शेतकऱ्यांना दिलासा : रोहयोंतर्गत प्रयत्नअमरावती : रोजगार हमी योजनेंतर्गत कोरडवाहू शेती सिंचनाखाली आणण्याचा प्रयत्न शासनाने सुरू केला आहे. यात यंदाच्या आर्थिक वर्षात जिल्ह्यातील जास्तीत जास्त कोरडवाहू जमीन सिंचनाखाली आणण्यासाठी सिंचन विहिरींचे उद्दिष्ट्य देण्यात आले आहे. त्यामुळे मजुरांनाही रोजगाराची संधी उपलब्ध होणार आहे. पावसाच्या पाण्यावर अवलंबून असलेल्या शेतकऱ्यांना शेती उत्पादनासाठी अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. ही बाब डोळ्यासमोर ठेवून राज्य शासनाने राज्यातील प्रत्येक कोरडवाहू शेती सिंचनाखाली आणण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. यामध्ये शासनाच्या महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत विहिरी खोदण्याचा उपक्रम राबविला जात आहे. यासाठी पात्र लाभार्थ्यांना तीन लाख रुपयांपर्यंतचे अनुदान देण्याची तरतूद करण्यात आली आहे. जिल्हाभरात विहिरी खोदण्याचे उद्दिष्ट्य देण्यात आले आहे. भविष्यात किमान जास्तीत जास्त शेतजमिनी सिंचनाखाली येण्याची शक्यता आहे. मात्र या योजनेचा लाभ घेण्यासाठी किमान दीड ते चार एकर शेती हवी. शेतकरी हा केंद्र शासनाचा जॉब कार्डधारक असणे बंधनकार आहे. तसेच लाभार्थी शेतकऱ्यांनी स्वत:च्या विहिरीच्या खोदकामावर मजुरी करणे अनिवार्य आहे. (प्रतिनिधी)
रोजगार हमी योजनेत ३३२ विहिरींचे उद्दिष्ट
By admin | Updated: August 18, 2015 00:17 IST