शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
3
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
4
घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
5
बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
6
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
7
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
8
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
9
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
10
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
11
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
12
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपडेट? पटापट चेक करा
13
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
14
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
15
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
16
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
17
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
18
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
19
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
20
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
Daily Top 2Weekly Top 5

नैसर्गिक आपदग्रस्तांना आता ६ हजारांपर्यंत मदत, एसडीआरएफचे नवे निकष

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 28, 2018 19:31 IST

केंद्र शासनाच्या नैसर्गिक आपत्ती निकषाच्या धर्तीवर नैसर्गिक आपत्तीमुळे बाधित होणा-या आपदग्रस्तांना द्यावयाच्या मदतीच्या दरात सुधारणा करण्यात आली आहे.

अमरावती : केंद्र शासनाच्या नैसर्गिक आपत्ती निकषाच्या धर्तीवर नैसर्गिक आपत्तीमुळे बाधित होणा-या आपदग्रस्तांना द्यावयाच्या मदतीच्या दरात सुधारणा करण्यात आली आहे. त्याबाबतचा आदेश महसूल व वनविभागाने २५ जानेवारीला जारी केला आहे. राज्यात नैसर्गिक आपत्तीच्या घटनांमध्ये बाधित व्यक्तींना मदत देण्याकरिता केंद्र व राज्य शासनाने संयुक्तपणे राज्य आपत्ती प्रतिसाद निधीची अर्थात स्टेट डिझॉस्टर रिस्पॉन्स फंड एसडीआरएफची स्थापना करण्यात आली. त्यात सन २०१५ ते २०२० या कालावधीकरिता मदतीच्या दराचे सुधारित निकष निश्चित केलेत. त्यामधील काही बाबीत सुधारणा करण्यात आल्या आहेत.नैसर्गिक आपत्तीमध्ये दोन दिवसांपेक्षा अधिक कालावधीपर्यंत क्षेत्र पाण्यात बुडाले असल्यास किंवा घरे पूर्णत: वाहून गेल्यास वा पूर्णत: क्षतिग्रस्त झाल्यास त्या कुटुंबांना प्रतिकुटुंब २५०० रुपये व घरगुती भांडी व वस्तू नुकसानीसाठी २५०० रुपये मिळणार आहेत. अंशत: पडझड झालेल्या घरांच्या नुकसानरपाईमध्येही सुधारणा करण्यात आली आहे. पक्या व कच्चा घरांची १५ टक्के पडझड झाली असल्यास प्रतिघर ६ हजार रुपये मिळणार आहेत. याशिवाय पडझड वा नष्ट झालेल्या झोपडीधारकाला प्रतिझोपडी ६ हजार रुपये मदत मिळेल.राज्य शासनाच्या सक्षम प्राधिका-याने बाधित झालेले घर हे अधिकृत असल्याचे प्रमाणित करणे आवश्यक असेल. याशिवाय बाधित झालेल्या झोपडीधारकाला मदत देण्यापूर्वी राज्य व जिल्हास्तरीय अधिका-यांनी झोपडे म्हणून प्रमाणित करणे अनिवार्य केले आहे.