शहरं
Join us  
Trending Stories
1
हैदराबादमध्ये अमित शाह यांच्याविरोधात गुन्हा दाखल, नेमकं काय घडलं? जाणून घ्या संपूर्ण प्रकरण
2
IPL 2024 MI vs KKR: Mumbai Indians ने घरच्या मैदानावर लाज आणली! १२ वर्षांनी कोलकाताचा वानखेडेवर दमदार विजय
3
किराडपुऱ्यात आग, सिलिंडर, विजेच्या तारांमुळे सलग तीन स्फोट; चिमुकलीचा मृत्यू, ८ जण भाजले
4
"काय बोलावं सुचत नाहीये, काही प्रश्न..."; Mumbai Indians च्या लाजिरवाण्या पराभवानंतर Hardik Pandya काय म्हणाला, वाचा
5
रोहित वेमुला दलित नव्हता, आईनं तयार केलं होतं बनावट जात प्रामाणपत्र! तेलंगणा पोलिसांकडून सर्व आरोपींना क्लीन चिट
6
T20 World Cup 2024 मध्ये Virat Kohli ने ओपनिंग करावी, Rohit Sharma ने 'या' नंबरवर खेळावं; माजी भारतीय कर्णधाराचा अजब सल्ला
7
कोथळे खून खटल्यात आता कोणाची नियुक्ती? उज्वल निकम यांचा राजीनामा; राज्य शासनाच्या निर्णयाकडे लक्ष
8
IPL2024 MI vs KKR: नुसते आले नि गेले... रोहित, इशान, तिलक, हार्दिक स्वस्तात बाद; Mumbai Indians चा डाव गडगडला! 
9
“PM मोदींनी १० वर्षांत काय केले ते सांगावे, काम पूर्ण झाले की राम मंदिरात जाणार”: शरद पवार
10
Andre Russell Run Out, IPL 2024 MI vs KKR: नुसता गोंधळ! व्यंकटेश धावलाच नाही, रसेल मात्र कुठच्या कुठे पोहोचला अन् मग... (Video)
11
अमित शाह फेक व्हिडिओप्रकरणी दिल्ली पोलिसांची कारवाई; काँग्रेस नेते अरुण रेड्डींना अटक
12
IPL 2024 Mumbai Indians vs Kolkata Knight Riders: KKRला 'व्यंकेटश' प्रसन्न! अर्धशतकवीर अय्यर एकटा भिडला, पण Nuwan Thushara - Jasprit Bumrah ने मुंबईला तारलं
13
४०० पार हा मोदींचा जुमला, भाजप २०० पारही जाणार नाही; प्रकाश आंबेडकरांचा दावा
14
Tilak Varma Catch Video, IPL 2024 MI vs KKR: धडामsss... कॅच घ्यायला धावले अन् दोघे एकमेकांवर धडकले, तरीही तिलक वर्माने घेतला 'सुपर कॅच' (Video)
15
'आईने मोठ्या विश्वासाने...', रायबरेलीतून उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर राहुल गांधींच्या भावना
16
“सांगलीत तिरंगी नाही थेट लढत, चंद्रहार पाटील...”; विशाल पाटील यांचा ठाकरे गटावर पलटवार
17
"बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाचे सरंक्षण करणार..." राहुल गांधींचा भाजपवर हल्लाबोल
18
IPL 2024 MI vs KKR: मुंबई इंडियन्सच्या प्लेईंग XI मधून Rohit Sharma गायब! Hardik Pandya ने टाकला नवा 'डाव'
19
“एकनाथ खडसेंची भूमिका संधीसाधूपणाची, आधी राजीनामा द्या अन् मग प्रचार करा”: गिरीश महाजन
20
कितीही उमेदवार द्या, श्रीकांत शिंदे यांचाच विजय पक्का; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना विश्वास

‘कोरोना हॉटस्पॉट’मध्ये आता ‘पल्स ऑक्सिमीटर’ने तपासणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 05, 2020 5:00 AM

सद्यस्थितीत मसानगंजमध्ये सर्वाधिक ३७ कोरोना संक्रमित आहेत. ताजनगर १५, हबीबनगर १४, फे्रजरपुरा १६, रतनगंज १५ संक्रमितांसह कोरोनाचे नवे हॉटस्पॉट बनले आहेत. या सर्व कंटेनमेंटमध्ये आरोग्य पथकांचे सर्वेक्षण सुरू आहे. हे सर्वेक्षण अधिक कार्यक्षम होण्यासाठी पथकांजवळ सध्या ५० पल्स ऑक्सिमीटर मशीन देण्यात आल्या असल्याचे महापालिकेचे वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. विशाल काळे यांनी सांगितले.

