शहरं
Join us  
Trending Stories
1
'भारताने ५ फायटर जेट पाडले'; पाकिस्तानचा थयथयाट, संरक्षण मंत्री आसिफ म्हणाले...
2
वैष्णो देवी दर्शनाचा मार्ग आणखी सुकर होणार; तर महाराष्ट्राला मिळणार आणखी एक वंदे भारत, 'या' मार्गावर धावणार?
3
महाराष्ट्रातील 'या' नऊ राजकीय पक्षांना निवडणूक यादीतून हटवले; निवडणूक आयोगाची कारवाई कुणावर?
4
नागपूर: महालक्ष्मी मंदिराच्या प्रवेशद्वाराचे छत कोसळले, अनेक मजूर जखमी; NDRF कडून शोध कार्य सुरू
5
'निघालो तेव्हा बाजार होता, परतलो तेव्हा स्मशान'; धरालीतील ढगफुटीनंतर लोकांनी सांगितला थरारक अनुभव
6
ती आली अन् पाहुणेही आले... हार, तोरणं, पताका आणि फुलांनी भव्य सभामंडपही सज्ज
7
कबुतरांना कारवर ट्रे ठेवून खाद्य, महेंद्र संकलेचाला पोलिसांचा दणका; गाडीही केली जप्त
8
'आधी तक्रार करायला सांगितलं नाही'; माजी मुख्य निवडणूक आयुक्त रावतांचं मोठं विधान, आयोगाबद्दल काय म्हणाले?
9
धक्कादायक! डोनाल्ड ट्रम्प यांनी फायद्यासाठी पहिल्या पत्नीला गोल्फ कोर्समध्ये पुरलं? केला जातोय असा दावा
10
निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय, देशभरातील तब्बल ३३४ पक्षांना दिला दणका   
11
महान तपस्वी, ऋषिमुनीसारखा तो २३३ वर्षांपासून देतो आहे आसरा
12
हा निर्णय सोपा नाही; त्यात संघातून बाहेर फेकले जाण्याचीही जोखीम! रहाणेचं बुमराहसंदर्भात मोठं वक्तव्य
13
जीर्ण पाईप फुटून आण्विक कचरा समुद्रात पडला, नौदलाच्या चुकीमुळे या देशात हाहाकार
14
'अजिबात तडजोड स्विकारणार नाही', डोनाल्ड ट्रम्प-पुतीन भेटीआधीच युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्कींचा इशारा
15
"देशात इंग्रजांच्या राजवटीपेक्षा भयंकर परिस्थिती, लोकशाही आणि संविधान गिळंकृत करू पाहणाऱ्या प्रवृत्तींनो चले जाव’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा इशारा
16
रिंकूच्या प्रॅक्टिस वेळी खासदार मॅडम प्रिया सरोज यांची थेट ग्राउंडमध्ये एन्ट्री, व्हिडिओ व्हायरल
17
मिस्टर इंडियाप्रमाणे तुरुंगातून गायब कैदी झाला, बाहेर गेला की आतच लपला? काही कळेना, झाडांपासून, गटारांपर्यंत पोलीस घेताहेत शोध  
18
भाजप खासदार निशिकांत दुबे आणि मनोज तिवारी यांच्या विरोधात गुन्हा, वैद्यनाथ मंदिर प्रकरण काय?
19
'शरद पवारांवर राहुल गांधींच्या भेटीचा परिणाम' निवडणूक आयोगाबाबत केलेलं वक्तव्य फडणवीसांना खटकलं
20
१५ दिवस चहा प्यायला नाहीत तर काय होईल? तुम्हाला आवडतील शरिरातील 'हे' ५ पॉझिटिव्ह बदल

ओबीसींना शिष्यवृत्ती, हीच ढोलेंना खरी श्रद्धांजली

By admin | Updated: April 20, 2017 00:19 IST

पांडुरंग ढोले यांनी दोन दशकांपासून ओबीसी विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती मिळवून देण्यासाठी लढा उभारला होता.

