शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs ENG : टीम इंडियाने 'बॅझबॉल'वाल्यांची जिरवली.. संयम अन् धैर्याची लढाई जिंकली; सामना अनिर्णित
2
अहिल्यानगरमध्ये संविधान भवन उभारले जाणार, उपमुख्यमंत्री अजित पवार यांची घोषणा!
3
रेल्वे रुळ ओलांडताना एक्स्प्रेसनं उडवलं, तिघांचा मृत्यू, माढा येथील घटना!
4
IND vs ENG : स्टोक्स हात मिळवायला आला; पण जड्डू-वॉशिंग्टन दोघांनी आम्ही नाही जा.. म्हणत ठोकली सेंच्युरी
5
Pune Rave Party: 'त्या' दोन रुममध्ये तीन दिवसांपासून रेव्ह पार्टी? कधीपासून बुक होत्या रुम, बिल बघितलं का?
6
मुंबई: बँकेकडून आलेल्या महिलेला मागून धरलं, मानेवर चुंबन घेतलं अन् 'नको तिथे' हात...
7
पाकिस्तानमध्ये बस दरीत कोसळून नऊ जण ठार, दोन लहान बाळांचाही समावेश, ३०हून अधिक जखमी
8
Thane Crime: पालन पोषणाचा खर्च परवडेना, पोटच्या तिन्ही मुलींना पाजलं विष, आईला अटक!
9
VIDEO : स्टोक्सनं दुखावलेल्या खांद्यासह गिलला मारला हाताला झिणझिण्या आणणारा बाउन्सर; मग...
10
Pune Rave Party : पुण्यातील 'त्या' हॉटेलचे बुकिंग कुणाचा नावावर झाले होते ? पोलिसांनी दिली महत्वाची माहिती
11
IND vs ENG : वॉशिंग्टनसह जड्डूची फिफ्टी; टीम इंडियावरील मोठ संकट टळलं, पण...
12
Pune Rave Party : प्रांजल खेवलकरांसह सातही आरोपींना 2 दिवसांची पोलीस कोठडी
13
Pune Rave Party: रेव्ह पार्टीतील त्या दोन तरुणी कोण? पोलिसांना फ्लॅटमध्ये काय काय सापडलं?
14
बिजापूरमध्ये सुरक्षा दलांची मोठी कारवाई, १७ लाख रुपयांचे बक्षीस असलेले ४ नक्षलवादी ठार
15
Raigad Boat Capsized: रायगडमध्ये मासेमारीसाठी गेलेली बोट समुद्रात बुडाली, ५ जणांनी नऊ तास पोहून समुद्रकिनारा गाठला, ३ जण बेपत्ता!
16
'मी दोन वेळा मरता मरता राहिलोय'; धनंजय मुंडेंनी मन केलं मोकळं; मंत्रि‍पदाबद्दलही बोलले
17
Crime : आईवडिलांनी लेकीच्या नावावर केली जमीन, चिडलेल्या मुलाने तिघांचीही कुऱ्हाडीने केली हत्या
18
VIDEO: राज ठाकरे तब्बल ६ वर्षांनंतर 'मातोश्री'मधील स्व. बाळासाहेब ठाकरेंच्या खोलीत गेले अन्...
19
IND vs PAK : भारतीय सेनेचा अभिमान वाटतो, ही फक्त नौटंकी होती का? सोशल मीडियावर BCCI विरोधात संतप्त प्रतिक्रिया
20
Pune Rave Party Crime : रेव्ह पार्टीपूर्वी पुण्यातील या दोन ठिकाणी झाल्या पार्ट्या; नेमकं काय घडलं ?

गोळीबारात एक ठार, चार जखमी, तीन अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 25, 2017 01:07 IST

जुन्या वैमनस्यातून शनिवारी रात्री ११ वाजताच्या सुमारास अलहिलाल कॉलनीत दोन गटातील वाद उफाळून आला. एका गटाने दुसºया गटावर गोळीबार केल्याने एक ठार, तर चार जखमी झाले.

