शहरं
Join us  
Trending Stories
1
हगवणे कुटुंब राक्षसी, त्यांना चौकातच फाशी देण्यात यावी : विजय वडेट्टीवार
2
बोलण्यावर संयम ठेवा, ऑपरेशन सिंदूरवर अनावश्यक विधाने टाळा; PM मोदींच्या BJP नेत्यांना सूचना
3
पुढचा प्लॅन काय? धोनीनं घरची ओढ अन् या गोष्टीवर प्रेम व्यक्त करत असा टाळला तो विषय
4
त्या निवेदनातून माझे नाव वगळा, दुसरे नाव टाका;पोलिस महानिरीक्षक जालिंदर सुपेकरांची ऑडिओ क्लिप व्हायरल
5
भारताला चीनपासून सर्वात मोठा धोका, चहुबाजूंनी घेरण्यासाठी विणतोय जाळं, अमेरिकेच्या गोपनीय अहवालातून गौप्यस्फोट 
6
GT ला मोठा धक्का! CSK वर पहिल्यांदाच आली तळाला राहण्याची वेळ; पण जाता जाता त्यांनी MI ला दिलं गिफ्ट
7
निरा डावा कालव्याला भगदाड..! बारामती परिसरात नागरिकांच्या घरात-शेतात पाणीच पाणी
8
धक्कादायक! चेंजिंग रूममध्ये कॅमेरा बसवला होता, महिलांचे कपडे बदलतानाचे व्हिडीओ व्हायरल
9
'...तर तुम्हाला रस्त्यावर फिरू देणार नाही', जरांगे पाटलांचा मुख्यमंत्री फडणवीसांना थेट इशारा
10
"मी एका खोलीच्या घरात राहतो, कर्जबाजारी..."; सीबीआयच्या आरोपपत्रावर सत्यपाल मलिक म्हणाले,...
11
पीएम मोदींचा पाकिस्तान दौरा अन् 2016 चा पठाणकोट हल्ला..; शशी थरुर यांचे मोठे वक्तव्य
12
ऑपरेशन सिंदूरमधील नामुष्कीनंतर पाकिस्तान सुधरेना, अण्वस्त्रांबाबत रचतोय भयंकर डाव, अमेरिकेच्या अहवालातून गौप्यस्फोट
13
दुसरी मुलगी झाली म्हणून टोमणे; अमरावतीत ‘सीएचओ’ची आत्महत्या
14
व्लादिमीर पुतीन यांच्या हेलिकॉप्टरवर युक्रेनकडून ड्रोन हल्ला, बालंबाल बचावल्याचं वृत्त   
15
Monsoon Update : आनंदाची बातमी! या राज्यांमध्ये मान्सूनचे दमदार आगमन; मुसळधार पावसाचा इशारा, महाराष्ट्रात कधी येणार?
16
GT चं काही खरं नाही; तळाला असलेल्या CSK च्या बॅटर्संनी केला मोठा धमाका
17
रशियाने युक्रेनवर आतापर्यंतचा सर्वात मोठा हल्ला केला, ३६७ ड्रोन, क्षेपणास्त्रे डागली
18
Tejashwi Yadav : “मला हे आवडत नाही आणि मी ते सहनही करू शकत नाही”; तेजस्वी यादव यांनी स्पष्टच सांगितलं
19
मोदींच्या नेतृत्वात एनडीएचे जोरदार शक्तीप्रदर्शन; २० मुख्यमंत्री, १७ उपमुख्यमंत्री बैठकीला हजर...
20
'आमच्या 24 कोटी लोकांचे जीवन...', पाकिस्तानची सिंधू पाणी करारासाठी UN मध्ये धाव

एकाचा नमुना निगेटिव्ह; दुसऱ्याचा प्रलंबित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 31, 2020 05:01 IST

शहरात क्रॉकरीचा व्यवसाय करणारे एक दाम्पत्य मेरठला गेले. तेथे त्यांचा अहवाल ‘कोरोना पॉझिटिव्ह’ आल्याने रविवारी शहरात खळबळ उडाली होती. त्या अनुषंगाने हे कुटुंबीय वास्त्यव्यास असलेला हैदरपुरा भागातील दीड किमीचा परिसर महापालिकेचे आयुक्त प्रशांत रोडे यांनी ‘बफर झोन’ घोषित केला तसेच आरोग्य सेविका व आशा यांच्या दहा पथकांद्वारे तातडीने सर्र्वेक्षणाचे आदेश दिले होते. त्यानुसार रविवारपासून या परिसरात पथकाच्या गृहभेटी सुरू झाल्या.

