शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
2
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
3
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
4
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
5
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
6
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
7
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
8
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
9
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
10
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
11
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
12
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
13
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
14
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
15
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
16
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
17
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
18
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
19
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
20
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
Daily Top 2Weekly Top 5

२१ हजार रेशन कार्डधारकांनाच मिळाले डीबीटीचे अनुदान; लाभार्थींचाही कानाडोळा

By जितेंद्र दखने | Updated: July 5, 2023 18:53 IST

एपीएल शेतकरी शिधापत्रिकाधारकांना थेट खात्यावर प्रतिलाभार्थी १५० रुपये इतक्या रोख रकमेच्या हस्तांतरणाची योजना राज्य शासनाने जाहीर केली आहे.

अमरावती: एपीएल शेतकरी शिधापत्रिकाधारकांना थेट खात्यावर प्रतिलाभार्थी १५० रुपये इतक्या रोख रकमेच्या हस्तांतरणाची योजना राज्य शासनाने जाहीर केली आहे. जिल्ह्यात जानेवारी ते मार्च महिन्यापर्यंत १४ पैकी ६ तालुक्यांतील २१ हजार ६० लाभार्थींना ९४ लाख ७७ हजार ६१० रुपयांचे अनुदान डीबीटीद्वारे बँक खात्यावर जमा करण्यात आले आहे. मात्र, अजूनही आठ तालुक्यांतील पात्र असलेल्या लाभार्थींनी आपल्या अनुदानाच्या लाभासाठी आवश्यक प्रशासकीय प्रक्रियाच पूर्ण केलेली नसल्याने असे एपीएल शेतकरी रेशन कार्डधारक लाभार्थी अनुदानापासून दूर आहेत.

राज्य शासनाने एपीएल शेतकरी रेशन कार्डधारकांना यापुढे धान्याऐवजी प्रतिलाभार्थी १५० रुपये अनुदान देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार या निर्णयाची अंमलबजावणीही सुरू झाली आहे. जिल्हाभरात एपीएल शेतकरी कार्डधारकांची संख्या ९३ हजार ११९ एवढी आहे. यामध्ये आतापर्यंत पुरवठा विभागाकडे जिल्ह्यातील अचलपूर, अमरावती ग्रामीण, चांदूर बाजार, दर्यापूर, धामणगाव रेल्वे, नांदगाव खंडेश्वर या सहा तालुक्यांमधील २१ हजार ६० एपीएल शेतकरी लाभार्थींना जानेवारी ते मार्च २०२३ पर्यंतचे अनुदान शासनाकडून लाभार्थी रेशन कार्डधारकांच्या बँक खात्यात जमा केले, तर उर्वरित आठ तालुक्यांमध्ये मात्र लाभार्थींकडून योजनेच्या लाभासाठी आवश्यक प्रशासकीय प्रक्रिया केली जात नसल्याने या तालुक्यांतील लाभार्थींना अनुदानाची रक्कम उपलब्ध असताना लाभ देता येत नसल्याचे पुरवठा विभागाकडून सांगण्यात आले. या तालुक्यांत संथगतीने प्रक्रियाअमरावती शहर, अंजनगाव सुर्जी, चांदूर रेल्वे, चिखलदरा, भातकुली, तिवसा, वरूड, मोर्शी, धारणी या नऊ तालुक्यांत लाभार्थींकडून लाभाच्या अनुदानासाठी आवश्यक असलेली प्रशासकीय प्रक्रिया पूर्ण केली गेली नाही. ही प्रक्रिया या ठिकाणी संथगतीने सुरू आहे. तालुकानिहाय लाभ मिळालेले कार्डधारक

  • अचलपूर - २,६८९
  • अमरावती ग्रामीण - १४
  • चांदूर बाजार - ४,७२२
  • दर्यापूर - ४,६८९
  • धामणगाव रेल्वे - २,८८४
  • नांदगाव खंडेश्वर - ६,०६२

 एपीएल शेतकरी रेशन कार्डधारकांना शासनाने धान्याऐवजी प्रतिलाभार्थी १५० रुपये अनुदान जाहीर केले आहे. आतापर्यंत २१ हजारांवर लाभार्थींच्या खात्यात अनुदान जमा करण्यात आले आहे. उर्वरित लाभार्थींनी पुरवठा विभागाकडे रीतसर अर्ज करून योजनेचा लाभ घ्यावा. डी.के. वानखेडे, जिल्हा पुरवठा अधिकारी

टॅग्स :Amravatiअमरावती