अमरावती : केबल धारकांना ३१ डिसेंबरपर्यत सेटअप बॉक्स लावणे अनिवार्य करण्यात आले होते. मात्र अजूनही अनेक ग्राहकांनी घरी सेट टॉप बॉक्स लावले नाही. परंतु आता १२०० रुपये किमतीत एमटेक- ४ या अत्याधुनिक तंत्रज्ञानाचे केबल सेट टॉप बॉक्स मिळणार आहे. त्यानुसार प्रशासनाने तयारी चालविली आहे.गत महिनाभरापासून केबल धारकांनी सेट टॉप बॉक्स ग्राहकांक डे लावण्यासाठी लगबग चालविली होती. मात्र हा अवधी ३१ डिसेंबरपर्यंतच होता. त्यामुळे सेट टॉप बॉक्स लावण्यापासून अनेक ग्राहक वंचित आहेत. टीव्ही ग्राहकांसाठी ५०० डिजिटल चॅनेल्स आणि अत्याधुनिक एमटेक- ४ हे सेटअप बॉक्स आर.सी.एन डिजीटल मार्फत उपलब्ध करुन दिले जात आहे. केवळ १२०० रुपयात हे सेटअप बॉक्स मिळणार आहे. ग्राहकांनी अतिरिक्त रक्कम देवून सेटअप बॉक्स खरेदी करु नये, असे आवाहन महसूल विभागाने केले आहे. आम आदमी पार्टीद्वारा गुरुवारी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देऊन सेट टॉप बॉक्स लावल्यानंतर ग्रहकांना पावती द्यावी, अशी मागणी केली आहे. (प्रतिनिधी)
आता अत्याधुनिक सेट टॉप बॉक्स मिळणार
By admin | Updated: January 1, 2016 00:46 IST