शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
4
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
7
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
8
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
9
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
10
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
11
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
12
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
13
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
14
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
15
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
16
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
17
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
18
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
19
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
20
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
Daily Top 2Weekly Top 5

तरुणीचे अपहरण केल्याप्रकरणात एकावर गुन्हा दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 28, 2021 04:13 IST

अमरावती : पूर्वीच्या प्रेमसंबंधातून गोड बोलून तिचे बरेवाईट करण्याच्या हेतूने तरुणीचे अपहरण करणाऱ्यावर चंदननगर पोलिसांनी गुन्हा दाखल केला. सागर ...

अमरावती : पूर्वीच्या प्रेमसंबंधातून गोड बोलून तिचे बरेवाईट करण्याच्या हेतूने तरुणीचे अपहरण करणाऱ्यावर चंदननगर पोलिसांनी गुन्हा दाखल केला. सागर गुंडव (रा. चांदूरबाजार, जि.अमरावती) असे त्याचे नाव आहे. याप्रकरणी प्रतीक बापूराव गेडाम (२४, रा. हडपसर) यांनी फिर्याद दिली आहे. फिर्यादी यांच्या ३० वर्षांच्या बहिणीचे १० वर्षांपूर्वी आरोपीबरोबर प्रेमसंबंध होते. आरोपी वाईट चालीचा असल्याचे समजल्यावर तिने त्यांच्याशी संबंध तोडले. त्यामुळे गुंडव याने अमरावती येथील त्यांच्या घरी जाऊन तोडफोड व नासधूस केली होती. त्यानंतर फिर्यादीची बहिणी पुण्यात वडगाव शेरी येथील जय अपार्टमेंटमध्ये रहायला आली होती. सागर याने तिच्याशी गोड बोलून तिला १३ मार्च रोजी घेऊन गेला. त्यानंतर ती कोठेच मिळून आली नाही. चंदननगर पोलिसांनी बेपत्ता असल्याची तक्रार नोंदविली होती.

अमरावती पोलिसांनी केलेल्या तपासात चांदूरबाजार येथे या तरुणीचा डबा व कपडे सापडले. मात्र, तिचा काहीही संपर्क होऊ शकला नाही. त्यामुळे तिच्या भावाच्या फिर्यादीनंतर चंदननगर पोलिसांनी अपहरणाचा गुन्हा दाखल केला आहे़.

याबाबत चंदननगरचे पोलीस निरीक्षक थोपटे यांनी सांगितले की, आरोपी सापडला असला तरी ही तरुणी न मिळाल्यामुळे अपहरणाचा गुन्हा दाखल केला आहे. तिच्या आईवडिलांनी तक्रार दिल्याने चांदूरबाजार पोलिसांनी सागर गुंडव याला अटक केली. त्याला येत्या २ दिवसात ताब्यात घेऊन अधिक तपास करण्यात येणार आहे.