चाचण्यांची संख्या दुपटीहून अधिक करणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 23, 2021 04:20 AM2021-02-23T04:20:42+5:302021-02-23T04:20:42+5:30

अमरावती : जिल्ह्यात कोरोना संक्रमितांसी संख्या लक्षात घेता, चाचणीचे प्रमाण वाढविण्यात येणार आहे. ही संख्या दुपटीहून अधिक वाढविणार ...

The number of tests will more than double | चाचण्यांची संख्या दुपटीहून अधिक करणार

चाचण्यांची संख्या दुपटीहून अधिक करणार

Next

अमरावती : जिल्ह्यात कोरोना संक्रमितांसी संख्या लक्षात घेता, चाचणीचे प्रमाण वाढविण्यात येणार आहे. ही संख्या दुपटीहून अधिक वाढविणार असल्याचे जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी सोमवारी सांगितले.

सद्य:स्थितीत संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ व विविध प्रयोगशाळांतून दीड हजारांहून अधिक अहवाल प्राप्त होत आहेत. आता ही चाचण्यांची क्षमता वाढवून सुमारे पाच हजार चाचण्यांपर्यंत वाढविण्यात येणार आहे. कोरोनाबाबत खातरजमेसाठी आरटीपीसीआर चाचणीवर भर देण्यात येत आहे. कोरोनाची कुठलीही लक्षणे असलेल्या किंवा बाधित व्यक्तींच्या संपर्कात आलेल्या जिल्ह्यातील नागरिकांनी आरटीपीसीआर कोरोना चाचणीसाठी पुढाकार घ्यावा, असे आवाहन जिल्हाधिकाऱ्यांनी केले.

बाधितांची संख्या वाढत आहे. त्यामुळे अधिकाधिक चाचण्या करण्यात येतील. नागरिकांनी सजग राहून कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजनांचे काटेकोर पालन करावे, असे आवाहनही त्यांनी केले. प्रतिबंधात्मक आदेशाचे उल्लंघन केल्यास संबंधितांवर कडक कार्यवाही करण्यात येणार आहे. दंडात्मक कारवाईसह फौजदारी गुन्हा दाखल करण्यात येणार असून, तसे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी यापूर्वीच जारी केले आहेत.

Web Title: The number of tests will more than double

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.