शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
3
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
4
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
5
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
6
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
7
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
8
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
9
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
10
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
11
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
12
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
13
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
14
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
15
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
16
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
17
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
18
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
19
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
Daily Top 2Weekly Top 5

लसीकरण झाले म्हणून बिनधास्त नाही; गत आठवड्यात सात जणांना कोविडची बाधा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 25, 2021 05:00 IST

ओमायक्रॉनने हळूहळू पाय पसरण्यास सुरुवात केली आहे. कोविड अजूनही गेला नाही. मात्र, नागरिक सैराटपणे वागत असल्याचे दिसून येते. हीच स्थिती कायम राहिल्यास कोविडचा मोठ्या प्रमाणात फैलाव होईल, असे संकेत आरोग्य विभागाने दिले आहे. गत काही दिवसांपूर्वी अमरावतीत आलेल्या विदेशी नागरिकांपैकी तिघांमध्ये डेल्टा प्लस आढळून आले आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : लसीचे दोन्ही डोस झाले म्हणून बिनधास्त वावरत असाल तर हा गैरसमज आहे. गत आठवड्यात दोन्ही डोस घेतलेल्या सात जणांना कोविडची लागण झाल्याचे उघड झाले आहे. डेल्टा प्लस, ओमायक्रॉनचे संकट कायम असून, सायमनटेनस डोके वर काढत असल्याचा दावा तज्ज्ञांचा आहे.ओमायक्रॉनने हळूहळू पाय पसरण्यास सुरुवात केली आहे. कोविड अजूनही गेला नाही. मात्र, नागरिक सैराटपणे वागत असल्याचे दिसून येते. हीच स्थिती कायम राहिल्यास कोविडचा मोठ्या प्रमाणात फैलाव होईल, असे संकेत आरोग्य विभागाने दिले आहे. गत काही दिवसांपूर्वी अमरावतीत आलेल्या विदेशी नागरिकांपैकी तिघांमध्ये डेल्टा प्लस आढळून आले आहे. या सर्व विदेशी नागरिकांनी कोरोना प्रतिबंध लसींचे दोन्ही डोस घेतले असून, त्यांच्याकडे प्रमाणपत्रदेखील आहे. या विदेशी नागरिकांमध्ये स्लाईस म्युट्रिसेशन निदर्शनास आले आहे. कोरोना नियमावलींचे पालन करावे, असे आवाहन जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. श्यामसुंदर निकम यांनी केले आहे. जिल्हा प्रशासनाने ओमायक्राॅनच्या पार्श्वभूमिवर शंभर टक्के लसीकरण करण्याचा ध्यास घेतला आहे. त्या अनुषंगाने आरोग्य यंत्रणा, महापालिका, जिल्हा प्रशासन युद्धस्तरावर प्रयत्न करीत आहेत. गावखेड्यात घरोघरी जाऊन लसीकरण केले जात आहे.

गर्दी टाळा, नियम पाळाकोविड अजूनही गेला नाही. दर दोन ते तीन दिवसांनी जिल्ह्यात कोरोनाचे रुग्ण आढळून येत आहेत. या रुग्णांमध्ये डेल्टा प्लसची लक्षणे असल्याने ते भविष्यासाठी धोकादायक ठरणारे आहे. त्यामुळे  लसींचे दोन्ही डोस घेतले असले तरी जिल्हा प्रशासनाने आखून दिलेल्या नियमांचे पालन करावे लागेल. गर्दी होणार नाही, याची काळजी सामूहिकपणे घेणे काळाची गरज आहे. अन्यथा ओमायक्रॉन वाढण्याची दाट भीती असल्याचे आरोग्य यंत्रणेचे म्हणणे आहे. 

ओमायक्रॉन हा घातक आहे. सावधगिरी बाळगावी लागेल. दोन्ही लसीचे डोस घेतले म्हणून बिनधास्त वावरणे हे चुकीचे ठरेल. कोविड नियमावलींचे पालन केले नाही तर याचे गंभीर परिणाम भोगावे लागतील.- डॉ. पी. व्ही.ठाकरे, नोडल अधिकारी, फॅबलॅब अमरावती विद्यापीठ.

 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या