शहरं
Join us  
Trending Stories
1
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
2
भारताची धास्ती घेत पाक लष्कराची सीमेवर मोठ्या प्रमाणात जमवाजमव; सैनिकांची संख्या वाढवली
3
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
4
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
5
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
6
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
7
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
8
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
9
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
10
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
11
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी
12
भारतात द्वेषाचा वणवा पेटवण्याचं एक षड्‌यंत्र; ‘बदला’ घेण्याची घाई नको, ‘धडा’ शिकवला पाहिजे
13
नरेंद्र मोदी यावेळी बालाकोटच्याही पुढे जाणार?; पुढच्या दोन आठवड्यांत आणखी कठोर पावले
14
हम सब एक है! अतिरेकी व त्यांच्या सूत्रधारांचा कायमस्वरूपी बंदोबस्त करण्याची मागणी
15
कृषी विकासासाठी ६५ बाजार समित्या; अद्याप राज्यातील ६८ तालुक्यांत समित्याच नाहीत
16
"आणखी किती वेळ सहन करणार..."; चिठ्ठी लिहून नवी मुंबईतील विकासकानं संपवलं आयुष्य
17
मेमध्ये जिल्हा समित्या, जूनमध्ये महामंडळे; भाजपाच्या वरिष्ठांचा कार्यकर्त्यांना शब्द
18
‘साहेब’ होऊ घातलेला बिरदेव म्हणतो, शेळ्या-मेंढ्यांना काय लाजायचं? तीच माझी ताकद
19
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
20
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे

'ओबीसी' आरटीओ पदोन्नतीसाठी बनले ‘आदिवासी’, किनवट समितीकडून पर्दाफाश

By गणेश वासनिक | Updated: February 2, 2024 19:48 IST

न्यायालयाने रद्द अन् जप्त केली 'कास्ट व्हॅलिडिटी'

अमरावती: किनवट येथील अनुसूचित जमाती प्रमाणपत्र तपासणी समिती किनवट यांनी मोटार वाहन निरीक्षक अरविंद किसन फुलारी यांचे 'कोळी महादेव' या अनुसूचित जमातीचे 'कास्ट व्हॅलिडिटी' व कार्यकारी दंडाधिकारी लातूर यांनी निर्गमित केलेले जात प्रमाणपत्र रद्द करून जप्त केले आहे.

फुलारी मुळत: इतर मागास प्रवर्गात येणाऱ्या गुरव / फुलारी या जातीतील असून फसवणूक करून त्यांनी 'कोळी महादेव' जमातीचे जात प्रमाणपत्र मिळविले होते. नंतर त्यांनी 'कास्ट व्हॅलिडिटी' मिळण्यासाठी सन २०१० मध्ये समितीकडे प्रस्ताव दाखल केला होता. तत्कालीन सह आयुक्त व.सु. पाटील यांनी कोणत्याही प्रकारची शहानिशा न करता १४ जानेवारी २०११ रोजी 'कोळी महादेव' जमातीचे 'कास्ट व्हॅलिडिटी' प्रमाणपत्र दिले होते.

या प्रमाणपत्राच्या आधारे त्यांना २०११ मध्ये पदोन्नती देण्यात आली होती. परंतु, एकाच पदावर कार्यरत असलेले 'कोकणी' या अनुसूचित जमातीतील सुरेंद्र चौरे यांनी अनुसूचित जमाती प्रमाणपत्र तपासणी समितीकडे फुलारी यांचे जात प्रमाणपत्र, कास्ट व्हॅलिडिटी रद्द करण्याबाबत तक्रार दिली होती. त्या अनुषंगाने जात पडताळणी समितीने अरविंद फुलारी यांच्या जातवैधता प्रमाणपत्राची फेर चौकशी केली असता त्यांच्या रक्तातील नात्यात 'हिंदू गुरव, गुरव, फुलारी, हिंदू फुलारी अशा ओबीसीच्या नोंदी आढळून आल्या आहेत.

परिणामत: मूळ जातीविषयी वस्तुस्थिती लपवून एसटी उमेदवारासाठी राखीव जागेवर नोकरीत प्रवेश घेतल्याप्रकरणी त्यांच्या विरुद्ध अधिनियम २००० च्या कलम १० ते १२ मधील तरतुदी अन्वये कारवाई करण्याचे निर्देश परिवहन आयुक्त, मुंबई यांना दिले आहे. सात दिवसांच्या आत केलेल्या कारवाईचा अनुपालन अहवाल सादर करण्याचेही निर्देश समितीने दिले आहेत.सर्वोच्च न्यायालयाने ६ जुलै २०१७ रोजी दिलेल्या ऐतिहासिक निर्णयात महाराष्ट्र शासनाचा अधिनियम २००० हा वैध ठरविला आहे. या अधिनियमाचा शासनाने सन्मान करून आजपर्यंत घेतलेले सर्व लाभ जमीन महसुलाच्या थकबाकी प्रमाणे वसूल करून आरटीओला सेवेतून बडतर्फ करण्यात यावे.- मनोहर पंधरे, विभागीय उपाध्यक्ष, ट्रायबल फोरम नागपूर विभाग.

टॅग्स :Amravatiअमरावती