शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
3
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
4
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
5
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
6
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
7
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
8
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
9
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
10
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
11
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
12
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
13
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
14
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
15
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
16
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
17
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
18
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
19
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
20
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
Daily Top 2Weekly Top 5

विर्शीतील वृद्धाचा कुऱ्हाडीने वार करून खून, शेजाऱ्याच्या हत्येप्रकरणी आरोपीला जन्मठेप

By प्रदीप भाकरे | Updated: April 18, 2023 16:46 IST

सप्टेंबर २०१६ मधील घटना

अमरावती : वाडग्यातील वेल बकरीने खाल्ल्याच्या वादातून शेजाऱ्यावर कुऱ्हाडीने वार करून त्याचा जीव घेणाऱ्या आरोपीला स्थानिक न्यायालयाने आजन्म कारावास, पाच हजार रुपये दंड व दंड न भरल्यास एक वर्ष साधा कारावास अशी शिक्षा ठोठावली. जिल्हा न्यायाधीश क्रमांक २ पी. जे.मोडक यांनी मंगळवारी हा निर्णय दिला. आनंदराव सुखदेवराव बडक (५८, रा. विर्शी) असे शिक्षाप्राप्त आरोपीचे नाव आहे. 

१८ सप्टेंबर २०१६ रोजी सकाळी ९.१५ च्या सुमारास भातकुली तालुक्यातील विर्शी येथे खुनाची ती घटना घडली होती. हरिभाऊ शेंद्रे (५८, रा. विर्शी) असे मृताचे नाव आहे. हरिभाऊ यांच्या मालकीच्या बकरीने आनंदराव बडक याच्या वाडग्यातील कोहळा व वालाचे वेल खाल्ले. तेवढ्याच तुझ्या बकरीने माझ्या वाडग्यातील वेल खाल्ले, त्याची भरपाई कोण देणार, थांब तुला जीवाने मारून टाकतो, असे म्हणत आनंदरावने हरिभाऊ यांच्या डोक्यात व पायावर कुऱ्हाडीने वार केले. आरडाओरड होताच आरोपी तेथून पळून गेला. जखमी हरिभाऊ यांना जिल्हा सामान्य रूग्णालयातून नागपूरला हलविण्यात आले. मात्र नागपूर येथे त्याच दिवशी रात्री ८.५५ च्या सुमारास त्यांचा मृत्यू झाला. याप्रकरणी वलगाव पोलिसांनी आधी कलम ३०७ व हरिभाऊंच्या मृत्यूनंतर कलम ३०२ अन्वये गुन्हा दाखल केला. तत्कालिन ठाणेदार दत्तात्रेय गावडे यांनी दोषारोपपत्र दाखल केले.

दहा साक्षीदार तपासले

याप्रकरणी अतिरिक्त सरकारी अभियोक्ता कौस्तुभ लवाटे यांनी एकुण दहा साक्षीदार तपासले. घटनेचे प्रत्यक्ष साक्षीदार व सरकारी पक्षाचा युक्तीवाद ग्राह्य धरून न्यायालयाने आरोपी आनंदराव बडक याला हत्याप्रकरणी गुन्हेगार ठरविले. ताथ शिक्षा सुनावली. यात सहायक पोलीस उपनिरिक्षक सुधाकर माहुरे यांनी पैरवी अधिकारी म्हणून काम पाहिले. तथा नापोकॉ अरूण हटवार यांनी कामकाजात मदत केली.

टॅग्स :Courtन्यायालयCrime Newsगुन्हेगारीAmravatiअमरावती