सर्वपक्षीय शोकसभा : खा. तडस, आ.जगताप, अरूण अडसड, यशवंत शेरेकरांसह मान्यवरांची उपस्थिती चांदूररेल्वे : पांडुरंग ढोले यांनी दोन दशकांपासून ओबीसी विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती मिळवून देण्यासाठी लढा उभारला होता. आता ओबीसी विद्यार्थ्यांना शंभर टक्के शिष्यवृत्ती मिळवून देणे, हिच पांडुरंग ढोलेंना खरी श्रद्धांजली ठरेल, असे प्रतिपादन सर्वपक्षीय शोकसभेच्या अध्यक्षपदावरून खा. रामदास तडस यांनी केले. येथील जुन्या मोटर स्टँडवर डॉ.पांडुरंग ढोलेंच्या सर्वपक्षीय शोकसभेचे आयोजन मंगळवारी करण्यात आले होते. ढोले यांना श्रद्धांजली अर्पण करण्याकरिता राष्ट्रीय जनता दलाचे सरचिटणीस कुंवर दानिश अली प्रामुख्याने उपस्थित होते. ५ एप्रिल रोजी राज्य जनता दलाची सभा डॉ. पांडुरंग ढोले यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली होती. शेतकरी-शेतमजुरांसाठी जो लढा जनता दलातर्फे राज्यात उभारला जाणार होता, त्याची माहिती ढोलेंनी दिली होती. त्यांचे कार्य जनता दल पुढे नेईल, असे मत कुंवर दानिश अली यांनी व्यक्त केले. मी या मतदारसंघातून निवडून येऊन मंत्री झालोे. याचे सर्व श्रेय पांडुरंग ढोले यांचे होते, असे माजी मंत्री यशवंत शेरेकर यांनी म्हटले. ढोलेंनी मालखेड पर्यटन स्थळ, आयटीआय, तंत्रनिकेतन आदींसाठी प्रयत्न करून चांदूररेल्वेचे वैभव वाढविल्याचा उच्चारही त्यांनी केला. ढोले यांचेशी कौटुंबिक संबंध होते. संघात ते माझ्यसोबत होते. त्यांची मदत आजही विसरलो नाही, असे माजी आमदार अरुण अडसड म्हणाले. ओबीसी वर्गासाठी संघर्षयात्रा, शिष्यवृत्ती, विदर्भ एक्स्प्रेसचा थांबा आदी आंदोलनांमुळे पांडुरंग ढोले हे तालुक्यातच नव्हे तर राज्यातील विरोधी पक्षांमध्येही ओळखले जात होते. कोणत्याही मागण्या शासन दरबारी मंजूर करून आणण्यात त्यांचा हातखंडा होता, असे प्रतिपादन आ.वीरेंद्र जगताप यांनी केले. जगताप यावेळी म्हणाले की, साधेसुधे नेतृत्व म्हणून त्यांची ओळख होती. त्यांनी अल्पसंख्यक, दलितांसाठी ओबीसी वॉर्डात आपली राजकीय वेगळी ओळख केली. त्याचा वारसा त्यांचे पूत्र क्रांतीसागर ढोले यांनी चालवावा, असेही ते म्हणाले. जनता दलाचे माजी आ. शरद पाटील राज्य महिला जनता दलाच्या अध्यक्ष मानकर, पीरिपाचे चरणदास इंगोले, माजी नगराध्यक्ष गणेश रॉय, झाडे गुरूजी, देवीदास राऊत, विनोद जोशी, अभिजीत ढेपे, सिटू सूर्यवंशी, वाघ, मधुकर सव्वालाखे, संजय आसोले आदींनी श्रद्धांजली वाहिली. शोकसभेचे सूत्रसंचालन विलास काळे यांनी तर आभार प्रदर्शन संजय डगवानी यांनी केले. (तालुका प्रतिनिधी)