ठळक मुद्देजुन्या वादावरून टोळीयुद्ध भडकले : अलहिलाल कॉलनीतील घटना, चोख बंदोबस्त

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : जुन्या वैमनस्यातून शनिवारी रात्री ११ वाजताच्या सुमारास अलहिलाल कॉलनीत दोन गटातील वाद उफाळून आला. एका गटाने दुसºया गटावर गोळीबार केल्याने एक ठार, तर चार जखमी झाले. अन्सार शहा जमील शहा (२८, रा. अलहीलाल कॉलनी) असे मृताचे नाव आहे. या हल्ल्यात राजीक ऊर्फ राजा शहा युसूफ शहा (३५), शाकिर शहा बसीर शहा (३२) आणि नौशाद शाह मुस्ताक शाह (२८, सर्व रा. हबीबनगर) जखमी झाले आहेत.या प्रकरणात पोलिसांनी रविवारी दुपारी मुख्य आरोपी शेख मन्नान, त्याचा मुलगा शेख सलमान शेख मन्नान व शेख हन्नान या तिघांना अटक केली. या घटनेत शेख अयुब शेख बाबर (३४, रा.हबीबनगर न. १) यांच्या तक्रारीवरून गाडगेनगर पोलिसांनी आरोपी शेख मन्नान, शेख सलमान शेख मन्नान, शेख इस्माईल, शेख वसीम व अन्य दोघाविरुद्ध भादंविच्या कलम ३०२, ३०७, ३२६, १४७, १४८, १४९, शस्त्र अधिनियम ३, २७ व मुंबई पोलीस अधिनियमान्वये गुन्हा नोंदविला आहे. तक्रारीनुसार जुन्या वादाचा समझौता करण्यासाठी शेख अयुब शेख बाबर, मृतक अन्सार व अन्य जखमींसोबत शनिवारी रात्री मुख्य आरोपी मन्नानच्या घरी गेले होते. दरम्यान झालेल्या वादानंतर आरोपींनी चायना चाकूने हल्ला चढवून जीवे मारण्याचा प्रयत्न केला. दरम्यान शेख सलमान याने देशी कट्ट्यातून गोळीबार केल्याने अन्सार शाहचा घटनास्थळीच मृत्यू झाला, तर अन्य चाकूच्या हल्ल्यात अन्य जण गंभीर जखमी झाले. या घटनेमुळे टोळी युद्ध भडकण्याची शक्यता वर्तविली जात आहे.रविवारी दुपारी अन्सार शाह जमाल शाह याच्या मृतदेहाचे शवविच्छेदन करण्यात आले. त्यानंतर त्याच्या पार्थिवावर अत्यंसंस्कार केले.त्या पोलिसाची चौकशीआरोपी मन्नान हा ट्रकचोरी प्रकरणाशी जुळला असून त्याच्या या अवैध व्यवसायात एक पोलीस शिपाई साथ देत असल्याची माहिती पुढे आली आहे. घटनेच्या तासभरापूर्वी एका पोलीस शिपायाने मन्नानसोबत फोनवर चर्चा केल्याचे समजते. या घटनेच्या अनुषंगाने त्या पोलीस शिपायाची चौकशी केली जाणार असून त्याचा या घटनेत हस्तक्षेप आहे कि नाही, ही बाब वरिष्ठ पोलीस अधिकारी पडताळणी करीत आहे.शेख सलमानने डोक्यात झाडल्या तीन गोळ्याशेख अयुबच्या तक्रारीनुसार, शेख सलमान शेख मन्नान याने पांढºया रंगाची छोटी बंदूक काढून अन्सार शाहच्या डोक्यात तिन गोळ्या झाडल्या. त्यामुळे अन्सारचा जागीच कोसळून मृत्यू झाला. यावेळी चाकू हल्ल्यात जखमी झालेल्या शेख अयूबचे बयाण पोलिसांनी नोंदविले असून त्याच्या तक्रारीवरून गुन्हा नोंदविला आहे.विविध चर्चेला उधाणगोळीबार प्रकरणी शहरात विविध चर्चेला उधाण आले आहे. दोन्ही गटातील हा वाद जुन्या वैमनस्यातून उदभवल्याचे पोलीस सांगताहेत. मात्र, तीन दिवसांपूर्वी व्हॉलीबॉल ग्राऊन्डवर दोन्ही गटाचा वाद झाला. आरोपी मन्नान हा ट्रक चोरी व्यवसायाशी जुळला होता. त्यासंबंधानेही दोन्ही गटात वाद होता. मन्नानचा मुलगा सलमान हा रेसर बाईक परिसरातून वेगवान चालवून जोरजोरात हॉर्न वाजवित चालवित होता. एका गुन्ह्यात मुद्दाम अडकविण्यात आल्याचाही वाद होताच. मृतक, जखमी व आरोपी हे एकमेकांशेजारीच राहणारे असून त्यांच्यात अशाप्रकारच्या मुद्द्यावरून अनेकदा खटकेउडायचे. शनिवारी सर्व जुने वाद उफाळून आल्यामुळेच ही घटना घडल्याची चर्चा आहे.सीपी नागपुरी गेट ठाण्यातगाडगेनगर हद्दीत घडलेल्या गोळीबाराच्या घटनेच्या अनुषंगाने पोलीस आयुक्त दत्तात्रय मंडलिक नागपुरी गेट ठाण्यात पोहोचले. या घटनेची कसून चौकशी केल्यानंतर त्यांनी आरोपींना अटक करण्यासाठी पोलिसांना मार्गदर्शन केले. आरोपींना पकडण्यासाठी पाच पथके तयार करण्यात आली होती. त्यामध्ये गाडगेनगर, नागपुरी गेट, गुन्हे शाखेच्या पथकाचा समावेश होता. पोलिसांनी आरोपींच्या काही नातेवाईकांना ताब्यात घेऊन चौकशी सुरू केली. दुपारपर्यंत तीन आरोपींना अटक करण्यात पोलिसांना यश आले आहे.