शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
2
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
3
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
4
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
5
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
6
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
7
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
8
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
9
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
10
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
11
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
12
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
13
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
14
किंमती गगनाला भिडल्या तरीही पायलटनं कोट्यवधीचं तेल समुद्रात ओतले; कारण ऐकून कराल कौतुक
15
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
16
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
17
मरीन ड्राइव्ह अपघात निष्काळजीपणामुळेच, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा वगळला: उच्च न्यायालय
18
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
19
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
20
Health Tips: कंबर, मान आणि खांदे दुखीने हैराण? उशीचा 'असा' वापर करा, वेदनांपासून कायमची सुटका मिळवा!
Daily Top 2Weekly Top 5

स्थानिक रहिवाशांनाच आता जन्म-मृत्यूचे प्रमाणपत्रे मिळणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 13, 2025 12:19 IST

सुधारित कार्यपद्धती जाहीर : सबळ पुराव्याची होईल खात्री

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : जिल्ह्यात वर्षभरात उशिराने जन्म-मृत्यूचे १४ हजारांवर दाखले देण्यात आले. यामध्ये बोगस कागदपत्रांच्या आधारे जन्मनोंदी घेण्यात आल्याचे प्रकरण गाजते आहे. काही परकीय नागरिकही अशा नोंदी करीत असल्याच्या तक्रारी शासनाकडे प्राप्त आहेत. या पार्श्वभूमीवर शासनाने बुधवारी जन्म-मृत्यू दाखले वितरणासाठी सुधारित कार्यपद्धती जाहीर केली.

जिल्हा दंडाधिकारी किंवा एसडीओ तसेच ज्यांना जिल्हा दंडाधिकारी यांनी प्राधिकृत केले आहे. त्यांच्यासाठी ही कार्यपद्धती विहित केली आहे. यात जन्माच्या अनुषंगाने रुग्णालयीन नोंदी, लसीकरणाचे पुरावे, मृत्यूच्या अनुषंगाने पीएम रिपोर्ट, एफआयआर, शाळा प्रवेश निर्गम रजिस्टर दाखला, बोनाफाइड सर्टिफिकेट, शाळा सोडल्याचा दाखला, रहिवाशांचे पुराव्यात मालमत्ता कर पावती, पाणीपट्टी, वीजबिल ग्राह्य धरण्यात येणार आहे. मालमत्तेच्या पुराव्यात सात-बारा उतारा, नमुना ८-अ, वारस नोंदीचा फेरफार, मिळकत उतारा, नोंदणीकृत दस्त, ओळखीबाबतच्या पुराव्यात वाहन परवाना, मतदान ओळखपत्र, पारपत्र, आधार कार्ड, बँक /पोस्ट पासबुक, पॅन कार्ड तसेच कौटुंबिक पुराव्यात परिवारातील सदस्यांचे जन्म प्रमाणपत्र, शिधापत्रिका व विवाह प्रमाणपत्र ग्राह्य धरण्यात येणार आहे.

तलाठी, ग्रामसेवकांचा अहवाल आवश्यकअर्जदाराने जन्म झाल्यापासून ते विलंबाच्या जन्मनोंदीच्या अनुषंगाने अर्ज सादर करेपर्यंतच्या कालावधीत कोठे वास्तव्य केल्याबाबतचे पुरावे घेण्यात यावेत. तसेच अर्जदाराचे स्थानिक रहिवासाचे ठिकाणी तलाठी, ग्रामसेवक यांचेमार्फत स्थानिक चौकशी/पंचनामा करून वस्तुस्थितीदर्शक अहवाल मागविण्यात येणार आहे. अर्जदाराचे स्थानिक जन्माच्या ठिकाणचा व रहिवासाचा तपास करून चौकशी अहवाल पोलिस विभागाकडून मागविण्यात येणार आहे.

पडताळणीचे अभिप्राय १५ दिवसांतअर्जासोबत काही पुरावे बनावट असल्याची शक्यता नाकारण्यात येत नाही, त्याची पडताळणी होणे आवश्यक आहे. याकरिता संबंधित विभागाकडून पडताळणीचे लेखी अभिप्राय १५ दिवसांच्या आत मागविण्यात येईल. अर्जदाराच्या स्वयंघोषणापत्रावर किंवा शपथपत्रावर दोन स्थानिक प्रतिष्ठित नागरिक, पोलिस पाटील, विशेष कार्यकारी अधिकारी, तंटामुक्ती अध्यक्ष, राजपत्रित अधिकारी यांची साक्षीदार म्हणून स्वाक्षरी असणे अनिवार्य आहे.

 

टॅग्स :Amravatiअमरावती