शहरं
Join us  
Trending Stories
1
केदारनाथमध्ये हेलिकॉप्टर कोसळलं, गौरीकुंडजवळ अपघात; सात जणांचा मृत्यू झाल्याची शक्यता
2
राशीभविष्य, १५ जून २०२५: कामात समाधान लाभेल, आवडत्या व्यक्तीची भेट होईल, प्रवासाचा बेत आखाल !
3
इस्रायलचा इराणवर 'वार'! तेहरानमधील संरक्षण मंत्रालयाची इमारत, अणु मुख्यालय उद्ध्वस्त
4
CET: बीबीए, बीसीए, बीएमएसच्या परीक्षेसाठी सीईटी कक्षाकडून नोंदणी सुरू 
5
Maharashtra Govt: महावितरणची सौरऊर्जेत ३० हजार कोटींची गुंतवणूक!
6
Mumbai Local: तिकीट काढूनच फर्स्ट क्लासमधून प्रवास; नाही तर भरा दंड!
7
Navi Mumbai: नवी मुंबईत पाच आंतरराष्ट्रीय विद्यापीठे येणार
8
Ulhasnagar: धक्कादायक! डॉक्टरांनी मृत घोषित केलेला रुग्ण होता जिवंत
9
Air India: सोने तस्करीप्रकरणी एअर इंडियाच्या कर्मचाऱ्याला अटक
10
Mumbai Accident: लिंक रोड नेमका कोणासाठी बांधला? गोवंडी अपघातानंतर नागरिकांमध्ये संताप
11
Ahmedabad Plane Crash: चौकशीसाठी उच्चस्तरीय समिती स्थापन, मृतांची संख्या २७०
12
Palghar: आधी मृत अर्भकाला पिशवीतून नेऊ दिले, आता आरोग्य विभागाचे एकमेकांकडे बोट
13
अग्रलेख: ‘ती’च्यावर गर्भाशय काढण्याची वेळ का येते?
14
Mumbai Accident: गोवंडीत तीन लहान मुलांसह चौघांना भरधाव डम्परने चिरडले
15
WTC Final: अखेर २७ वर्षांनंतर दक्षिण आफ्रिकेने पुसला चोकर्सचा डाग; ऑस्ट्रेलियाला नमवून कसोटीचा नवा चॅम्पियन
16
विमान अपघातात सापडलेली भगवदगीता, कृष्ण मूर्ती कोणाची? एअर इंडियाची क्रू मेंबर असलेल्या पनवेलच्या लेकीची...
17
इराणच्या आकाशात इस्रायलची विमाने, गॅस रिफायनरीवर हल्ला; डिफेंस सिस्टीम उध्वस्त
18
आयुष्यात कधीच विमानात बसणार नाही; व्हिडीओ रेकॉर्ड करणाऱ्या आर्यनने घेतली धास्ती, पोलीस चौकशीनंतर...
19
अमेरिकेत मोठी घटना! दोन खासदारांवर घरात घुसून गोळीबार; महिला खासदार, पतीचा मृत्यू
20
नीट-यूजीचा निकाल जाहीर! राजस्थानचा महेश कुमार पहिला, तर महाराष्ट्राचा कृष्णांग जोशी तिसरा

संत्रा झाडावरच; तोडण्याची मुदत संपली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 27, 2021 04:15 IST

व्यापारी संत्रा केव्हा तोडणार? : उत्पादकांचा जीव टांगणीला वरूड : तालुक्यात यंदा मृग बहराचे उत्पादन बऱ्यापैकी झाले आहे. त्यामुळे ...

व्यापारी संत्रा केव्हा तोडणार? : उत्पादकांचा जीव टांगणीला

वरूड : तालुक्यात यंदा मृग बहराचे उत्पादन बऱ्यापैकी झाले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी संत्राबागांचा व्यापाऱ्यांशी करार करून इसार घेतला. आता तोडणीची मुदतदेखील संपली, परंतु पाऊस व गारपिटीने संत्री झाडावरच राहिली. निसर्गाच्या बेभरवशामुळे संत्राउत्पादकांचा जीव टांगणीला लागला आहे.

तालुक्यात २० हजार हेक्टरवर संत्राबागा आहेत. त्यावर कुणी आंबिया, तर कुणी मृग बहराचे उत्पादन घेतो. यावर्षी मृग बहराचे उत्पादन बऱ्यापैकी आले. संत्री तोडणीची वेळ होताच व्यापाऱ्यांशी करार-मदार झाले. कुणी टनाचा, तर कुणी क्रेटचा दर घेतला. टोकन म्हणून इसार घेऊन तोडणीची मुदत देण्यात आली. दरम्यान, पाऊस व तुरळक गारपीट झाली. हवेमुळे काही ठिकाणी संत्री जमिनीवर आली. हीच संधी पाहून व्यापाऱ्यांनी मुदत संपूनही तोडणी केलेली नाही. यातच दिवसाआड मेघ दाटून येत असल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे. निसर्गाचा लहरीपणा पाचवीला पुजला असल्यामुळे शेतकऱ्यांच्या डोळ्यांत झोप नाही. पोटच्या गोळ्याप्रमाणे जपलेल्या संत्राबागांमध्ये फळे पाहून स्वप्न रंगविणारा शेतकरी ती तोडली जाण्याच्या प्रतीक्षेत आहे. ३८ ते ४० हजार रुपये टन व क्रेटला ७०० ते ८०० रुपये असा भाव मिळत असल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे.