शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकेवर संकट! उन्हाळी कँपिंगला गेलेल्या, २८ लहान मुली बुडाल्या; ४५ मिनिटांत २६ फूट पाणी वाढले...
2
चांगली बातमी! राज्यात सरासरीच्या ९९% पाऊस; कोकण, नाशिक, पुणे आणि अमरावती विभागात जाेरदार जलधारा
3
Horoscope Today: आजचे राशीभविष्य- ०८ जुलै २०२५, मनासारखे यश मिळेल, अपूर्ण कामे पूर्ण होतील!
4
रशियाचा युक्रेनवर पुन्हा मोठा हल्ला, ११ ठार, ८० हून अधिक जखमी; रशियन मंत्र्याचाही मृत्यू
5
मनसेचे नेते अविनाश जाधव यांना पोलिसांनी घेतलं ताब्यात, पहाटे ३ वाजता कारवाई
6
मराठी माणसांना आम्ही पोसतोय, महाराष्ट्र आमच्या पैशांवर जगतो; भाजपा खासदारानं उधळली मुक्ताफळे
7
देशातील प्रत्येक भाषा ही राष्ट्रीय भाषा, प्राथमिक शिक्षण मातृभाषेतच हवे; संघाची भूमिका
8
२५ कोटी कर्मचारी करणार उद्या देशव्यापी संप; सरकारी धोरणांचा विरोध करण्यासाठी भारत बंदची हाक
9
ऑफिसच्या वेळा बदला, लोकलची गर्दी कमी करा; ८००  कार्यालयांना मध्य रेल्वेचे विनंतीपत्र
10
कोर्लई समुद्रात संशयित बोट?; कोस्ट गार्ड, नेव्हीच्या हेलिकॉप्टरने घेतला शोध, हाती काही नाही
11
कुजबुज: महायुतीच्या चर्चेचे किलकिले दार; शिंदेसेनेची भूमिका अन् राज ठाकरेंचे 'ते' आदेश
12
डॉ. नरेंद्र जाधव समिती रद्द करा, दादा भुसेंना हटवा; शालेय शिक्षण अभ्यास व कृती समितीची मागणी
13
पर्यूषण काळात कत्तलखान्यांना बंदी घातली तर इतर समुदायांचाही मार्ग मोकळा होईल? - उच्च न्यायालय
14
वर्सोवा-घाटकोपर मेट्रोवर लवकरच ६ डब्यांची गाडी?; अतिरिक्त डबे खरेदीसाठी मागितली परवानगी
15
मुंबई विमानतळावर गांजा, सोने, प्राण्यांच्या तस्करीचा पर्दाफाश; आतापर्यंत ४ जणांना अटक
16
या फ्रँचायझीने दिले जास्त पैसे; लखनौ सुपर जायंट्सचा दिग्वेश राठी आता या संघातून खेळणार
17
“सत्ता हे भाजपाचे ध्येय नव्हते, ठाकरे बंधू एकत्र आल्याचा काही परिणाम नाही”: सुधीर मुनगंटीवार
18
"आयुष्यात कधीही कोणावर प्रेम करू नका..."; इन्स्टावर लाईव्ह येत तरुणाने संपवलं जीवन
19
“वाद निर्माण करायला निशिकांत दुबेंचे विधान, हिंदी सक्तीचा फतवा रेशिमबागेतून”; काँग्रेसची टीका
20
उपमुख्यमंत्री अजित पवारांचे केंद्रीय मंत्री नितीन गडकरींना पत्र; केली मोठी मागणी, म्हणाले...

वाघांच्या वाढीव आकडेवारीवर ‘एनटीसीए’चे लक्ष, प्रकल्पांचे सुरक्षा ऑडिट

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 19, 2018 18:22 IST

राज्यात सहा व्याघ्र प्रकल्प, अभयारण्यांमध्ये काही महिन्यांपूर्वी वन्यजीव गणना पार पडली.

