शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
2
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
3
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
4
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
5
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
6
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
7
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
8
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
9
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
10
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
11
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
12
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
13
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
14
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
15
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
16
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
17
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
18
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
19
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
20
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
Daily Top 2Weekly Top 5

पाणीटंचाई, भारनियमनाच्या प्रश्नावर अधिकारी रडारवर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 11, 2022 05:00 IST

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती, हनुमान जयंती आणि पवित्र रमजान महिना या सारखे सर्वधर्मीय सण-उत्सव असून या सणासुदीच्या काळात आणि रखरखत्या उन्हात लोडशेडिंगमुळे नागरिक त्रस्त आहेत. सोबतच पाणीपुरवठा अनियमित व कमी प्रमाणात होत असल्याने नागरिकांना प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे. त्यामुळे पाणी प्रश्न अथवा वीजची समस्या त्वरित निकाल काढावी,अशी तंबी आमदार रवी राणा यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिली.

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : उन्हाची तीव्रता, पाणीटंचाईची स्थिती निर्माण झाली असताना अधिकारी मात्र वातानुकूलित दालनात बसून नागरिकांच्या समस्या, प्रश्नांकडे लक्ष देत नाही. चार दिवसांच्या आत पाणीटंचाई समस्या निवारण आणि विजेचा प्रश्नसोडविला गेला नाही,तर महाराष्ट्र जीवन प्राधिकरण व वीज वितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांना सडो की,पळो करून सोडेल, असा निर्वाणीचा इशारा आमदार रवि राणा यांनी शुक्रवारी घेतलेल्या आढावा बैठकीतून दिला. अमरावती शहर व तालुका, बडनेरा, भातकुली, दर्यापूर, अंजनगाव सुर्जी, अचलपूर, परतवाडा, चिखलदरा, चांदूर बाजार, धारणी, तिवसा शहरी व ग्रामीण भागातील नागरिकांना  पाण्याअभावी होणारा त्रास निवारण्यासाठी आमदार रवि राणा यांनी आढावा घेतला. मजीप्रा, एमएसईबी, महसूल, जिल्हा परिषद, महापालिका अधिकारी व कर्मचाऱ्यांची संयुक्त बैठक घेत  पाणीटंचाई व भारनियमनाचा सामना करावा लागू नये म्हणून तातडीने उपाययोजना करण्याचे निर्देश आमदार रवि राणा दिलेत.भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती, हनुमान जयंती आणि पवित्र रमजान महिना या सारखे सर्वधर्मीय सण-उत्सव असून या सणासुदीच्या काळात आणि रखरखत्या उन्हात लोडशेडिंगमुळे नागरिक त्रस्त आहेत. सोबतच पाणीपुरवठा अनियमित व कमी प्रमाणात होत असल्याने नागरिकांना प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे. त्यामुळे पाणी प्रश्न अथवा वीजची समस्या त्वरित निकाल काढावी,अशी तंबी आमदार रवी राणा यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिली. एप्रिल महिन्यात ही स्थिती आहे, तर  मे महिन्यात काय होईल, असा सवाल उपस्थित करून समस्या सोडविण्याचे निर्देश दिले. बैठकीला अधिकाऱ्यांसह भातकुली नगराध्यक्ष योगिता कोलटेके, उपाध्यक्ष प्रतीक कांडलकर, उमेश ढोणे, सुमती ढोके, आशिष गावंडे, आशिष कावरे, मयूरी कावरे, राजू रोडगे, ओंकार मोहोळ, खुशाल गोंडाणे, विनोद कदम, रिजवान, मंगेश चव्हाण, गिरीश कासट, शंकर डोंगरे, सुनील भोसले, पुरुषोत्तम खर्चान उपस्थित होते.

 

टॅग्स :Ravi Ranaरवी राणा