शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Rain: मुंबईत काही तासांत ८६ मिमी पावसाची नोंद; पडझडीमुळे ३ जखमी 
2
एका विमानात तांत्रिक दोष, दुसऱ्याला बॉम्बची धमकी!
3
Bombay HC: लाज वाटली पाहिजे, ११ वर्षांपासून...; मानखुर्द बालगृहातील पार्टीबद्दल हायकोर्टाचा संताप!
4
नालेसफाई भ्रष्टाचार: तीन अभियंत्यांवर ठपका, ठेकेदार पुरोहित काळ्या यादीत 
5
Maharashtra Weather: कुठे ऊन तर कुठे पाऊस? राज्यात पावसाच्या दाेन तऱ्हा!
6
Census 2027: जनगणनेचा खर्च १३ हजार कोटी, तुम्हाला विचारले जाणार ३६ प्रश्न
7
तुटलेल्या विद्युत वाहिनीच्या स्पर्शाने दोन शेतकऱ्यांचा मृत्यू; महावितरण विरोधात चिकलठाण्यात रास्ता रोको
8
इस्रायलकडून इराणी टीव्ही स्टुडिओवर क्षेपणास्त्र हल्ला, लाईव्ह बुलेटीन सोडून अँकरने काढला पळ!
9
खुल्लम खुल्ला रोमान्स पडला महागात! बाईकच्या टाकीवर गर्लफ्रेंडला बसवणाऱ्या तरुणाला 'इतका' दंड
10
रांचीला जाणारे एअर इंडियाचे विमान टेक ऑफनंतर दिल्लीला परतले! नेमके झाले तरी काय?
11
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
12
सोनमच्याही एक पाऊल पुढे निघाली गुलफाशा; प्रियकरासोबत मिळून लग्नाच्या एक दिवस आधीच पतीला संपवलं!
13
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
14
सायप्रसच्या महिला खासदाराने PM मोदींचे चरणस्पर्श केले, पंतप्रधानांनी डोक्यावर हात ठेवत दिला आशीर्वाद
15
दहा कोटी वृक्ष लावगडीचे उद्दिष्ट; वन विभाग ‘साइट ट्रॅक’वर, रेशीमला झुकते माप
16
आता पाकिस्तान अणुबॉम्बची धमकी देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल...! SIPRI च्या अहवालात भारताच्या अण्वस्त्रांसंदर्भात मोठा दावा
17
Viral Video : रीलसाठी जीवाशी खेळ; धबधब्यावर उभी राहिली तरुणी, पुढे जे झालं ते बघून चुकेल काळजाचा ठोका
18
"माझाही राजा रघुवंशी झाला असता"; गोव्याला जाताना पत्नीसमोर मारहाण, पतीने सांगितली आपबिती
19
बाप म्हणाला चिंता आहे, मुलगी म्हणाली मी आहे! ३ एकरांत सोयाबीन लावून मुलीची बापाला साथ

फसव्या जाहिरातीमुळे अमरावतीतून सात दूरचित्रवाणी वाहिन्या अन् इंदूरच्या कंपनीला नोटीस 

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 24, 2017 17:14 IST

जर तुम्ही टकलामुळे त्रस्त असाल, तर आमच्या कंपनीचे प्रॉडक्ट वापरा आणि रिझल्ट पाहा, असा संदेश देणा-या जाहिराती मनोरंजन करणा-या दूरचित्रवाणी वाहिन्यांवर झळकत असतात.

वैभव बाबरेकरअमरावती : जर तुम्ही टकलामुळे त्रस्त असाल, तर आमच्या कंपनीचे प्रॉडक्ट वापरा आणि रिझल्ट पाहा, असा संदेश देणा-या जाहिराती मनोरंजन करणा-या दूरचित्रवाणी वाहिन्यांवर झळकत असतात. या जाहिराती ड्रग्ज अँड मॅजिक रेमेडीज अ‍ॅक्ट १९५४ चे उल्लंघन असल्याचे बजावत अन्न व औषधी प्रशासन (एफडीए) च्या अमरावती कार्यालयाने सात टीव्ही वाहिन्या आणि इंदूर येथील कंपनीच्या संचालकाला नोटीस पाठवली आहे. त्यांच्याविरोधात सातत्याने लोकांच्या तक्रारी येत होत्या.

ठरावीक वयात टक्कल पडणे हे स्वाभाविक आहे. याशिवाय त्याला आनुवांशिक कारणेही जबाबदार असतात. तथापि, यावर उपाय म्हणून आमच्याकडे मॅजिकल रेमेडी आहे आणि त्याचे भरपूर चांगले रिझल्ट दिसून येतील, असा दावा करीत फिरणा-या जाहिराती टीव्ही वाहिन्यांवर सातत्याने प्रसारित होत असतात. त्यामध्ये एखाद्या चमत्काराप्रमाणे टकलावर केस उगवलेले दाखविले जाते.

वास्तविक, केस पुन्हा प्राप्त करण्यासाठी काही प्रक्रिया  असू शकतील, मात्र त्यामध्ये एवढ्या झटपट केस उगवू शकत नाहीत, हे कुणीही सांगू शकेल. त्यामुळे अशा फसव्या जाहिरातींचे प्रसारण रोखले जावे, अशा मागण्या वेळोवेळी एफडीए कार्यालयाला प्राप्त होत आहे. त्याच्या अनुषंगाने इंदूर येथील सदर कंपनी व टकलावरील इलाजाच्या जाहिराती प्रसारित करणा-या सात कंपन्यांना याच महिन्यात नोटीस पाठविण्यात आली आहे. 

सदर जाहिरातींचे प्रसारण हे ड्रग्ज अँड मॅजिक रेमेडीज अ‍ॅक्ट १९५४ चे उल्लंघन आहे. त्यामुळे अमरावती कार्यालयाने वाहिन्यांसह इंदूर येथील उत्पादकाला नोटीस पाठवून स्पष्टीकरण मागितले आहे. त्यानंतर पुढील कार्यवाही केली जाईल.- पी.एन. शेंडेसहआयुक्त (औषध)अन्न औषध प्रशासन, अमरावती