शहरं
Join us  
Trending Stories
1
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
2
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
3
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
4
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
5
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
6
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
7
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
8
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
9
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
10
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
11
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
12
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
13
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
14
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
15
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
16
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
17
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
18
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
19
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
20
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
Daily Top 2Weekly Top 5

व्याघ्रगणनेसाठी आता नवे ‘सॉफ्टवेअर’, बनवाबनवीच्या आकड्यांना बसणार लगाम

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 7, 2017 16:54 IST

केंद्र सरकारच्या राष्ट्रीय व्याघ्र संवर्धन प्राधिकरणाने व्याघ्र गणनेसाठी नवे अत्याधुनिक सॉफ्टवेअर विकसित केले आहे.

गणेश वासनिकअमरावती, दि. 7 - केंद्र सरकारच्या राष्ट्रीय व्याघ्र संवर्धन प्राधिकरणाने व्याघ्र गणनेसाठी नवे अत्याधुनिक सॉफ्टवेअर विकसित केले आहे. त्यानुसार पुढील वर्षी होणा-या व्याघ्रगणनेसाठी आतापासून देशभरातील 42 व्याघ्र प्रकल्पांतील संगणकतज्ज्ञांना प्रशिक्षण दिले जात आहे. त्यामुळे वाघांच्या मोजणीअंती जाहीर होणा-या आकडेवारीच्या बनवेगिरीला आता लगाम बसेल.देशपातळीवर वाघांची अधिकृत संख्या किती, याची शहानिशा करण्यासाठी दर चार वर्षांनी व्याघ्रगणना केली जाते. यापूर्वी सन 2014 मध्ये व्याघ्रगणना करण्यात आली होती. आता सन 2018मध्ये देशात वाघांची मोजदाद करण्यासाठी व्याघ्रगणना होणार आहे. त्याकरिता राष्ट्रीय व्याघ्र संवर्धन प्राधिकरणाने आतापासूनच तयारी चालविली आहे. वर्षभरानंतर होणा-या व्याघ्रगणनेचा डाटा व्यवस्थित संकलित राहावा, यासाठी नव्या सॉफ्टवेअरचा वापर केला जाणार आहे. सॉफ्टवेअर हाताळण्यासाठी संगणकतज्ज्ञांना योग्य ते मार्गदर्शन करून प्रशिक्षित केले जात आहे. केंद्र शासनाने वाघांचे संवर्धन, संरक्षण करण्यासाठी कृती आराखडा तयार केला आहे. त्याअनुषंगाने महाराष्ट्रसह अन्य राज्यांतील व्याघ्र प्रकल्पात एनटीसीएने पत्र पाठवून व्याघ्रगणनेची पूर्व तयारी करण्याचा सूचना दिल्या आहेत. व्याघ्रगणनेअंती वाघांची सविस्तर माहिती गोळा करून ठेवण्यासाठी नव्या सॉफ्टवेअरचा वापर होणार आहे. हे नवे सॉफ्टवेअर हाताळण्यासाठी संगणकतज्ज्ञांना प्रशिक्षित करण्याची जबाबदारी व्याघ्र प्रकल्पांच्या क्षेत्रीय संचालकांवर सोपविली आहे. विभागीय स्तरावर संगणकतज्ज्ञांना नवे सॉफ्टवेअर हाताळण्याचे योग्य ते प्रशिक्षण दिले जात आहे. यापूर्वी व्याघ्रगणनेअंती जाहीर आकडेवारीनुसार देशात 3,216 वाघांची नोंद करण्यात आली आहे. राज्यात 249 वाघ असून, ताडोबा, मेळघाट, नवेगाव बांध, नागझिरा, पेंच, सह्याद्री, टिपेश्वर, बोर अभयारण्यात वाघांची नोंद आहे.‘‘व्याघ्रगणनेचा ‘डाटा’ गोळा करून ठेवण्यासाठी नवे सॉफ्टवेअर वापरले जाणार आहे. त्यानुसार संगणकतज्ज्ञांना पुढील वर्षी होणा-या व्याघ्रगणनेच्या अनुषंगाने प्रशिक्षित केले जाईल.-गिरीश वशिष्ठ,उपवनसंरक्षक, वन्यजीव विभाग, नागपूर