शहरं
Join us  
Trending Stories
1
राहुल गांधी एकाकी, कुणी ऐकत नाही, LPG मुद्द्यावर पक्षातच उभी फूट; नेते करतायत मोदींचे कौतुक
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
4
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
5
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात लागला बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
6
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
7
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
8
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
9
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
10
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
11
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
12
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
13
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
14
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
15
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
16
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
17
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
18
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
19
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
20
Video - निसर्गाच्या देणगीला भेसळीचा विळखा; तुम्ही पिताय ते नारळपाणी खरंच 'नॅचरल' आहे का?
Daily Top 2Weekly Top 5

आता जिल्हा उपनिबंधक राहणार बाजार समित्यांचे निवडणूक निर्णय अधिकारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 5, 2021 04:10 IST

अमरावती;बाजार समित्यांच्या निवडणुकीसाठी आता जिल्हा उपनिबंधक निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून काम पाहणार आहेत. याबाबत राज्य शासनाने नुकताच आदेश जारी ...

अमरावती;बाजार समित्यांच्या निवडणुकीसाठी आता जिल्हा उपनिबंधक निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून काम पाहणार आहेत. याबाबत राज्य शासनाने नुकताच आदेश जारी केला आहे.

यापूर्वी ५०० कोटीच्या आत महसुल असलेल्या कृषी उत्पन्न बाजार समित्यांची निवडणूक निर्णय अधिकारी जिल्हा उपनिबंधक होते. तर ५०० कोटीच्यावर महसूल असलेल्या बाजार समित्यांची निवडणूक निर्णय अधिकारी हे जिल्हाधिकारी होते. परंतु आता नवीन आदेशानुसार सर्वच बाजार समित्यांची निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून जिल्हा उपनिबंधक हे काम पाहणार आहेत. अमरावती जिल्ह्यात १२ कृषी उत्पन्न बाजार समित्या आहेत. तर राज्यभरात ३२५ बाजार समित्या आहेत. बाजार समितीवर वर्चस्व प्रस्थापित करण्यासाठी भाजप शिवसेना युती सरकारने कायद्यामध्ये बदल केला होता. यामध्ये बाजार समितीचा मतदार म्हणून १० गुंठयाच्यावर शेती असणाऱ्या शेतकऱ्यांना थेट मतदार म्हणून नोंदवून घेण्याचा शासन आदेश काढला होता. मात्र राज्यात २०१९ मध्ये महाविकास आघाडी सरकारने सत्तेवर आले. या सरकारने पहिल्या कॅबिनेटच्या बैठकीत हा निर्णय रद्द केला. तसेच नव्याने नियम केले. त्यामध्ये जिल्हाधिकारी बाजार समिती निवडणूक निर्णय अधिकारी न राहता यापुढे जिल्हा उपनिबंधक हे बाजार समित्यांचे निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून काम पाहणार आहेत.

बॉक्स

विद्यमान संचालक मंडळाला तीनदा मिळाली मुदतवाढ

गत वर्षीपासून राज्यभरात काेरोना विषाणूचा प्रादूर्भाव लक्षात घेता जिल्ह्यातील १२ कृषी उत्पन्न बाजार समित्यांच्या संचालक मंडळाला सरकारने सलग तीनवेळा मुदतवाढ दिली आहे.शासनाने संचालक मंडळाला दिलेली ही मुदतवाढ ३० सप्टेबर पर्यत आहे.मात्र कोरोना विषाणूचा वाढता संसर्ग नियंत्रणात आल्यानंतर बाजार समितीच्या संचालक मंडळाला पुन्हा मुदतवाढ द्यायची की निवडणूक घ्यायची याबाबत निर्णय होण्याची शक्यता वर्तविली जात आहे.

कोट

बाजार समित्याचे निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून जिल्हाधिकारी कामकाज पाहत होते.परंतु राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरणाने जारी केलेल्या आदेशानुसार यापुढे बाजार समित्यांचे निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून जिल्हा उपनिबंध कामकाज पाहणार आहेत.

संदीप जाधव

जिल्हा उपनिबंधक

अमरावती