शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
3
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
4
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
5
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
6
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
7
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
8
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
9
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
10
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
11
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
12
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
13
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
14
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
15
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
16
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
17
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
18
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
19
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
20
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
Daily Top 2Weekly Top 5

आता खासगी मोबाइल कंपन्यांना टॉवर उभारणी अन् भूमिगत केबलसाठी तात्काळ मंजुरी

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 14, 2025 13:59 IST

Amravati : अवैध मोबाइल टॉवर उभारणीचे काय ?

गणेश वासनिक लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : राज्यात दूरसंचार पायाभूत सुविधांचा वेगवान प्रसार सुलभ व्हावा, यासाठी खासगी कंपन्यांना भूमिगत केबल टाकणे आणि मोबाइल टॉवर उभारणीसाठी युद्धस्तरावर परवानगी देण्याचे निर्देश नगरविकास विभागाने दिले आहेत. त्याअनुषंगाने महानगरपालिका, नगरपालिका व नगरपंचायतींचे प्रशासक तथा आयुक्तांना ९ एप्रिल २०२५ रोजी राज्य शासनाचे पत्र प्राप्त झाले आहे.

नवीन दूरसंचार कायदा, २०२३ हा देशाच्या संसदेत कायद्याद्वारे लागू करण्यात आला असून २६ जून २०२४ रोजी लागू झाला आहे. तर राज्यात १ जानेवारी २०२५ पासून शहरी नागरी स्वराज्य संस्थांमध्ये लागू झाला आहे. आता या नव्या दूरसंचार कायद्याची काटेकोरपणे करणे अंमलबजावणी महानगरपालिका, नगरपालिका, नगरपंचायतींमध्ये अनिवार्य आहे. तसे पत्र नगरविकासच्या कक्ष अधिकारी नम्रता मुंदडा यांनी जारी केले आहे.

अवैध मोबाइल टॉवर उभारणीचे काय ?राज्यभरात खासगी मोबाइल कंपन्यांनी अवैधरीत्या टॉवर उभारले आहेत. याप्रकरणी स्थानिक स्वराज्य संस्थांनी न्यायालयात धाव घेतली आहे. एकट्या अमरावती महानगरपालिकेत २१७ अवैध मोबाइल टॉवर असल्याच्या नोंदी आहेत. मुंबई उच्च न्यायालयासह नागपूर खंडपीठ, संभाजीनगर खंडपीठात नियमबाह्य मोबाइल टॉवर उभारणीचे प्रकरण न्यायप्रविष्ठ आहेत. मोबाइल टॉवरच्या जागेबाबत मालमत्ता कर आकारणीचा मुद्दा कायम आहे. नव्या दूरसंचार कायद्याची अंमलबजावणी करताना कुठेही उल्लेख नाही. शासन अनुदान देणार का? हे स्पष्ट केले नाही.

"१ जानेवारी २०२५ नवा दूरसंचार कायदा लागू झाला आहे. खासगी मोबाइल कंपन्यांकडून भूमिगत केबल टाकणे, टॉवर उभारणीचे ऑनलाइन अर्ज तात्काळ मंजूर करावे लागणार आहे. त्याकरिता शासनाने खासगी कंपन्यांना शुल्कदेखील ठरवून दिले आहे."- सचिन कलंत्रे, आयुक्त महानगरपालिका अमरावती. 

टॅग्स :AmravatiअमरावतीMobileमोबाइल