लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : डॉ.पंजाबराव देशमुख मेमोरियल मेडिकल कॉलेजमधील एमबीबीएसच्या प्रवेश प्रक्रियेवर मंगळवारी एका विद्यार्थिनीने आक्षेप घेतला. प्रवेश यादीत नाव डावलल्याचा आरोप करून विद्यार्थिनीच्या पालकांनी अधिष्ठाता दिलीप जाणे यांना जाब विचारल्याने गोंधळ उडाला होता. या गोंधळामुळे गाडगेनगर पोलिसांनाही पाचारण करावे लागले.पीडीएमसीत एमबीबीएसच्या प्रवेशाची प्रक्रिया सुरू असून प्रवेश प्रक्रियेतील काही विद्यार्थ्यांची प्रवेश यादी जाहीर झाली आहे. यवतमाळ जिल्ह्यातील गवंड येथील बन्सीलाल अण्णाजी दिघाळे याच्या मुलीनेही एमबीबीएस प्रवेशासाठी अर्ज केला. मात्र, बुधवारी लागलेल्या एससी प्रवर्गातील विद्यार्थ्यांच्या निवड यादीत दिघाळेच्या मुलीचे नाव आढळून आले नाही. ती यादी मंगळवारी लावल्याचे पीडीएमसी प्रशासनाचे म्हणणे होते. ती यादी बुधवारी लावल्याचे दिघाळेंचे म्हणणे होते. दुपारी ३ वाजेपर्यंत शैक्षणिक दस्ताऐवजांच्या सत्यप्रती घेऊन विद्यार्थ्यांनी उपस्थित राहणे गरजेचे होते. मात्र, पीडीएमसीमार्फत नोटीस लावण्यात आली नसल्याचे दिघाळेच्या निदर्शनास आले. त्यामुळे प्रवेश प्रक्रियेत घोळ झाल्याचा आरोप करीत बन्सीलाल दिघाळे यांनी अधिष्ठाता दिलीप जाणे यांचे कक्ष गाठले आणि प्रवेश प्रक्रियेवर आक्षेप घेतल्याने गोंधळ उडाला. यावेळी अन्य काही विद्यार्थिंनींनीही प्रवेशसंबंधी समस्या मांडल्यात.दिघाळे यांनी प्रवेशासंबंधी आग्रह धरून अधिष्ठाता जाणे यांना शेतकºयाचा हवाला देत पीडीएमसीत आत्महत्या करण्याची धमकी दिली. रात्रीपर्यंत गोंधळ सुरूच असल्यामुळे गाडगेनगर पोलिसांना पाचारण करून स्थिती निवळण्यात आली. यासंबंधी अधिष्ठाता दिलीप जाणे यांच्याशी संपर्क साधला, मात्र प्रतिसाद मिळाला नाही.पीडीएमसीतील एमबीबीएसच्या प्रवेश प्रक्रियेवर काही विद्यार्थ्यांनी आक्षेप घेऊन गोंधळ घातला. माहिती मिळताच तेथे पोलिसांना पाठविले. त्यानंतर गोंधळ शांत झाला.- कैलास पुंडकर,पोलीस निरीक्षक, गाडगेनगर
एमबीबीएस प्रवेशावर आक्षेप, पोलिसांना पाचारण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 31, 2017 01:02 IST
डॉ.पंजाबराव देशमुख मेमोरियल मेडिकल कॉलेजमधील एमबीबीएसच्या प्रवेश प्रक्रियेवर मंगळवारी एका विद्यार्थिनीने आक्षेप घेतला.
एमबीबीएस प्रवेशावर आक्षेप, पोलिसांना पाचारण
ठळक मुद्देपीडीएमसीच्या डीन कक्षात गोंधळ : यादीतून नाव डावलल्याचा आरोप