शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
3
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
4
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
5
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
6
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
7
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
8
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
9
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
10
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
11
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
12
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
13
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
14
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
15
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
16
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
17
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
18
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
19
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
20
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
Daily Top 2Weekly Top 5

भूमी अधिग्रहण धोरणाचा विरोध

By admin | Updated: August 4, 2015 00:06 IST

शासनाचे भूमी अधिग्रहण विषयक धोरण, शेतकरी आत्महत्या तसेच शेती आणि शेतकरीविरोधी व्यवस्थेच्या निषेधार्थ किसान जागृती अभियानाच्यावतीने जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले.

निवेदन : किसान जागृती अभियानातर्फे शासनाकडून सुधारणेची अपेक्षा अमरावती : शासनाचे भूमी अधिग्रहण विषयक धोरण, शेतकरी आत्महत्या तसेच शेती आणि शेतकरीविरोधी व्यवस्थेच्या निषेधार्थ किसान जागृती अभियानाच्यावतीने जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले. शासनाच्या विषमतावादी धोरणामुळे देशात एकीकडे काही लोक झपाट्याने श्रीमंत होत आहेत तर दुसरीकडे शेतकरी, मजूर आणि कामगारांचे प्रचंड शोषण होत आहे. देशातील ७० टक्के वर्गातील वाढलेले आत्महत्यांचे प्रमाणदेखील याच विषमतेचा परिणाम आहे. श्रीमंतांच्या हाती मोठमोठ्या मशिनरी आल्याने रोजगारापासून अनेक लोक वंचित होत आहेत. त्यामुळेच कारखान्यांसाठी केल्या जाणाऱ्या भूमी अधिग्रहण विषयक धोरणाचा निषेध किसान जागृती अभियानाद्वारे करण्यात आला. दुसरीकडे उत्पादन खर्चावर आधारित योग्य दर न मिळाल्याने शेतकऱ्यांचे शोषण होत आहे. त्याची लूट केली जात आहे. परिणामी शेतकऱ्यांच्या आत्महत्या वाढल्या आहेत. इंग्रजांच्या धोरणानुसार चालणारी ही नीती बदलण्याची मागणी यावेळी निवेदनातून किसान जागृती अभियानाद्वारे करण्यात आली. यावेळी प्रहारचे जिल्हाप्रमुख छोटू महाराज वसू, चंदू खेडकर, अक्षय वानखडे, मारोती नागदिवे, शरद मेटकर, पप्पू मातकर, विजय खाटके, प्रभाकर गाढवे, सुनील भिसे, प्रदीप चांगोले, चक्रधर बायस्कर, आकाश खांडेकर, विशाल मेटकर, रमेश सोलव, पूर्णाजी ठाकरे, अतुल आमझरे आदी उपस्थित होते. शेतकऱ्यांच्या आत्महत्या वाढत आहेत. परंतु केवळ त्यांच्या जखमांवर वरवर मलमपट्टी केली जाते. मुळावर घाव घालून समस्या निकाली काढण्याकडे दिले जात नाही. परिणामी शेतकरी हतबल झाला आहे. कारखानदारीला भाव देण्याकरिता मजुरांच्या तोंडचा घास शासन हिरावून घेऊ पाहत आहे. मोठमोठ्या यंत्रांद्वारे कामे होऊ लागली तर मजुरांच्या हातचे काम हिरावले जाईल. मग, या बेरोजगार मजुरांचे पुनर्वसन करण्याची जबाबदारी शासनाची नाही काय? शासनाने भूमी अधिग्रहण व शेतकरी संबंधित धोरणात आमुलाग्र बदल करून त्यांचे पुनरूज्जीवन करण्यासाठी उपाययोजना कराव्यात, अशी मागणी देखील या निवेदनातून किसान जागृती अभियानाच्या सदस्यांद्वारे करण्यात आली. अनेक कार्यकर्ते निवेदन देताना उपस्थित होते. (प्रतिनिधी)