ठळक मुद्देप्रशासनाचे ‘मिशन हैदरपुरा’ : इर्विन क्वारंटाइनमध्ये सात, वलगावच्या संत गाडगेबाबा वृद्धाश्रमात ११ व्यक्ती

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : शहरातील हैदरपुरा भागात घोषित बफर झोनच्या दीड किमी क्षेत्रात दहा पथकांद्वारे गृहभेटी पूर्ण झालेल्या आहेत. यामध्ये कोणीही संशयित रुग्ण आढळून आलेला नाही. मेरठमध्ये कोरोना पॉझिटिव्ह आढळून आलेल्या दाम्पत्याच्या दोन मुलांचे नमुने रविवारी तपासणीसाठी पाठविले होते. यापैकी एकाचा अहवाल निगेटिव्ह आला, तर एक अहवाल प्रलंबित आहे. सर्दी, ताप असणाºया सात व्यक्तींना इर्विन, तर ११ व्यक्तींना वलगाव येथील संत गाडगेबाबा वृद्धाश्रमात क्वारंटाइन केल्याची माहिती जिल्हाधिकाऱ्यांनी दिली.शहरात क्रॉकरीचा व्यवसाय करणारे एक दाम्पत्य मेरठला गेले. तेथे त्यांचा अहवाल ‘कोरोना पॉझिटिव्ह’ आल्याने रविवारी शहरात खळबळ उडाली होती. त्या अनुषंगाने हे कुटुंबीय वास्त्यव्यास असलेला हैदरपुरा भागातील दीड किमीचा परिसर महापालिकेचे आयुक्त प्रशांत रोडे यांनी ‘बफर झोन’ घोषित केला तसेच आरोग्य सेविका व आशा यांच्या दहा पथकांद्वारे तातडीने सर्र्वेक्षणाचे आदेश दिले होते. त्यानुसार रविवारपासून या परिसरात पथकाच्या गृहभेटी सुरू झाल्या. सोमवारी दुपारी हे काम पूर्ण झाले. यामध्ये ‘कोरोना’संशयित रुग्ण आढळला नसल्याची माहिती महापालिका आयुक्तांनी दिली. हा बफर झोन आता होम क्वारंटाइन राहणार काय, या मुद्द्यावर आयुक्तांनी बोलणे टाळले. सध्या संचारबंदी असल्याने सर्व नागरिक घरीच असल्याचे ते म्हणाले.दरम्यान, मेरठ येथे बाधित आढळलेल्या रुग्णांचा संपर्क कोणाशी आला, याची कसून चौकशी सुरू आहे. या परिसरात दोन आॅटोरिक्षांद्वारे जनजागृती करण्यात येत आहे, शिवाय या भागात सॅनिटायझर फवारणी करण्यात आली. गृहभेटीचा अहवाल जिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण अध्यक्ष शैलेश नवाल यांना सादर केला जाईल, असे महापालिका प्रशासनाने सांगितले.कंटेनमेंटमध्ये २, बफर झोनमध्ये ३ चेकपोस्टबफर झोन असणाºया दीड किमी परिसरात पोलिसांची करडी नजर आहे. गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक दीपक कुरळकर दोन दिवसांपासून या ठिकाणी भेटी देत आहेत. परिमंडळ क्रमांक २ चे उपायुक्त शशिकांत सातव यांनीही या परिसरात भेटी दिल्यात. पोलीस सूत्राच्या माहितीनुसार कंटेनमेंट झोनमध्ये दोन व बफर झोनमध्ये तीन चेकपोस्ट लावण्यात आले आहेत. रहमतनगर, रोशननगर, हैदरपुरा व रोशननगर २ मध्ये हे पॉइंट आहेत. खोलापुरी गेटचे ठाणेदार अतुल घारपांडे व नागपुरी गेटचे ठाणेदार अर्जुन ठोसरे यांच्यासह अधिकारी व पोलीस कर्मचारी तसेच १५ होमगार्ड व मुख्यालयाचे १५ पोलीस या भागावर लक्ष ठेवून आहेत.संशयित रुग्ण कुणीही नाही. ‘त्या’ परिवारातील दोनपैकी एका मुलाचा अहवाल निगेटिव्ह आहे व दुसरा प्रलंबित आहे. १८ व्यक्तींना आयसोलेशन क्वारंटाइनमध्ये ठेवण्यात आले आहे.- शैलेश नवालजिल्हाधिकारीपथकाद्वारे या परिसरातील गृहभेटी पूर्ण झाल्यात. या विषयीचा अहवाल जिल्हाधिकाºयांना देण्यात येईल. या भागात अधिकारी व पदाधिकाºयांच्या मदतीने जनजागृती करण्यात येत आहे.- प्रशांत रोडेआयुक्त, महापालिका 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या