शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
2
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
3
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
4
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
5
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
6
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
7
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
8
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
9
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
10
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
11
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
12
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
13
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
14
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
15
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
16
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
17
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
18
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
19
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
20
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
Daily Top 2Weekly Top 5

कोरोनाला शहरवासीयांकडून उघड आमंत्रण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 20, 2020 05:00 IST

शहरातील सर्व दुकाने सुरू झाली असून, परिस्थिती पूर्वपदावर आली आहे. शहरातील सर्व शासकीय व इतर कार्यालये सुरू झाल्याने अमरावती व इतर शहरांतून अप-डाऊन करणाऱ्या कर्मचाऱ्यांचीही संख्या वाढली आहे. दिवसेंदिवस सर्वांचीच आर्थिक परिस्थिती ढासळत असताना त्याला सावरण्यासाठी शासनाने सर्व व्यवसाय व प्रतिष्ठाने उघडण्याची परवानगी दिली; पण काही निर्बंध कायम आहेत.

ठळक मुद्देमास्कही गायब : नागरिक झाले बिनधास्त; शासकीय यंत्रणाही दमली

लोकमत न्यूज नेटवर्कचांदूर रेल्वे : लॉकडाऊननंतर झालेल्या ‘अनलॉक वन’च्या घोषणेनंतर चांदूर रेल्वे शहरातील नागरिक बिनधास्त झाले असून, कोरोनाची भीती आणि तोंडावरील मास्क लावण्याची सवय दूर पळाल्याचे पाहायला मिळत आहे. फिजिकल डिस्टन्सिंग व इतर नियमांचे तर सर्रास उल्लंघन होताना दिसून येत आहे. सुरुवातीला दंड आकारणारी शासकीय यंत्रणा पुरती दमलेली दिसून येत आहे.शहरातील सर्व दुकाने सुरू झाली असून, परिस्थिती पूर्वपदावर आली आहे. शहरातील सर्व शासकीय व इतर कार्यालये सुरू झाल्याने अमरावती व इतर शहरांतून अप-डाऊन करणाऱ्या कर्मचाऱ्यांचीही संख्या वाढली आहे. दिवसेंदिवस सर्वांचीच आर्थिक परिस्थिती ढासळत असताना त्याला सावरण्यासाठी शासनाने सर्व व्यवसाय व प्रतिष्ठाने उघडण्याची परवानगी दिली; पण काही निर्बंध कायम आहेत. हे निर्बंध झुगारून कोरोना पूर्णत: गेल्याच्या अविभार्वात शहरातील व तालुक्यातील लोक वावरत आहेत. शहरात कामानिमित्त व सहज फिरणाऱ्या नागरिकांमध्ये अर्ध्याधिक नागरिकांनी मास्कला दूर सारले आहे.सुरुवातीला नगर परिषद, तहसील, पोलीस प्रशासन गैरजबाबदार नागरिकांना चौकाचौकांत अडवून दंड ठोठावत असल्याचे वृत्त येत असे. आता त्यांनीही याकडे दुर्लक्ष केल्याचे दिसून येत आहे. शहरातील अनेक दुकानांमध्ये ग्राहकांची गर्दी दिसत असून, त्या ठिकाणी ना तोंडाला मास्क असते, ना योग्य अंतर राखले जाते. हा प्रकार कोरोनाला आमंत्रण असल्याचे स्पष्ट आहे.नियमाचे उल्लंघन करणाऱ्यांवर आकस्मिक पद्धतीने पोलीस विभाग व नगर परिषदेकडून मोठ्या प्रमाणावर कारवाई करण्यात येत आहे. तसेच नगर परिषद चमूकडून मास्क, सोशल डिस्टन्सिंग याबाबत कार्यवाही केली जाते. दोन महिन्यांपासून जी कार्यवाही नगर परिषदेने केली, त्याचा उद्देश नागरिकांना शिस्त लावणे, व कोरोनापासून त्यांचे संरक्षण करणे हा होता. नागरिकांनी स्वत:ची काळजी स्वत: घ्यायची आहे आणि शहराला कोरोना संसर्गापासून दूर ठेवायचे आहे- मेघना वासनकर, मुख्याधिकारी, नगर परिषद, चांदूर रेल्वे

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या