शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
6
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
7
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
8
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
9
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
10
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
11
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
12
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
13
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
14
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
15
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
16
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
17
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
18
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
19
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
20
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
Daily Top 2Weekly Top 5

संत्र्याच्या आंबिया बहराला गळती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 19, 2018 01:09 IST

पावसाने १५ दिवस दडी मारल्याने संत्र्याच्या आंबिया बहाराच्या फळांना बुरशीजन्य अज्ञात रोगाचा प्रादुर्भाव होऊन गळती लागली आहे. १० ते १५ टक्केच फळे टिकण्याची शक्यता असल्याने संत्राउत्पादकांमध्ये चिंतेचे सावट पसरले आहे. यंदाही अस्मानी संकट ओढवण्याचे चित्र आहे.

ठळक मुद्देसंत्रा उत्पादक चिंताग्रस्त : १० ते १५ टक्के फळे टिकण्याची शक्यता

लोकमत न्यूज नेटवर्कवरूड : पावसाने १५ दिवस दडी मारल्याने संत्र्याच्या आंबिया बहाराच्या फळांना बुरशीजन्य अज्ञात रोगाचा प्रादुर्भाव होऊन गळती लागली आहे. १० ते १५ टक्केच फळे टिकण्याची शक्यता असल्याने संत्राउत्पादकांमध्ये चिंतेचे सावट पसरले आहे. यंदाही अस्मानी संकट ओढवण्याचे चित्र आहे. कृषी विभागाने यावर संशोधन करून उपाययोजना सुचवाव्यात, अशी मागणी संत्रा उत्पादकांकडून केली जात आहे.विदर्भाचा कॅलिफोर्निया म्हणून वरूड तालुक्याची ओळख केवळ संत्रा पिकामुळे आहे. हजारो हातांना काम देणारी संत्र्याची बाजारपेठ आहे. देशाच्या कानाकोपऱ्यात येथून चवदार संत्र्याची निर्यात केली जाते. जिल्ह्यातून सर्वाधिक २० हजार ६०० हेक्टरचे संत्रा क्षेत्र वरूड तालुक्यात आहे. यावर्षी पाऊस समाधानकारक नाही. गेल्या १५ दिवसांपासून पावसाने दडी मारल्याने अनेक पिकांनी माना खाली टाकल्या, तर संत्र्याच्या आंबिया बहराची फळे काही दिवसांत तोडण्यायोग्य होत असताना बुरशीजन्य अज्ञात रोगाचा कहर झाल्याने मोठ्या प्रमाणात गळती सुरू झाली आहे. दोन दिवसांपूर्वी पावसाने पाठ फिरविल्याने तापमानामध्येसुद्धा वाढ झाली आहे. संत्रा आंबिया बहाराचे पीक हातातून जाण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. यापूर्वी तीव्र पाणीटंचाई आणि अतितापमानामुळे उन्हाळ्यात फळगळती झाली, उरलेली फळगळती आता होत असल्याने आंबिया बहराचे काय होणार, हा प्रश्न आहे.आॅगस्ट महिन्यात बोट्रिओडिप्लोडिआ, कोलीटोट्रिकम व काही अंशी अल्टरनेरिया या बुरशीमुळे संत्रामध्ये फळगळ होत असून, बुरशी फळाच्या देठातून फळामध्ये आंत जावून पूर्ण वाढ झालेल्या फळाचे नुकसान करतात. अन्नद्रव्याची कमतरता हेसुद्धा कारण असण्याची शक्यता आहे. सूक्ष्म अन्नद्रव्याची कमतरता आढळून आल्यास, त्वरित पुरवठा केल्यास हा रोग नाहिसा होऊ शकतो.- उज्ज्वल आगरकर, तालुका कृषी अधिकारीजुलै ते आॅगस्ट महिन्यात पावसाने दडी मारल्याने मोठ्या प्रमाणावर संत्र्याच्या आंबिया बहराची फळे गळाल्याने लाखो रुपयांचे नुकसान सहन करावे लागणार असल्याने शासनाने संत्राउत्पादकांना हेक्टरी २५ हजार रुपये आर्थिक अनुदान जाहीर करावे.- विजय श्रीराव,माजी जिल्हा उपाध्यक्ष, भाजपअज्ञात रोगामुळे फळगळती मोठ्या प्रमाणात होत असल्याने केवळ १० ते २०टक्के संत्राफळे टिकण्याची चिन्हे निर्माण झाली आहेत. संत्रा आंबिया बहर टिकला नाही, तर उत्पादकांना लाखोंचे नुकसान सोसावे लागेल. कृषी विभागाने सर्वेक्षण करून शेतकºयांना अनुदान द्यावे.- उद्धव फुटाणे,संत्राउत्पादक, तिवसाघाट

टॅग्स :Farmerशेतकरीagricultureशेती