शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्रात ४ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; पराग सोमण वर्धा झेडपीचे नवे CEO, सौम्या शर्मा अमरावती पालिकेच्या आयुक्त
2
अहमदाबाद प्लेन क्रॅश : अपघातस्थळावरून किती तोळे सोनं अन् रोख रक्कम मिळाली? प्रत्यक्षदर्शीनं सांगितलं
3
इराणकडे थोडी थोडकी नव्हे, २०,००० मिसाईल, दिवसाला २०० जरी डागली...; धमकीने खळबळ
4
डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने तेहरानमध्ये भीषण गर्दी, लोक शहर सोडून काढतायत पळ! पाहा व्हिडीओ
5
राजावर पहिला वार कुणी केला...? कुठे उभी होती सोनम...? क्राइम सीनवरून परतलेल्या मेघालय पोलिसांनी सगळंच सांगितलं
6
लेडी डॉन अनुराधा चौधरीला आई व्हायचेय; गँगस्टरने तिहारमधून शुक्राणू पाठविले...
7
"तू नाही, तुझी वहिनी आवडली"; मेहुण्याच्या बायकोवर जडला नवऱ्याचा जीव, लग्नाच्या एका महिन्यातच बायकोला सोडून पसार!
8
"त्यांना केवळ प्रसिद्धी हवी आहे...!"; G7 समिट अर्ध्यावर सोडून अमेरिकेत पोहोचताच फ्रान्सच्या राष्ट्रपतींवर भडकले ट्रम्प, नेमकं काय घडलं?
9
आता केवळ रामलला नाही, तर श्रीराम दरबाराचेही करा दर्शन; १ दिवसात किती भाविकांना पाहता येणार?
10
'संधी-साधूपणाच्या राजकारणाला प्रोत्साहित करायचे नाही,भाजपसोबत..' शरद पवार स्पष्टच बोलले
11
सुधाकर बडगुजर भाजपात येताच नितेश राणेंचे सूर बदलले; दहशतवादाबाबत केले होते आरोप
12
५०, १०० नाही, तब्बल ‘इतकी’ विमाने रद्द! ‘असा’ आहे एअर इंडियाचा ३ वर्षांचा रेकॉर्ड, आकडे पाहाच
13
व्हिसा नाकारल्याचा राग, तरुणाने अमेरिकन दूतावासाला बॉम्बने उडवण्याची धमकी दिली! पोलिसांकडून अटक
14
पीएमजीपी वसाहतीमधील रहिवाशांना ४५० फुटांचे घर मिळणार! म्हाडामार्फत कंत्राटदार नियुक्तीसाठी निविदा प्रक्रिया सुरू
15
'हुकूमशहा-पाकिस्तानचा खुनी..', अमेरिकेत गेलेल्या असीम मुनीरच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी
16
“सुधाकर बडगुजर यांच्या प्रवेशाने भाजपाची ताकद वाढली, आता महापालिका निवडणूक...”: गिरीश महाजन
17
राजा रघुवंशी हत्याकांडाची पुनरावृत्ती; पैसे देऊन गुंड बोलावले, पत्नीने प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं!
18
आम्ही मोसादचं हेडक्वार्टर उडवलं, इस्रायली मिलिट्री इंटेलिजन्सलाही निशाणा बनवलं; इराणचा मोठा दावा
19
IND vs ENG : तेंडुलकर-अँडरसन ट्रॉफीसह आता मालिका विजेत्या कर्णधाराला दिले जाणार 'पतौडी मेडल'
20
मस्करीची झाली कुस्करी! मित्राने चिडविले म्हणून ठोसा मारला, त्याने हॉस्पिटलमध्ये जीव सोडला

आता कैद्यांनाही कळणार चालू घडामोडी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 3, 2018 23:03 IST

येथील मध्यवर्ती कारागृहात विविध गुन्ह्यांच्या आरोपाखाली शिक्षा भोगत असलेल्या बंदीजनांना आता त्यांच्या आवडी-निवडीतील हिंदी, मराठी चित्रपटातील गीते, भावगिते यासह देश, विदेशातील चालू घडामोडींची माहिती मिळणार आहे. रविवारी ‘हॅलो ऽऽऽ रेडिओ अमरावती कारागृह’ केंद्राचे उद्घाटन कारागृह उपमहानिरिक्षक योगेश देसाई यांच्या हस्ते झाले.

