शहरं
Join us  
Trending Stories
1
छांगुर बाबावर EDची मोठी कारवाई! मुंबई, लखनौमध्ये छापे; ६० कोटींहून जास्तीचे मनी लाँड्रिंग उघड
2
"मी कोणाला छेडत नाही; पण मला कुणी त्रास दिला तर..."; एकनाथ शिंदेंचा उबाठा गटाला इशारा
3
महाराष्ट्र मराठी माणसाच्या बापाचाच! इथे कुणी वेडंवाकडं वागायचा प्रयत्न केला तर...- राज ठाकरे
4
"आता दुकाने नाही शाळाच बंद करेन"; त्रिभाषा सूत्रावरुन राज ठाकरेंनी सरकारला दिला इशारा
5
वैभव सूर्यवंशीच्या 'त्या' कृत्यामुळे मोठा गोंधळ; विराट कोहलीचे चाहते प्रचंड संतापले, कारण...
6
"जो भारताचा नागरिक नाही...", बंगालमधील दुर्गापूरमध्ये पंतप्रधान मोदींची सभा; घुसखोरांना इशारा दिला
7
भाजपा आमदाराच्या काकांना पालिका कर्मचाऱ्यांकडून लाठ्याकाठ्यांनी बेदम मारहाण, कारण काय?  
8
करुण नायरला दोन्ही टेस्टमध्ये संधी मिळेल! फ्लॉप शोनंतरही कोचला त्याच्यावर 'भरवसा'
9
"विधिमंडळात हे माझे ३६वे वर्ष, पण एवढ्या वर्षात..."; जयंत पाटील यांना नेमकी कसली खंत?
10
काल युद्धाचा इशारा, आज राजधानी सोडून पळून गेले... सिरियाचे राष्ट्राध्यक्ष अल-शारांचा अजब कारभार
11
नारायणपूरमध्ये सुरक्षा दलांना मोठे यश, चकमकीत ६ नक्षलवादी ठार
12
IND vs ENG ...तर रिषभ पंतला प्लेइंग इलेव्हनमध्ये खेळवू नका! शास्त्रींनी दिला गिल-गंभीर जोडीला सल्ला
13
ITI प्रवेशासाठी 'अनुसूचित जाती' व 'अल्पसंख्याक'चा दुहेरी लाभ घेणाऱ्यांवर होणार कारवाई
14
Dukes Ball Controversy : विषय हार्ड! चेंडूच्या क्वॉलिटी संदर्भातील मुद्द्यावर कंपनी घेणार रिव्ह्यू
15
"कुणाचा बाप आला... बापाचा बाप आला... आजोबा आला तरी मुंबई...", CM देवेंद्र फडणवीसांनी ठणकावलं
16
भीषण अपघातात ट्रकखाली चौघे शंभर फूट फरफटत गेले, पित्यासह दोन चिमुकल्यांचा मृत्यू
17
बौद्ध भिक्षूंचे 80 हजारहून अधिक अश्लील फोटो-व्हिडिओ; ब्लॅकमेल करून थायलंडमधील महिलेनं कमावले 102 कोटी
18
कॅनडामध्ये विमान हायजॅक! अधिकाऱ्यांमध्ये घबराट; मागून पाठवले F-35 लढाऊ विमान पण...
19
"CM फडणवीसांनी ४० फोन केले पण..."; ठाकरेंनी मतांची माती केली म्हणत एकनाथ शिंदेंनी सगळचं काढलं
20
गोपिचंद पडळकर यांच्या मागणीला मोठं यश, रायगडाजवळील निजामपूर ग्रामपंचायतीचं नाव बदललं

राज्यात २०० दिवसांमध्ये उकळली एक कोटींची लाच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 27, 2021 10:58 IST

Amravati News यंदा जानेवारी ते १९ जुलै या २०० दिवसांच्या कालावधीत राज्यातील ६०० लाचखोरांनी तब्बल १ कोटी ९ लाख ६९ हजार ६५० रुपयांची लाच उकळली.

ठळक मुद्देकोरोनाकाळातही लाचखोरी सुसाटगतवर्षीच्या तुलनेत ३१ टक्के ट्रॅप वाढले

प्रदीप भाकरे

 लोकमत न्यूज नेटवर्क अमरावती : यंदा जानेवारी ते १९ जुलै या २०० दिवसांच्या कालावधीत राज्यातील ६०० लाचखोरांनी तब्बल १ कोटी ९ लाख ६९ हजार ६५० रुपयांची लाच उकळली. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने या कालावधीत ४३५ ट्रॅप यशस्वी केले. गतवर्षीच्या पहिल्या सहामाहीच्या तुलनेत यंदाच्या पहिल्या सहामाहीत ट्रॅपपध्ये तब्बल ३१ टक्क्यांची वाढ नोंदविण्यात आली.

             यावर्षी झालेल्या ४३५ ट्रॅपमध्ये ६०० जणांना अटक करण्यात आली, तर गतवर्षी याच कालावधीत ३३१ ट्रॅपमध्ये ४६२ आरोपी होते. यंदा त्यात १०४ वाढीव ट्रॅपची भर पडली. म्हणजेच कोरोनाकाळातही लाचखोर सुसाट सुटल्याचे संतापजनक चित्र आहे. यावर्षी पहिल्या २०० दिवसांत एसीबीने जे ४३५ ट्रॅप यशस्वी केले, त्यात ६०० लाचखोरांना अटक करण्यात आली. यात वर्ग १ चे ४०, वर्ग २ चे ५६, वर्ग ३ चे ३४४, वर्ग ४ चे २९, ६३ खासगी लोक व ६८ खासगी व्यक्तींचा समावेश आहे. या ६०० जणांना तब्बल १ कोटी ९ लाख ६९ हजार ६५० रुपयांची लाच घेताना वा मागणी सिद्ध झाल्याने अटक करण्यात आली. यात वर्ग १ च्या लाचखोरांनी २८ लाख ४९ हजार लाच उकळली. वर्ग २ च्या अधिकाऱ्यांनी १५ लाख ८५ हजार २०० रुपये, वर्ग ३ च्या कर्मचाऱ्यांनी ५३ लाख ९१ हजार ७५० रुये, वर्ग ४ च्या कर्मचाऱ्यांनी ४ लाख ४ हजार, अन्य लोकसेवकांनी ३ लाख २६ हजार ९०० रुपये, तर खासगी व्यक्तींनी ४ लाख १२ हजार ८०० रुपये लाच म्हणून घेतल्याची नोंद एसीबीने घेतली आहे.

मार्चमध्ये सर्वाधिक ट्रॅप

यंदाच्या जानेवारीत एसीबीने ६२ ट्रॅप यशस्वी करीत ८७ आरोपींविरुद्ध गुन्हे दाखल केले. फेब्रुवारीत ६६ ट्रॅपमध्ये ८५, मार्चमध्ये ८८ ट्रॅपमध्ये ११९, एप्रिलमध्ये ४९ ट्रॅपमध्ये ६६, मेमध्ये ४७ मध्ये ७४, जूनमध्ये ७७ सापळ्यात १०३ तर, जुलैच्या १९ तारखेपर्यंत ४६ ट्रॅपमध्ये ६६ लाचखोरांना अटक करण्यात आली आहे.

टॅग्स :Bribe Caseलाच प्रकरण