अमरावती : राज्यात सहा व्याघ्र प्रकल्प, अभयारण्यांमध्ये काही महिन्यांपूर्वी वन्यजीव गणना पार पडली. मात्र, व्याघ्र प्रकल्पांकडून देहरादून येथील राष्ट्रीय वन्यजीव संस्थेला पाठविलेल्या वाघांच्या आकडेवारीबाबत राष्ट्रीय व्याघ्र संवर्धन प्राधिकरणाने (एनटीसीए) बोट ठेवल्याचे सूत्रांनी सांगितले. त्यामुळे व्याघ्र प्रकल्पांचे पहिल्यांदाच सुरक्षा आॅडिट होत असून, एनटीसीए, एमईई चमूकडून पाहणी करण्यात आली आहे.

दर चार वर्षांनी व्याघ्र गणना केली जाते. परंपरागत आणि नव्या प्रणालीचा वापर करून व्याघ्रांची संख्या निश्चित होते. त्याअनुषंगाने ताडोबा, पेंच, मेळघाट, बोर, टिपेश्वर व सह्यांद्री या व्याघ्र प्रकल्पांमध्ये वन्यजीव गणनेनंतर हाती आलेल्या संख्येनुसार ही आकडेवारी देहरादून येथे अहवालाद्वारे पाठविली. परंतु, व्याघ्र प्रकल्प क्षेत्र संचालकांनी व्याघ्रांची आकडेवारी फुगवून पाठविल्याने एनटीसीएच्या अधिकाऱ्यांनी ही बाब अतिशय गांभीर्याने  घेतली आहे. त्यामुळे राज्यात व्याघ्र प्रकल्पांच्या सुरक्षेच्या आढावा घेण्याच्या नावे व्याघ्रांची संख्या वास्तविक वाढली काय, हे बघण्यासाठी मध्य व दक्षिण विभागात स्वतंत्र चमू व्याघ्र प्रकल्पांची पाहणी करीत आहे. मेळघाट व्याघ्र प्रकल्पात शुक्रवार, १६ मार्चपासून एनटीसीए, एमईई (मॅनेजमेंट इफेक्टिव्हनेस इव्हॅल्युएशन) अशा दोन स्वतंत्र पथकांनी सिपना, गुगामल, अकोट वन्यजीव विभागात वाघांबाबतचे बारकावे तपासले आहे. वन्यजिवांच्या सुरक्षेसाठी उपाययोजना, कर्मचारी वर्ग, शिकार रोखण्यासाठी प्रतिबंधक कार्यवाही, राखीव वनांत अतिक्रमण आदी बाबींवर या चमूने भर दिल्याचे व्याघ्र प्रकल्पातील एका अधिकाऱ्याने ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.

अशी पाठविली व्याघ्रांची आकडेवारीदेहरादून येथील राष्ट्रीय वन्यजीव संस्थेच्या निर्देशानुसार वन्यजीव गणना करण्यात आली. यात गणनेनंतर राज्यात सहा व्याघ्र प्रकल्पांनी वाघांची संख्या निश्चित करून ती आकडेवारी केंद्र सरकारकडे पाठविली आहे. यात ताडोबा १३० ते १५५, मेळघाट ५५ ते ६०, पेंच ५० ते ५५, टिपेश्वर ५ ते ८, सह्याद्री १५ ते २० अशी वाघांची संख्या असल्याचे अहवालात नमूद आहे.

यावर्षीच व्याघ्र प्रकल्पांचे सुरक्षा ऑडिट का?राज्यात सहा व्याघ्र प्रकल्प असून, केंद्र सरकारच्या राष्ट्रीय व्याघ्र संवर्धन प्राधिकरणाच्या नियंत्रणात त्यांचा कारभार चालतो. वाघांच्या संख्यावाढीसाठी आणि वन्यजीव संवर्धनासाठी व्याघ्र प्रकल्पांना केंद्र सरकारकडून अनुदान मिळते. परंतु, काही महिन्यांपूर्वी झालेल्या व्याघ्र गणनेनंतर पाठविलेल्या वाघांच्या संख्येवर एनटीसीएने लक्ष केंद्रित केले आहे. व्याघ्र प्रकल्प स्थापन होऊन ३५ ते ४० वर्षांचा कालावधी झाला असताना, आतापर्यत सुरक्षा आॅडिट झाले नाही; यावर्षीच सुरक्षा आॅडिट का, असा प्रश्न उपस्थित होत आहे.