नया आकोलानजीकची घटना : चालकांचे नियंत्रण सुटल्याने अपघातअमरावती : भरधाव कार झाडावर आदळून एक ठार, दोन जण गंभीर झाल्याची घटना रविवारी दुपारी वलगाव ते चांदूरबाजार मार्गावरील नया अकोलानजीक घडली. अजय आर. रघुवंशी (४५,रा. देवरणकर नगर) मृताचे तर, सुहास कुळकर्णी (रा. औरंगाबाद) व संजय अशोक श्रीखंडे (रा. मुदलीयारनगर) असे जखमीचे नाव आहे. पोलीस सूत्रानुसार, मृत स्टेट बँकेचे अधिकारी असून त्यांची शिरजगाव बंड येथे शेती आहे. रविवारी सकाळी ते सुहास कुळकणी व संजय अशोक श्रीखंडे यांच्यासोबत कार एमएच २७-एसी- ३०२० ने गेले होते. दुपारच्या सुमारास परत अमरावतीकडे येत असताना त्यांचा नया अकोल्याजवळील वेटाळबाबा मंदिराजवळ कारवरील नियंत्रण सुटले व भरधाव कार मार्गालगतच्या झाडावर आदळली. या भीषण अपघातात कारचा चुराडा झाला. यामध्ये अजय रघुवंशी यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला. सुहास कुळकर्णी व संजय श्रीखंडे गंभीर जखमी झाले. घटनेची माहिती मिळताच वलगाव पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. जखमींना तत्काळ जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, त्यांची प्रकृती गंभीर असल्यामुळे दोंन्ही जखमींना खासगी रुग्णालयात हलविण्यात आले. पुढील तपास वलगाव ठाण्याचे पोलीस निरीक्षक बयस यांच्या मार्गदर्शनात पोलीस कर्मचारी करीत आहे. (प्रतिनिधी)
कार झाडावर आदळल्याने एक ठार, दोन गंभीर
By admin | Updated: December 21, 2015 00:05 IST