गौरवदेखील करणार : त्रास देणाऱ्या पोलीस, डॉक्टरांवर होणार कारवाईअमरावती : अपघातांचे प्रमाण वाढत चालले आहे. अपघातग्रस्ताला वेळीच उपचार मिळत नसल्याने अनेकांचे प्राण जातात. पोलिसांचा ससेमिरा मागे लागू नये म्हणून अनेकजण जखमीला मदत करण्याची इच्छा असूनही माघार घेतात. परंतु आता अपघातातील जखमींना मदत करणाऱ्यास कायद्याने संरक्षण मिळाले आहे. याविषयीची अधिसूचना केंद्र सरकारने राजपत्रात प्रसिद्ध केली आहे. अपघातवेळी मदत करणाऱ्यांना डॉक्टर किंवा पोलिसांनी त्रास दिल्यास त्यांच्यावरही कारवाई होणार आहे. रस्ता अपघातातील जखमींना मदत करणाऱ्यांना नाहक त्रास दिला जात असल्याच्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयाने परिवहन मंत्रालयाला मार्गदर्शक सूचना दिल्या आहेत. त्यानुसार केंद्र शासनाने आता त्या सूचनांचे पालन करीत अपघाताच्यावेळी मदत करणाऱ्यांना कायद्याचे संरक्षण दिले आहे. वाढत्या अपघातांमध्ये केवळ वेळेवर उपचार मिळत नसल्याने अनेकांचा मृत्यू होतो. पोलिसांच्या चौकशीचा ससेमिरा मागू लागू नये, म्हणून कोणीच मदत करण्यास धजावत नाही. या अनुषंगाने अपघातग्रस्तांना मदत करणाऱ्यांबाबत सर्वोच्च न्यायालयात सन २०१२ मध्ये एक याचिका दाखल करण्यात आली होती. त्यावर २९ आॅक्टोबर २०१४ रोजी न्यायालयाने अंतिम निर्देश दिले आहेत. त्यामध्ये मदत करणाऱ्यांना कायद्याचे संरक्षण देण्याचे आदेश आहेत. सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या सूचना राजपत्रात प्रसिद्ध करुन त्याची अंमलबजावणी करण्याचे निर्देशही देण्यात आले आहेत. त्यानुसार केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक विभागाने न्यायालयाच्या या सूचना राजपत्रात प्रसिद्ध केल्या आहेत. अपघातग्रस्तांना मदत करणाऱ्यांची माहिती त्यांची इच्छा असेल तरच संबंधितांनी त्यांच्याकडून घ्यावी, त्याबाबत लिगल (एमएलपी) फॉर्ममध्ये उल्लेख करण्यात यावा, जखमींना घेऊन येणाऱ्या व्यक्तीवर पोलीस, डॉक्टर किंवा अन्य कोणी कसलाही दबाव आणण्याचा प्रयत्न केल्यास त्यांच्यावर शासनाकडून दंडात्मक किंवा विभागीय कारवाई करण्यात येईल. मदत करणाऱ्या व्यक्तीने परवानगी दिल्यासच त्याला त्या घटनेत साक्षीदार म्हणून नमूद करता येईल. त्यानंतर त्याला केवळ एकदाच चौकशीसाठी बोलविता येईल. चौकशीसाठी त्याच्यावर दबाव टाकता येणार नाही, तसेच त्याला धमकीही देता येणार नाही, असे देखील परिपत्रकात नमूद आहे. ‘त्या’ मदत करणाऱ्यांचा होणार गौरवअमरावती : अपघातग्रस्तांना मदत करण्याबाबतची अधिसूचना पोलीस दलासह शासकीय व खासगी रूग्णालयांना आरटीओ विभागाद्वारा पाठविण्यात आली असून अंमलबजावणीच्या सूचना देण्यात आल्या आहेत. नागरिकांनी निर्भयपणे अपघातग्रस्तांना मदत करावी, कोणतीही अडचण झाल्यास कार्यालयाशी थेट संपर्क करावा, असे या विभागाने स्पष्ट केले आहे. या अधिसूचनेनुसार अपघाताच्या वेळी जखमींना मदत करणाऱ्या नागरिकांना पुरस्कृत करून त्यांचा गौरव देखील केला जाणार आहे. त्रास दिल्यास पोलिसांवर कारवाईया अधिसूचनेनुसार अपघातातील जखमींना मदत करणाऱ्यांना त्रास देणाऱ्या पोलिसांवर कारवाई करण्यात येणार आहे. किंबहूना पोलिसांच्या त्रासापायीच नागरिक अपघातग्रस्तांच्या मदतीसाठी पुढे येत नाहीत. त्यामुळे यापुढे मदत करणाऱ्यास पोलिसांचा व डॉक्टरांचा कुठलाही त्रास होणार नाही. त्रास दिल्यास कारवाई केली जाईल. मदतीनंतर चौकशीसाठी अडवणूक नकोमदत करणाऱ्या व्यक्तीला चौकशीसाठी पोलीस ठाण्यात न बोलविता व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे त्याचा जबाब नोंदविला जाऊ शकतो. मदत करणारी व्यक्ती जखमीची नातेवाईक नसली तरीही शासकीय व खासगी रुग्णालयात त्यांना थांबविता येणार नाही, शिवाय त्यांच्याकडून उपचारखर्च घेता येणार नाही, असे परिपत्रकात नमूद आहे.
आता अपघातवेळी मदत करणाऱ्यांना संरक्षण
By admin | Updated: April 7, 2016 00:06 IST