शहरं
Join us  
Trending Stories
1
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
2
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
3
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
4
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
5
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
6
शालेय सहलींनी भरली एसटीची तिजोरी, मिळाले तब्बल १२७ कोटी रुपयांचे उत्पन्न
7
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
8
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खोळतात? असं आहे यामागचं गुपित
9
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
10
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
11
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
12
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
13
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
14
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
15
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
16
वेळ संपत चालली! इराणच्या भीतीने सौदीने बहारिनला जोडणारा पूल बंद केला; रात्री काय घडणार... 
17
VIRAL : लेकाच्या कष्टाचे फळ! मुलगा घरी घेऊन आला पहिला फ्रीज; आईच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहून व्हाल भावुक 
18
Video - संतापजनक! फक्त एक पेरू तोडला म्हणून ४ वर्षांच्या मुलीला दोरीने बांधून बेदम मारहाण
19
भिवंडीत तरुणाचा मृत्यू झाल्यानंतर विशेष सुरक्षा; भाड्यात दरवर्षी १० टक्के वाढ
20
Middle East War: "होर्मुझ सामुद्रधुनी उघडा नाही तर, गंभीर परिणाम भोगा" अमेरिकेचा इराणला शेवटचा अल्टिमेटम!
Daily Top 2Weekly Top 5

अमरावती : बारवर दरोड्यात १७०० रुपयेच हाती लागले, ६ आरोपी जेरबंद

By प्रदीप भाकरे | Updated: December 30, 2023 17:21 IST

फ्रेजरपुरा पोलिसांची कारवाई, फरार आरोपींचा शोध

अमरावती : फ्रेजरपुरा पोलिस ठाण्याच्या हद्दीतील राहुलनगरस्थित सचिन बारमध्ये १५ डिसेंबर रोजी सायंकाळी ६ ते रात्री ९ च्या सुमारास चाकूच्या धाकावर दरोडा टाकण्यात आला होता. बारच्या दाराच्या काचा देखील फोडण्यात आल्या होत्या. टोळक्यातील एकाने बारमालकाच्या खिशातून १७०० रुपये जबरदस्तीने काढून घेतले होते. याप्रकरणी सहा आरोपींना अटक करण्यात आली असून, ते सहाही जण रेकॉर्डवरील गुन्हेगार आहेत. फ्रेजरपुरा पोलिसांनी शुक्रवारी ही कारवाई केली.

फ्रेजरपुरा पोलिसांनी सचिन जयस्वाल यांच्या तक्रारीवरून शेख सुफियान, निकेत वरघट, यश गडलिंग, राहुल श्रीरामे, गोट्या ऊर्फ प्रथमेश इंगोले व त्यांच्या १० ते १२ साथीदारांविरोधात दरोड्याचा गुन्हा दाखल केला होता. पैकी गुन्हयातील प्रमुख आरोपी सम्राट रविंद्र फुले (१९, रा. विश्वशांती बुदध विहाराजवळ वडाळी), प्रथम उर्फ गोटया रवींद्र इंगोले (२०, भातकुली पंचायत समिती क्वार्टर नं ७), यश प्रवीण गडलिंग (२१, संजय गांधीनगर), शेख सुफियान शेख इलियास (१९), अनिकेत उर्फ सोनु देवानंद वरघट (२१) व राहुल गौतम श्रीरामे (२१, तिघेही रा. गजानन नगर) यांना अटक करण्यात आली. यातील सम्राट फुले व गोटया इंगोले हे न्यायालयीन कोठडीत तर, उर्वरित चार आरोपी पोलीस कोठडीत आहेत.अटक टाळण्याची घेतली होती खबरदारी१५ डिसेंबर रोजी घटना घडताच सर्व आरोपी पसार झाले. सर्व आरोपी हे रेकार्डवरील सराईत गुन्हेगार असल्याने त्यांनी अटक टाळण्यासाठी मोठी खबरदारी घेतली होती. मात्र, १४ दिवसानंतर का होईना फ्रेजरपुरा पोलिसांना त्यांना अटक करण्यात यश आले. पोलिस आयुक्त नवीनचंद्र रेड्डी, पोलिस उपायुक्त सागर पाटील, एसीपी पुनम पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली फ्रेजरपुऱ्याचे ठाणेदार गोरखनाथ जाधव, पोलिस निरीक्षक हनुमंत डोपेवाड व निशांत देशमुख, तपास अधिकारी सहायक पोलिस निरीक्षक रवींद्र सहारे, पीएसआय ज्योती देवकते, सुनील सोळंखे, रज्जाक शेखुवाले, शशिकांत गवई, सागर पंडीत, शेखर गायकवाड यांनी ही कारवाई केली.

टॅग्स :AmravatiअमरावतीCrime Newsगुन्हेगारी