शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
4
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
5
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
6
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
7
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
8
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
9
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
10
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
11
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
12
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
13
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
14
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
15
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
16
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
17
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
18
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
19
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
20
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

Amravati: एकतर्फी प्रेमातिरेक; ‘ती’ च्या घरासमोर घेतला विषाचा घोट, वारंवार पाठलाग

By प्रदीप भाकरे | Updated: October 1, 2023 13:56 IST

Amravati: एकतर्फी प्रेमातिरेकामधून एका तरूणाने कथित प्रेयसीच्या घरासमोर जाऊन विषाचा घोट घेण्याचा प्रयत्न केला.

- प्रदीप भाकरेअमरावती - एकतर्फी प्रेमातिरेकामधून एका तरूणाने कथित प्रेयसीच्या घरासमोर जाऊन विषाचा घोट घेण्याचा प्रयत्न केला. तथा प्रेयसीला फसविण्याची धमकी दिली. १ एप्रिलापासून ते ३० सप्टेंबरपर्यंत दररोज तो तिचा पाठलाग करत असून जवळीक साधण्याचा प्रयत्न करीत असल्याने अखेर तिने फ्रेजरपुरा पोलीस ठाणे गाठले.

पोलिसांनी याप्रकरणी, पिडित तरूणीच्या तक्रारीवरून ३० सप्टेंबर रोजी आरोपी लोकेश धाडवे (२३, रा. रहाटगाव) याच्याविरूध्द धमकी व विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला. तक्रारीनुसार, फिर्यादी व आरोपी हे एका मेडीकल स्टोअरमध्ये सोबत काम करत होते. तेव्हा आरोपी हा तरूणीसोबत व्यवस्थित राहायचा. परंतू गतवर्षी एप्रिलमध्ये लोकेशने मी तुझ्यासोबत लग्न करणार आहे, मला तू खुप आवडतेस, असे तिला प्रपोज केले. मात्र तिने त्याला नकार दिला. काही दिवसांनी तरूणीने त्या मेडिकल शॉपीमधील काम सोडले. दरम्यान यंदाच्या एप्रिलमध्ये आरोपी हा फिर्यादी तरूणीच्या घराजवळ आला. मी तुला सोडणार नाही, अशी धमकी तिला दिली. तेव्हापासून त्याने तिचा वारंवार पाठलाग चालविला. तिच्या घरासमोर तो चकरा मारायला लागला. एप्रिलनंतर एक दिवस तर त्याने तिच्या घराजवळ येऊन विष पिण्याचा प्रयत्न केला. तथा तिला पोलीस कारवाईत फसविण्याची धमकी दिली.

तर तुला बदनाम करेन३० सप्टेंबर रोजी दुपारी १२ च्या सुमारास पिडित तरूणी घरी असताना आरोपी लोकेश धाडवे तिच्या घरासमोर पोहोचला. तिच्या घरासमोर जात तू माझ्यासोबत लग्न केले नाहीस, तर मी तुला बदनाम करेन, अशी गर्भित धमकी दिली. त्याच्या या माथेफिरू वागण्यामुळे तिच्यासह तिच्या कुटुंबिय देखील भयभीत झालेत. त्यामुळे शनिवारी रात्रीच्या सुमारास तिने पालकांसह फ्रेजरपुरा पोलीस ठाणे गाठले. तो आपल्याशी जवळीक साधण्याचा प्रयत्न करतो, वारंवार पाठलाग करत असल्याची तक्रार तिने नोंदविली.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीAmravatiअमरावती