शहरं
Join us  
Trending Stories
1
मुख्यमंत्री अतिशय उद्विग्न, मंत्र्यांना सज्जड दम; बेशिस्त खपवून घेणार नाही, २० मिनिटे खडेबोल
2
लाडकी बहीण योजनेत पुरुष कसे काय घुसले?: मुख्यमंत्री, ‘लोकमत’च्या वृत्ताचे मंत्रिमंडळ बैठकीत पडसाद
3
एकही चूक न करायच्या अटीवर कोकाटेंना अभय, मंत्रिपद टेम्पररी, दर १५ दिवसांनी आढावा: अजित पवार
4
‘ऑपरेशन सिंदूर’ थांबवा, असे जगातील कोणत्याही नेत्याने सांगितले नाही: पंतप्रधान नरेंद्र मोदी
5
स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका टप्प्याटप्प्याने घेणार; आधी जिल्हा परिषद, नंतर मनपा होणार
6
ठाकरे बंधुंना सलामी दिली, प्रो-गोविंदा स्पर्धेतून बाहेर; जय जवान पथक व्यवस्थापकांचा आरोप
7
गृहराज्यमंत्री योगेश कदम यांच्याविरूद्ध अनिल परबांनी दिले पुरावे; CM फडणवीसांकडे सादर
8
आजी-माजी खासदार आमने-सामने; विचारेंना मानसोपचार तज्ज्ञांची गरज; तर म्हस्के ‘वाचाळ रत्न’!
9
गणेशोत्सवासाठी ST सज्ज; ५,२०० जादा बस उपलब्ध करून देण्याचे नियोजन सुरू, मुंबईतून ६०० बस
10
उंचीच्या सक्तीमुळे उडणार मंडळांची धांदल; दोन विसर्जनस्थळे गाठण्यासाठी कसरत
11
वसई-विरार पालिकेचे माजी आयुक्त ईडीच्या कचाट्यात; सोमवारी निरोपाचा सत्कार, मंगळवारी धाड
12
लोकलमध्ये बसल्यावर मिळते तिकीट; UTSचा गैरवापर, QR कोड सुविधा बंद करण्यासाठी रेल्वेला पत्र
13
AI, कॉम्प्युटर इंजिनीअरिंगच्या साडेचार हजार जागा वाढल्या; प्रवेशासाठी १ लाख ७६ हजार जागा
14
भर सभागृहात निशिकांत दुबे आणि वर्षा गायकवाड यांच्यात तू- तू मै मै!
15
भीक मागण्यासाठी पुण्यातून चिमुरडीचे अपहरण; तुळजापुरातील ५ जणांची टोळी गजाआड
16
नागपुरात चोरट्यांचा आतंक; दिवसाढवळ्या कारची काच फोडून २५ लाख पळवले!
17
२२ एप्रिलचा बदला २२ मिनिटांत घेतला, भारतीयांना अपेक्षित कारवाई केली- पंतप्रधान नरेंद्र मोदी
18
ऑपरेशन सिंदूरदरम्यान भारताने PoK परत का घेतला नाही? काँग्रेसच्या प्रश्नावर मोदींनी दिलं असं उत्तर  
19
१० मे रोजी युद्धविरामाचा निर्णय कुणाच्या सांगण्यावरून झाला? अखेर पंतप्रधान नरेंद्र मोदीचं लोकसभेत मोठं विधान
20
"बबिताजींसोबत माझं शूटिंग असतं तेव्हा..."; 'तारक मेहता' फेम जेठालालने सांगितली 'मन की बात'

ऑनलाईन फसवणूक; इंटरनेट बॅंकिंगचा पासवर्ड बदलण्याच्या नादात ३.२५ लाखांचा गंडा

By प्रदीप भाकरे | Updated: August 9, 2023 16:52 IST

मोबाईल युजरविरूद्ध फसवणूक व आयटी ॲक्टअन्वये गुन्हा दाखल

अमरावती : येथील एका ५० वर्षीय प्राध्यापकाला एसबीआयच्या इंटरनेट बॅंकिंगचा पासवर्ड बदलण्याची प्रक्रिया तब्बल ३ लाख २५ हजार १७ रुपयांमध्ये पडली. ८ ऑगस्ट रोजी दुपारी तीन ते पाचच्या दरम्यान त्यांची ऑनलाईन फसवणूक करण्यात आली. याप्रकरणी, नितीन वानखडे (५०, रा. अप्पू कॉलनी, शेगाव रोड, अमरावती) यांच्या तक्रारीवरून सायबर पोलिसांनी मंगळवारी एका मोबाईल युजरविरूद्ध फसवणूक व आयटी ॲक्टअन्वये गुन्हा दाखल केला.

नितीन वानखडे यांना एसबीआय इंटरनेट बँकींगचा पासवर्ड बदलावयाचा होता. त्यासाठी त्यांनी ८ ऑगस्ट रोजी एका सर्च इंजिनवर एसबीआय ऑनलाईन सर्च केले. त्यावर युझर पासवर्ड टाकून इंटरनेट बँकिंग पासवर्ड बदलविण्याकरीता प्रक्रिया केली. मात्र ती प्रक्रिया पुर्ण झाली नाही. त्यानंतर त्यांना एका मोबाईल क्रमांकावरून एक लिंक प्राप्त झाली. त्यावर वानखडे यांनी क्लिक केले असता योनो एसबीआय नावाचे वेबपेज उघडले. त्यावर युझर आयडी आणि पासवर्ड टाकून दिलेली प्रक्रिया पुर्ण केली असता लगेच त्याच वेबपेजवर ओटीपी येणे सुरु झाले.

प्रक्रियेदरम्यान ते ओटीपी त्या वेबपेजवर टाकले असता अज्ञात इसमाने त्यांच्या एसबीआय अकाऊंटमधून टप्याटप्याने तीन वेळा एकुण ३ लाख २५ हजार रुपये डेबिट झाले. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच वानखडे यांनी लागलीच सायबर पोलीस ठाणे गाठले. तथा तक्रार नोंदविली. सायबर पोलिसांनी देखील तत्क्षणी गुन्हा दाखल केला.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीfraudधोकेबाजीcyber crimeसायबर क्राइमAmravatiअमरावती