शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
4
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
5
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
6
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
7
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
8
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
9
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
10
राहुल गांधी एकाकी?, LPG मुद्द्यावर काँग्रेसमध्ये फूट पडल्याचं चित्र; नेते करताहेत PM मोदींचे कौतुक
11
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
12
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
13
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
14
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
15
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
16
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
17
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
18
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
19
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
20
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
Daily Top 2Weekly Top 5

सूक्ष्म सिंचनाचे एक कोटींचे अनुदान रखडले

By admin | Updated: July 23, 2016 00:47 IST

तालुक्यातील दोन वर्षांकरिता शासनाच्या कृषी विभागाने दीड कोटींचे काम देण्यात आले होते.

कृषी विभागाचे दुर्लक्ष : दोन वर्षांपासून शेतकरी प्रतीक्षेत चांदूररेल्वे : तालुक्यातील दोन वर्षांकरिता शासनाच्या कृषी विभागाने दीड कोटींचे काम देण्यात आले होते. त्यातील २०१४-१५ चे ६६ लाख २६ हजार मंजुरीच्या प्रतीक्षेत आहेत. त्यावेळी ही २०१५-१६ चे १५ लाख १९ हजार मंजूर झाले. उर्वरित रुपयांचे प्रस्ताव शासनाकडे सादर करून अनुदान शेतकऱ्यांना प्राप्त न झाल्याने शासनाच्या प्रशासनाची ठिबक सिंचन अनुदान शेतकऱ्यांना देण्याचे आश्वासन फोल ठरल्याने शेतकरी वर्ग तीव्र नापसंती व्यक्त करीत आहेत. चांदूररेल्वे तालुक्यातील २०१४-१५ चे कालावधीसाठी १ कोटीचे अनुदान ठिबक योजने अंतर्गत लक्षीक देण्यात आले होते. त्यापैकी ४४० शेतकऱ्यांचे प्रस्ताव प्राप्त झाले. त्यापैकी १५८ शेतकऱ्यांचे ठिबक सिंचन अनुदानाने प्रस्ताव मंजूर झाले व कृषी विभागांना सादर करण्यात आले. त्यापैकी २८२ शेतकऱ्यांचे ६६ लाख २६ हजार मंजूरीसाठी शासनाकडे पडून आहे. २०१५-१६ चे कालावधीसाठी ठिबक सिंचनचे ६६९ प्रस्ताव कृषी विभागाला प्राप्त झाले. त्यांचे लाक्षिक ५० लाख होते. त्यापैकी५२ शेतकऱ्यांचे १५ लाख १९ हजार मंजूर झाले. त्यापैकी ३४लाख८१ हजार अजूनही शासनाकडे मंजुरीच्या प्रतीक्षेत आहे. एकूण १ कोटी रुपये शासनाकडे प्रस्ताव सादर आहे.महाराष्ट्र शासन शेतकऱ्याच्या हिताचे विविध योजना जाहीर करतात. ठिबक सिंचन योजनेचे अनुदान त्वरित देण्याची घोषणा केली. परंतु अनुदान प्राप्त न झाल्याने ही घोषणा फोल ठरेल काय, अशी चर्चा शेतकरी वर्गात सुरु आहे. शेतकऱ्यांनी कृषी सेवा केंद्राकडून ठिबक सिंचन खरेदी केले. आज-उद्या येईल, या आशेवर शेतकरी वर्ग आश धरून आहे. याबाबत वरिष्ठ स्तराव त्वरित निर्णय घेणे अपेक्षित आहे. शेतकरी संघटनेचे न्यायासाठी लढा देणारे नेते शासनात असले तरी या बाबत नेते निर्णय घेतील अशी आज्ञा शेतकरीवर्ग व्यक्त करीत आहे.