शहरं
Join us  
Trending Stories
1
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
2
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
3
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
4
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
5
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
6
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
7
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
8
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
9
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
10
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
11
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
12
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
13
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
14
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
15
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
16
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
17
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
18
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
19
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
20
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

राज्यात मुक्त विद्यापीठाच्या परीक्षा रखडल्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 10, 2020 11:44 IST

यंदा २३ मार्चपासून कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी लॉकडाऊन सुरू झाले. त्यामुळे मार्च महिन्यातील मुक्त विद्यापीठाच्या परीक्षा रखडल्या.

ठळक मुद्देसहा लाख विद्यार्थ्यांना प्रतीक्षा सातही विभागीय केंद्रांवर पदव्युत्तर प्रवेशाची चिंता

गणेश वासनिक ।लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : राज्यात यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या सहा लाख विद्यार्थ्यांची परीक्षा ‘लॉकडाऊन’मुळे रखडली आहे. सातही विभागीय केंद्रांवर अंतिम वर्षाची परीक्षा न झाल्याने पदव्युत्तर प्रवेशाबाबत विद्यार्थ्यांना चिंता लागली आहे. शासनस्तरावरून परीक्षेसंदर्भात अद्यापही निर्णय झाला नाही.शिक्षणाची गंगाजळी प्रत्येक दारापर्यंत पोहचवण्यासाठी यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाची निर्मिती करण्यात आली. मात्र, यंदा २३ मार्चपासून कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी लॉकडाऊन सुरू झाले. त्यामुळे मार्च महिन्यातील मुक्त विद्यापीठाच्या परीक्षा रखडल्या. परीक्षा केव्हा, कधी होणार, याबाबत शासननिर्णयाची विद्यार्थ्यांना प्रतीक्षा आहे. मुक्त विद्यापीठाच्या सातही केंद्रांवर परीक्षा घेण्यासंदर्भात तयारी आहे. मात्र, परीक्षांचे नियोजन कसे असावे, यासंदर्भात शासनाकडून गाईड लाईन प्राप्त झाल्या नाहीत. विद्यापीठाने ऑफलाईन, ऑनलाईन अशा दोन्ही प्रकारे परीक्षा घेण्याची तयारी चालविली आहे. प्रथम किंवा द्वितीय वर्षात प्रवेशित विद्यार्थ्यांच्या परीक्षा मागे-पुढे घेता येतील. केवळ अंतिम वर्षाला प्रवेशित विद्यार्थ्यांच्या परीक्षांची नियमावली शासनाने स्पष्ट न केल्याने त्यांची परीक्षा रखडली आहे. मुंबई, नागपूर, औरंगाबाद, कोल्हापूर, पुणे, नाशिक व अमरावती या सातही अभ्यास केंद्रांतून अंतिम वर्षाला १.८० लाख विद्यार्थी प्रवेशित असल्याची माहिती आहे.लॉकडाऊनमध्ये ऑनलाईन शैक्षणिक सत्रमुक्त विद्यापीठाच्या सातही विभागीय केंद्रांवर लॉकडाऊनच्या काळात विद्यार्थ्यांसाठी ऑनलाईन शैक्षणिक सत्र राबविण्यात आले. साडे आठ हजार विद्यार्थ्यांनी या ऑनलाईन शैक्षणिक सत्राचा लाभ घेतला आहे. एकट्या अमरावती येथील विभागीय अभ्यास केंद्रावरून ३९५३ विद्यार्थ्यांनी ऑनलाईन शैक्षणिक सत्रात सहभाग घेतला.परीक्षेसंदर्भात एसएमएसने कळविणारमुक्त विद्यापीठाच्या परीक्षेसंदर्भात किमान १५ दिवसांपूर्वी विद्यार्थ्यांना कळविले जाणार आहे. परीक्षेची पद्धत, स्वरूप, तारीख आदी माहिती एसएमएसद्वारे कळविण्याची तयारी असल्याचे मुक्त विद्यापीठाच्या अमरावती विभागीय अभ्यास केंद्राचे संचालक अंबादास मोहिते यांनी ‘लोकमत’ला सांगितले.

टॅग्स :Education Sectorशिक्षण क्षेत्र