शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानवर हसावं की रडावं.... आता म्हणे मोहसीन नक्वीला गोल्ड मेडल देणार, सन्मान करणार !
2
लाखोंच्या गर्दीत हरवलेला 'मुन्ना' काही मिनिटांत 'अण्णा'च्या गळ्यात; बापलेकांची भावनिक भेट
3
सानिया मिर्झाशी घटस्फोट, आता शोएब मलिकचे सना जावेदशीही लग्न तुटणार? VIDEO मुळे उडाली खळबळ
4
नवी मुंबई विमानतळाला दि.बा.पाटील यांचेच नाव लागणार; CM फडणवीसांचे कृती समितीला आश्वासन
5
ट्रॅक्टरमध्ये बसून थेट बांधावर... सोलापूरच्या अधिकाऱ्यांची तत्परता, शेतकऱ्यांना दिला धीर
6
'फिट' है तो 'हिट' है... बॉलिवूड अभिनेत्रीचा कमालीचा फिटनेस, या वयातही चाहत्यांना करते घायाळ
7
२ वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलांना कफ सिरप देऊ नका, केंद्राचा सल्ला; राजस्थान, मध्य प्रदेशात ११ बालकांचा मृत्यू
8
वेळागर समुद्रात आठजण बुडाले; तिघांचे मृतदेह हाती, एकीचा जीव वाचला, किनाऱ्यावर आक्रोश
9
राज्यात अतिवृष्टी, पूरस्थिती; अकरावी ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेची ४-६ ऑक्टोबरला अंतिम विशेष फेरी
10
शेतकऱ्यांसाठी काँग्रेस रस्त्यावर; नुकसानग्रस्तांना तत्काळ मदत मिळण्यासाठी राज्यभर आंदोलन
11
“बावळट-मूर्ख, मनोज जरांगेंसारखा नेता मिळणे मराठ्यांचे दुर्दैव”; लक्ष्मण हाकेंचा हल्लाबोल
12
"तुम्ही आम्हाला शिकवू नका..."; भारताने पाकिस्तानला चांगलंच सुनावलं, UN मध्ये काय घडलं?
13
आशाबाई, अंबिका अन् सुनीता... सोलापुरात दोन दिवसांत तीन महिलांची हत्या, कारण एकच
14
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दि.बा. पाटलांचे नाव; PM मोदींची राज्य सरकारच्या निर्णयाला मंजुरी
15
IND vs AUS : तिलक वर्माचं शतक थोडक्यात हुकलं; ऑस्ट्रेलियाविरुद्ध अभिषेकवर 'गोल्डन डक'ची नामुष्की
16
RSS च्या पथसंचलनात ढोल वाजवणाऱ्या स्वयंसेवकाचा हृदयविकाराने मृत्यू; व्हिडिओ व्हायरल
17
वैभव खेडेकरांचा तीनदा भाजपा प्रवेश रखडला, आता शिवसेनेत जाणार? शिंदे गटाचे नेते स्पष्टच बोलले
18
काँग्रेसनेही निवडणुकांसाठी कंबर कसली! नागपुरात ४, ५ ऑक्टोबरला विचारमंथन कार्यशाळा
19
IND vs WI: ‘ध्रुव तारा’ चमकला! पहिल्या सेंच्युरीनंतर बॅटची बंदूक करून 'बाप-माणसाला' सेल्युट! (VIDEO)
20
Business: २ मित्रांनी सोडली कॉर्पोरेट नोकरी, दूध विकून झाले कोट्यधीश, तयार केला मोठा ब्रँड!

पेरणीला पोषक स्थिती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 30, 2019 22:41 IST

जून महिन्याच्या सरासरीत पाऊस ५१ मिमीने माघारला असला तरी जिल्ह्यात सद्यस्थितीत ८१ मिमी पावसांची नोंद झाली आहे. गेल्या २४ तासांत सार्वत्रिक स्वरूपात पाऊस पडला व येत्या चार दिवसांत दमदार पावसाची शक्यता असल्याने खरिपाच्या पेरणीसाठी ही स्थिती पोषक असल्याचे कृषीतज्ज्ञांनी सांगितले. यंदाच्या हंगामात मान्सूनचा पाऊस प्रथमच सार्वत्रिक झाल्याने शेतशिवारात मशागत अन् पेरण्यांची लगबग सुरू आहे.

