमधून उमेदवार शोधतात; आदित्य ठाकरे यांचा आरोप
14
आमोदा येथील मंदिराला भीषण आग;मंदिरासह जिल्हा बँक शाखाही आगीच्या भक्ष्यस्थानी
15
अमोल कीर्तिकर यांच्या मालमत्तेत नऊ कोटींनी वाढ; ५३ एकर शेतजमीन
16
‘डीपफेक’वर कारवाईस निवडणूक आयोग सक्षम, व्हिडीओंवरील बंदीबाबत निर्देश देण्यास दिल्ली हायकोर्टाचा नकार
17
प्रज्वल रेवण्णाविरोधात ‘लूकआऊट’ नोटीस; एसआयटीपुढे हजर राहण्यासाठी ७ दिवसांची मागणी
18
सर्वेक्षणाच्या नावाखाली मतदारांची माहिती मागणे तातडीने बंद करा; निवडणूक आयोगाचे आदेश
19
बृजभूषण यांचा पत्ता कट; पुत्राला भाजपचे तिकीट, लैंगिक शोषणाचा आरोप भोवला
20
जातिवाचक शिवीगाळ, नग्न करून मारहाण; तरुणाची आत्महत्या, कोपर्डी घटनेतील पीडितेच्या भावासह तिघांविरुद्ध गुन्हा

जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाला बांधकाम यंत्रणांचा खो

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 16, 2019 11:59 PM

शहरातील वर्दळीच्या मार्गांवर मोठ-मोठे खड्डे पडले असून, पावसाने ठिकठिकाणी डबके साचले आहेत. खड्ड्यांचा अंदाज येत नसल्याने वाहनावरील नियंत्रण बिघडून अपघाताच्या घटना रोज घडत आहेत. यामध्ये कॅम्प ते पंचवटी मार्गावर मोठ्या प्रमाणात खड्डे पडल्याने वाहनचालकांना मोठी कसरत करावी लागत आहे.

ठळक मुद्देअल्टिमेटम् संपला : कारवाई केव्हा?, खड्डे उठले नागरिकांच्या जीवावर

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : गणेशोत्सवादरम्यान अनुचित घटना टाळण्याच्या उद्देशाने जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी संबंधित विभागप्रमुखांची बैठक घेऊन शहरातील मुख्य रस्त्यांची ३१ ऑगस्टपर्यंत डागडुजी करण्याचे आदेश दिले होते. या अलटीमेटमला २२ दिवस झालेत.मात्र, रस्त्यात खड्डे की खड्ड्यात रस्ते, अशी स्थिती आहे. यामुळे रोज अपघात होत आहेत. परिणामी या विभागांवर जिल्हाधिकारी कारवाई करतील का, असा सवाल अमरावतीकरांनी उपस्थित केला आहे.शहरातील वर्दळीच्या मार्गांवर मोठ-मोठे खड्डे पडले असून, पावसाने ठिकठिकाणी डबके साचले आहेत. खड्ड्यांचा अंदाज येत नसल्याने वाहनावरील नियंत्रण बिघडून अपघाताच्या घटना रोज घडत आहेत. यामध्ये कॅम्प ते पंचवटी मार्गावर मोठ्या प्रमाणात खड्डे पडल्याने वाहनचालकांना मोठी कसरत करावी लागत आहे. या वर्दळीच्या मार्गावर स्कूल बसेस, आॅटो, एसटी व जडवाहने धावतात. नजरचुकीने खड्ड्यातून वाहन गेल्यास नियंत्रण बिघडून भीषण अपघाताची शक्यता नाकारता येणार नाही. तसेच राजापेठ उड्डाणपुलालगत कुथे हॉस्पिटलजवळ जीवघेणा खड्डा पडला आहे. संबंधित विभागाने याकडे लक्ष केंद्रित करणे गरजेचे आहे. ब्रिटिशकालीन राजकमलस्थित उड्डाणपुलावरदेखील खड्डे पडले असून अपघातास निमंत्रण देत आहे. निंभोरा स्थित एक हजार मुलांचे मागासवर्गीय वसतिगृहानजीकच्या रस्त्याची प्रचंड दैनावस्था झाली आहे. विद्यार्थ्यांना खड्ड्यातून सायकली, दुचाकी काढताना अपघाताची शक्यता नाकारता येत नाही.महापालिका क्षेत्रातील वर्दळीच्या रस्त्यांची प्रचंड दैना झाली आहे. काही भागांत रस्ता सिमेंटीकरणाची कामे सुरू असल्याने वनवेमधून मार्ग काढावा लागत असल्याने वाहतूक कोंडी ही नित्याचीच बाब झाली आहे. त्यामुळे जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी गणेशोत्सवाला गालबोट लागू नये, यासाठी संबंधित विभागांना मुख्य रस्त्यांची डागडुजी करण्याचे आदेश दिले होते. मात्र, त्याची अंमलबजावणी झालेली दिसत नाही.

टॅग्स :road safetyरस्ते सुरक्षा