शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
2
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
3
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
4
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
5
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
6
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
7
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
8
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
9
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
10
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
11
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
12
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
13
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
14
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
15
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
16
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
17
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
18
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
19
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
20
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
Daily Top 2Weekly Top 5

दीड लाखांचा चालान घोटाळा; प्राचार्यांवर ठपका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 23, 2018 23:21 IST

चिखली येथील शिवाजी महाविद्यालयात दीड लाखांचे चालान घोटाळ्याप्रकरणी प्राचार्य दोषी असल्याचा अहवाल कुलगुरू मुरलीधर चांदेकर यांना चौकशी समितीने सादर केला आहे. त्यामुळे प्राचार्य नीळकंठ भुसारी यांचेविरूद्ध कोणत्या स्वरूपाची कारवाई केली जाते, याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत.

ठळक मुद्देकुलगुरूंकडे चौकशी अहवाल : चिखली येथील शिवाजी महाविद्यालयाचे प्रकरण

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : चिखली येथील शिवाजी महाविद्यालयात दीड लाखांचे चालान घोटाळ्याप्रकरणी प्राचार्य दोषी असल्याचा अहवाल कुलगुरू मुरलीधर चांदेकर यांना चौकशी समितीने सादर केला आहे. त्यामुळे प्राचार्य नीळकंठ भुसारी यांचेविरूद्ध कोणत्या स्वरूपाची कारवाई केली जाते, याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत.बुलडाणा जिल्ह्यातील मोताडा येथील रमेश मंडळकर यांनी चिखली येथील शिवाजी महाविद्यालयाने दीड लाखांचे बोगस चालान जोडून विद्यापीठाची फसवणूक केल्याप्रकरणी तक्रार नोंदविली होती. त्याअनुषंगाने कुलगुरू चांदेकर यांनी चालान घोटाळाप्रकरणी राज्यपाल नामनिर्देशित व्यवस्थापन परिषदेचे सदस्य दिनेश सूर्यंवशी यांचे अध्यक्षेत चौकशी समिती नेमली होती. या समितीने कुलगुरूंकडे चौकशी अहवाल सादर केला आहे. विद्यापीठाकडून माजी विद्यार्थ्यांच्या परीक्षा अर्जाचे नियमन करण्यासाठी महाविद्यालयातील कर्मचाऱ्यांसाठी ४० रूपये अतिरिक्त दिले जाते. ही रक्कम परीक्षा अर्ज स्वीकारणाºया कर्मचाºयांना मिळणे अपेक्षित असते. मात्र, यातील प्रति अर्ज २० रूपयांची रक्कम ही प्राचार्य भुसारी हे आपल्याकडे ठेवत असल्याचा ठपका चौकशी समितीने ठेवला आहे. प्राचार्य भुसारी यांनी विद्यार्थ्यांचे परीक्षा अर्ज परीक्षेच्या तारखेपर्यंत महाविद्यालयाच्या कपाटात ठेवल्याचे चौकशीदरम्यान स्पष्ट झाले. परीक्षेच्या दोन दिवसांअगोदर प्रवेश पत्र घेण्यासाठी आलेल्या विद्यार्थ्यांना ही बाब लक्षात आली. तसेच त्याअगोदर विद्यापीठात जमा करण्यात आलेल्या परीक्षा अर्जांबरोबर स्टेट बँकेचा शिक्का व स्वाक्षरी असलेले बोगस चालान जोडण्यात आले होते. मात्र, प्रत्यक्षात चालान जोडलेल्या तारखेत ती रक्कम विद्यापीठाच्या खात्यावर जमाच झालेली नव्हती. त्यामुळे याप्रकरणी प्राचार्य भुसारी हे दोषी आढळले असून, त्यांचेवर कोणत्या स्वरूपाची कारवाई प्रस्तावित होते, याकडे विद्यापीठ वर्तुळाचा नजरा लागल्या आहेत.यापूर्वी शिवाजी शिक्षण संस्थेने प्राचार्य नीळकंठ भुसारी यांचेवर निलंबनाची कारवाई केली आहे. मात्र, आर्थिक अनियमितता झाल्याप्रकरणी आता गंभीर स्वरूपाची कारवाई करणे अपेक्षित आहे.चिखली येथील शिवाजी महाविद्यालयात चालान घोटाळाप्रकरणी चौकशी अहवाल रविवारी प्राप्त झाला आहे. या अहवालात नेमके काय आहे, हे तपासले जाईल. त्यानंतरच कोणत्या स्वरूपाची कारवाई प्रस्तावित असावी, हे स्पष्ट होईल.- मुरलीधर चांदेकर,कुलगुरू, संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठगत आठवड्यात प्राचार्य भुसारी यांच्यासंदर्भात चौकशी अहवाल कुलगुरुंकडे सादर केला आहे. यात आर्थिक अनियमितता झाली असून, विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान झाले. विद्यापीठाने चौकशी अहवाल शिवाजी शिक्षण पाठवावा असे कळविले आहे.- दिनेश सूर्यवंशी,सदस्य, व्यवस्थापन परिषद अमरावती विद्यापीठ