ठळक मुद्देकारागृह उपमहानिरीक्षकांच्या हस्ते उद्घाटन : हॅलो ऽऽऽ रेडिओ अमरावती कारागृह... प्रारंभ

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : येथील मध्यवर्ती कारागृहात विविध गुन्ह्यांच्या आरोपाखाली शिक्षा भोगत असलेल्या बंदीजनांना आता त्यांच्या आवडी-निवडीतील हिंदी, मराठी चित्रपटातील गीते, भावगिते यासह देश, विदेशातील चालू घडामोडींची माहिती मिळणार आहे. रविवारी ‘हॅलो ऽऽऽ रेडिओ अमरावती कारागृह’ केंद्राचे उद्घाटन कारागृह उपमहानिरिक्षक योगेश देसाई यांच्या हस्ते झाले.रेडिओ केंद्राचे उद्घाटनाप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हा व सत्र न्यायाधीश विमलनाथ तिवारी, जिल्हा शल्य चिकित्सक श्यामसुंदर निकम, अपर पोलीस अधीक्षक एम.एम. मकानदार, कारागृह अधीक्षक रमेश कांबळे आदी उपस्थित होते. राज्यात प्रथम रेडिओ केंद्र हे येरवडा मध्यवर्ती कारागृहात सुरू झाले. या माध्यमातून कारागृह अधिकाऱ्यांना बराकीतील बंदीजनांसोबत थेट संवाद साधता यावा, वरिष्ठांच्या सूचना, आदेशाची माहिती देता यावी, ही यामागील संकल्पना आहे. यात यशही मिळाले. मात्र, दुपारी विश्रांतीच्या वेळी बंदीजनांना विरंगुळा मिळावा, यासाठी हिंदी, मराठी गीतांची फरमाईश हा कार्यक्रम खास करून त्यांच्यासाठी सुरू करण्यात येत असल्याचे प्रास्ताविकातून कारागृह अधीक्षक रमेश कांबळे यांनी सांगितले. सकाळ व सायंकाळ अशा दोन सत्रात रेडिओ व्यवस्थेचा लाभ बंदीजनांना घेता येणार असून, त्यानुसार कारागृहाने वेळापत्रक तयार केले आहे. सायंकाळच्या वेळी देश-विदेशातील चालू घडामोंडीची माहिती बातम्यांच्या शिर्षकासह कैद्यांना रेडिओ केंद्रातून दिली जाणार आहे. थोर महापुरूषांची जयंती, पुण्यतिथी या अनुषंगाने काही विचार ऐकायचे असल्यास त्यासाठी विचारवंत, तज्ज्ञांना छोटेखानी रेडिओ स्टुडिओत बोलावून त्यांचे मार्गदर्शनाची संधी कैद्यांनी मिळेल. जॉकी म्हणून सिद्धदोष कैदी सुदर्शन विघ्ने, अमित राठी यांच्याकडे जबाबदारी सोपविली.बंदीजनांच्या मानसिकतेत होणार बदलबंदीजनांच्या मानसिकतेत रेडिओ स्टुडिओच्या माध्यमातून निश्चित बदल होईल, असे अपेक्षा कारागृह उपमहानिरीक्षक योगेश देसाई यांनी व्यक्त केली. बंदीजनांच्या मनात नैराश्य, न्यूनगंडाची भावना आल्यास त्यांच्या कानी संगीतमय गीतांचे स्वर पडताच नक्कीच सकारात्मक बदल होईल, असेही ते म्हणाले.