शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
2
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
3
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
4
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
5
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
6
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
7
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
8
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
9
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
10
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
11
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
12
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
13
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
14
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
15
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
16
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
17
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
18
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
19
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
20
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
Daily Top 2Weekly Top 5

अमरावती शहरात खासगी डॉक्टरांना बजावल्या नोटिशी

By admin | Updated: April 3, 2015 23:54 IST

महापालिका हद्दीत वैद्यकीय व्यवसाय करणाऱ्या खासगी डॉक्टरांनी निवासी वापरात बदल केल्याप्रकरणी ४० टक्के

एसडीओची कारवाई : निवासी वापरात बदल करण्याचे कारणअमरावती : महापालिका हद्दीत वैद्यकीय व्यवसाय करणाऱ्या खासगी डॉक्टरांनी निवासी वापरात बदल केल्याप्रकरणी ४० टक्के दंडात्मक रक्कम वसूल करण्यासाठी उपविभागीय अधिकाऱ्यांनी नोटिसी बजावल्या आहेत. सात दिवसांच्या आत ही रक्कम शासन तिजोरीत जमा करण्यात आली नाही तर हॉस्पिटलला टाळे लावले जाईल, असे महसूल विभागाने कळविले आहे. मात्र, ही बाब नियम विसंगत असल्याचे कारण पुढे करुन शुक्रवारी इंडियन मेडिकल असोशियनच्या पदाधिकाऱ्यांनी पालकमंत्री प्रवीण पोटे यांची भेट घेऊन शहरातील खासगी डॉक्टरांनी कैफियत मांडली.पालकमंत्री प्रवीण पोटे यांना दिलेल्या निवेदनात असोशिएशनचे अध्यक्ष वसंत लवणकर, चंद्रशेखर कुळकर्णी यांनी शासन निर्णय क्र. जमीन २४९९/ प्र. क्र.१२५/ज-८ मंत्रालय, मुंबई दि.२८/१२/२०११ च्या निर्णयानुसार महापालिका हद्दीतील डॉक्टरांनी विनापरवानगीने निवासी वापरात बदल केल्याने एकतर्फी कारवाईचा निर्णय घेतला आहे. अवाजवी दंडाची आकारणी करुन ती सात दिवसाांत शासनकडे जमा करण्याबाबत कळविले आहे. याला अनुसरुन काही डॉक्टरांवर दंडात्मक कारवाई केल्याचा आरोप इंडियन मेडिकल असोशिएशनचे अध्यक्ष वसंत लवणकर यांनी केला आहे. शासन निर्णयानुसार महापालिकेतून डॉक्टरांनी बांधकाम परवानगी ही निवासी घेतली होती. कालांतराने या निवासस्थानी वैद्यकीय व्यवसाय सुरु केला आहे. निवासी वापरात बदल करण्याची कारवाई ही डॉक्टरांवर लागू होत नाही. त्यामुळे विनापरवागीने वापरात बदल केल्याप्रकरणी ४० टक्के दंडात्मक रक्कम वसूल करणे संयुक्तिक नाही. सर्वोच्च न्यायालय, उच्च न्यायालयाने प्रकाशित केलेल्या न्यायसंगत बाबीत हे स्पष्ट केले आहे. त्यामुळे कारवाई थांबविली नाही तर डॉक्टर रस्त्यावर येतील.- वसंत लवणकर, अध्यक्ष, आय.एम.एवैद्यकीय व्यवसाय करणाऱ्या खासगी डॉक्टरांना शासन नियमानुसारच नोटीस बजावल्या आहेत. एसडीओ म्हणून शासन निर्णयाची अंमलबजावणी करणे कर्तव्य आहे. निवासी वापरात बदल केल्याप्रकरणी ही कारवाई आहे. महसूल वाढीसाठीचे हे प्रयत्न असून शासन निर्णयानुसारच खासगी डॉक्टरांना नोटीस दिल्या आहेत.-प्रवीण ठाकरे, उपविभागीय अधिकारी, अमरावती.