ठळक मुद्देअ‍ॅक्शन प्लॉन : साखळी ब्रेक करण्यासाठी जिल्हा, आरोग्य प्रशासनाच्या उपाययोजना

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : शहरातील मसानगंज, रतनगंज व आता फ्रेजरपुरा हे या आठवड्यात कोरोनाचे नवे ‘हॉटस्पॉट’ बनले आहेत. या भागातील रुग्ण ओळखता यावेत, यासाठी जोखमीच्या व्यक्तींची आता ‘पल्स ऑक्सिमीटर’ने तपासणी करण्यात येणार आहे. आरोग्य पथकाजवळ ही मशीन देण्यात येणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी दिली.सद्यस्थितीत मसानगंजमध्ये सर्वाधिक ३७ कोरोना संक्रमित आहेत. ताजनगर १५, हबीबनगर १४, फे्रजरपुरा १६, रतनगंज १५ संक्रमितांसह कोरोनाचे नवे हॉटस्पॉट बनले आहेत. या सर्व कंटेनमेंटमध्ये आरोग्य पथकांचे सर्वेक्षण सुरू आहे. हे सर्वेक्षण अधिक कार्यक्षम होण्यासाठी पथकांजवळ सध्या ५० पल्स ऑक्सिमीटर मशीन देण्यात आल्या असल्याचे महापालिकेचे वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. विशाल काळे यांनी सांगितले. याव्यतिरिक्त आणखी १०० मशीन बोलावण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.बरेचदा रुग्णांना श्वास घेण्यास त्रास होतो. मात्र, त्यांच्याकडून लक्षणे लपविली जातात. अशावेळी या मशीनद्वारे चाचपणी केली जाऊ शकते. रक्तात ऑक्सीजन कॅरी करण्याची क्षमता ही १०० टक्के असते. मात्र, आॅक्सीजन सॅच्युरेशनचे प्रमाण ९५ टक्क्यांपेक्षा कमी झाल्यास ही धोक्याची सूचना समजून उपाययोजना करता येऊ शकतात. याविषयीची माहिती पथकाला ‘ऑन दी स्पॉट’ मिळू शकते. कोरोनामध्ये रक्तातील ऑक्सीजन सॅच्युरेशन कमी होते. या लक्षणामुळेही हायरिस्कचे रुग्ण ओळखता येऊन वेळीच उपाययोजना करता येऊ शकतात, असे डॉ. काळे यांनी सांगितले.वाढत्या रुग्णसंख्येत काही क्रिटिकल असल्याने आता ऑक्सीजन बेडची संख्यादेखील वाढविण्यात येत आहे. सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये सध्या ३० बेडची व्यवस्था आहे. येथे आणखी १० बेड वाढविण्यात येणार आहेत. डॉ. पंजाबराव देशमुख वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात २० ऑक्सीजन बेड आहेत तसेच जिल्हा ग्रामीणमध्ये तिवसा, अचलपूर, नांदगाव खंडेश्वर, दर्यापूर येथेही ५ ते १० बेडची व्यवस्था असल्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले.शहरात १५०, ग्रामीणमध्ये २०० मशीनमोबाइल हँडसेटच्या एक चतुर्थांश आकाराची ही मशीन सर्वेक्षणादरम्यान पथकासाठी महत्त्वपूर्ण आहे. बरेचदा सर्वेक्षणादरम्यान कुटुंबातील काही व्यक्ती त्यांना असणारा त्रास व लक्षणे लपवितात. अशावेळी बोटाला ही मशीन लावून त्या व्यक्तीच्या रक्तातील आॅक्सीजनच्या सॅच्युरेशनचे प्रमाण तपासता येऊ शकते. याद्वारे संशयित रुग्णांची माहिती मिळू शकते. महापालिका क्षेत्रासाठी १५०, तर जिल्हा ग्रामीणसाठी २०० मशीन उपलब्ध करण्यात येणार आहेत. १४५० रुपये किमतीची ही मशीन असल्याचे जिल्हाधिकारी म्हणाले.हायरिस्क भागातील आरोग्य पथकांजवळ आता पल्स ऑक्सिमीटर ही मशीन देण्यात येणार आहे. याद्वारे कोरोना संक्रमित व्यक्तींवर त्वरेने उपचार करता येतील. महापालिका क्षेत्रात १५० व जिल्हा ग्रामीणमध्ये २०० मशीन उपलब्ध करण्यात येणार आहेत.- शैलेश नवाल, जिल्हाधिकारीहाताच्या बोटांना लावता येणारी ही छोटी मशीन आहे. याद्वारे व्यक्तीच्या रक्तामधील ऑक्सिजन सॅच्युरेशनचे प्रमाण ओळखता येऊ शकते. कोरोनाचे या संकटकाळात संक्रमित रुग्ण ओळखून त्यांच्यावर त्वरेने उपचार करता येऊ शकतात.- डॉ. विशाल काळेवैद्यकीय आरोग्य अधिकारी.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या