ठळक मुद्देपुढील चार दिवस पावसाचे, हवामानतज्ज्ञांची माहिती

जून महिन्याच्या सरासरीत पाऊस ५१ मिमीने माघारला असला तरी जिल्ह्यात सद्यस्थितीत ८१ मिमी पावसांची नोंद झाली आहे. गेल्या २४ तासांत सार्वत्रिक स्वरूपात पाऊस पडला व येत्या चार दिवसांत दमदार पावसाची शक्यता असल्याने खरिपाच्या पेरणीसाठी ही स्थिती पोषक असल्याचे कृषीतज्ज्ञांनी सांगितले. यंदाच्या हंगामात मान्सूनचा पाऊस प्रथमच सार्वत्रिक झाल्याने शेतशिवारात मशागत अन् पेरण्यांची लगबग सुरू आहे.अमरावती : जून महिन्याच्या सरासरीत पाऊस ५१ मिमीने माघारला असला तरी जिल्ह्यात सद्यस्थितीत ८१ मिमी पावसांची नोंद झाली आहे. गेल्या २४ तासांत सार्वत्रिक स्वरूपात पाऊस पडला व येत्या चार दिवसांत दमदार पावसाची शक्यता असल्याने खरिपाच्या पेरणीसाठी ही स्थिती पोषक असल्याचे कृषीतज्ज्ञांनी सांगितले. यंदाच्या हंगामात मान्सूनचा पाऊस प्रथमच सार्वत्रिक झाल्याने शेतशिवारात मशागत अन् पेरण्यांची लगबग सुरू आहे.यंदा रोहिनी अन् मृग नक्षत्र कोरडे गेल्याने मशागतीसह पेरणीची कामे ठप्प झाली होती. खरिपाच्या पेरणीला किमान ८० ते १०० मिमी पावसाची आवश्यकता आहे. जिल्ह्यात तूर्तास सरासरी ८१ मिमी पाऊस झाला. त्याहीपेक्षा बदलत्या हवामान स्थितीमुळे आगामी चार ते पाच दिवस जोरदार व काही ठिकाणी अतिवृष्टीचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. त्यामुळे ही खरिपाच्या पेरणीसाठी पोषक स्थिती असल्याची माहिती जिल्ह्याच्या कृषी विभागाने दिली. यंदाच्या खरीप हंगामात जिल्ह्यात सात लाख २८ हजार हेक्टरवर पेरणी होणार आहे. सद्यस्थितीत केवळ पाच टक्के क्षेत्रात पेरणी आटोपली. २३ तारखेला जिल्ह्यात मान्सूनची पावसाच्या नोंद झाली. मात्र, त्यानंतर पावसात खंड राहिल्याने खरिपाच्या पेरणी थबकल्या होत्या. आता मान्सून सक्रिय होत असल्याने शेतकऱ्यांना दिलासा मिळाला.कृषी तज्ज्ञांच्या माहितीनुसार, या आठवड्यापर्यंत मूग व उडदाची पेरणी करावयास हरकत नाही. मात्र, त्यानंतर शक्यतोवर ही पेरणी करू नये, अन्यथा उत्पादनात घट येण्याची शक्यता आहे. यंदाच्या हंगामात सोयाबीनचे ३,२३,३०० हेक्टर सरासरी क्षेत्र असले तरी हे क्षेत्र कमी होण्याचा कृषी विभागाचा अंदाज आहे. त्यामुळे यंदा साधारणपणे दोन लाख ९५ हजार क्षेत्रात सोयाबीनची पेरणी होण्याची संभावना आहे. आता सार्वत्रिक पाऊस होत असल्याने बियाणे बाजारातदेखील लगबग वाढली आहे.३० जूनपर्यंत ८१ मिमी पाऊसजिल्ह्यात १ ते ३० जून या कालावधीत जिल्ह्यात सरासरी ८१ मिमी पावसाची नोंद झाली. यामध्ये अमरावती तालुक्यात १०४ मिमी, भातकुली ६८, नांदगाव खंडेश्वर ९१, चांदूर रेल्वे १०४.५, धामणगाव रेल्वे ११२.५, तिवसा ५०, मोर्शी ५५, अचलपूर ६५, चांदूरबाजार ६४, दर्यापूर ७१, अंजनगाव सुर्जी ४८, धारणी १२७ व चिखलदरा तालुक्यात १२१ मिमी पावसाची नोंद झाली. मागील वर्षी याच तारखेपर्यंत ९५.२ मिमी पावसाची नोंद होती. प्रत्यक्षात १४६ मिमी पावसाची सरासरी अपेक्षित आहे.ंविदर्भात सार्वत्रिक पावसाची शक्यताबंगालच्या उपसागरात चक्राकार वारे सक्रिय आहेत. रविवारी बंगालच्या उपसागरावर कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झाले. हे कमी दाबाचे क्षेत्र येत्या ४८ तासांत वादळात रूपांतर होण्याची शक्यता आहे. हे वादळ पश्चिमेला सरकणार असल्याने पुढील चार ते पाच दिवस विदर्भातील बहुतांश जिल्ह्यात दमदार पाऊस कोसळणार आहे. काही ठिकाणी मुसळधार, तर काही ठिकाणी अतिवृष्टीची शक्यता श्री शिवाजी कृषी महाविद्यालयाचे सहा. प्राध्यापक व हवामानतज्ज्ञ अनिल बंड यांनी वर्तविली आहे.