महाराजस्व अभियान : मंडळ कार्यालयात ‘इंटरनेट सेवा’ उपलब्धतिवसा : येथील तहसील कार्यालयात शनिवारी १ आॅगस्ट या महसूल दिनाचे औचित्य साधत तहसीलदार विजय लोखंडे यांच्या उपस्थितीत महाराजस्व अभियान २०१५-१६ ला सुरुवात करण्यात आली. या निमित्ताने मंडळ अधिकारी कार्यालयात इंटरनेट सुविधा उपलब्ध करण्यात येऊन शेतकऱ्यांना आॅनलाईन दाखला देण्यात आला. तिवसा मंडळ अधिकारी कार्यालयांतर्गत तिवसा भाग १, २, ३ व ४ तसेच सातरगाव, करजगाव, विचोरी, साझ्यामधील शेतकऱ्यांना आता त्वरित आॅनलाईन ७/१२, ८-अ व इतर कागदपत्रे वेळेवर मिळण्याची सोय निर्माण झाली आहे. मागील एक महिन्यापासून हस्तलिखित ७/१२ बंद करून सर्व रेकॉर्ड तहसील कार्यालयात जमा करण्यात आले. त्यामुळे शेतकऱ्यांना सेतूशिवाय पर्याय नव्हता व सेतूची संख्या कमी असल्याने शेतकऱ्यांना रांगेत उभे राहावे लागत होते आता मात्र शेतकऱ्यांची झाली आहे. या कार्यक्रमात शालीकराम काळमेघ या शेतकऱ्याला आॅनलाईन सातबारा देण्यात येवून अधिकृत सुरवात करण्यात आली आहे.कार्यक्रमाला तहसील विजय लोखंडे, मंडळ अधिकारी धोटे, तलाठी नंदकिशोर मधापुरे, सूर्यप्रकाश मेश्राम, सतीश चव्हाण, सचिन अवघाते, गजानन चव्हाण, संजय पवार, राहुल जोशी आदी उपस्थित होते. (तालुका प्रतिनिधी)
तिवसा तालुक्यात ‘आॅनलाईन’ सातबाऱ्यास शनिवारपासून सुरुवात
By admin | Updated: August 3, 2015 00:07 IST