शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण-इस्रायल युद्धात दोन गटात विभागलं केलं जग? रशियानंतर आता चीनचीही 'एन्ट्री', भारताची भूमिका काय?
2
Vivek Lagoo: ज्येष्ठ अभिनेते विवेक लागू यांचं निधन, रंगभूमीवरचा शिस्तप्रिय नट हरपला
3
IND vs ENG : गिलनं दिला 'ब्लू प्रिंट'चा दाखला; 'लगान' वसूल करण्यासाठी रोहित-विराटचाही घेतलाय सल्ला
4
“आम्ही कट्टर देशाभिमानी हिंदू, भ्रष्ट भाजपावाले घरोघरी ‘सिंदूर’ वाटणार होते”: उद्धव ठाकरे
5
जाईन गे माये तया पंढरपुरा, भेटेन माहेर आपुलिया! अलंकापुरीतून माऊलींच्या पालखीचे वैभवी प्रस्थान
6
साताऱ्यातील पर्यटनस्थळांवर १९ ऑगस्टपर्यंत निर्बंध; धबधब्यांसह कास पठार, महाबळेश्वरमधील स्थळे अन् धरणांचाही समावेश
7
"महाराष्ट्रात हिंदी लादल्यास रस्त्यावर उतरू", मराठी अस्मितेसाठी उद्धव ठाकरेंचा एल्गार
8
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दिबांचे नाव लवकरात लवकर द्या, सर्वपक्षीय कृती समितीची मागणी
9
"आपला मेळावा बाळासाहेबांच्या विचारांचा, तर दुसरा..."; एकनाथ शिंदेंचा जोरदार हल्लाबोल
10
ऑपरेशन सिंधू: भारत सरकार इस्रायलमधील भारतीयांना परत आणणार! कशी करता येणार नोंदणी? जाणून घ्या
11
“पहलगाम हल्लातील दहशतवादी आकाशात गेले, पाताळात गेले की भाजपात गेले?”; ठाकरेंचा बोचरा सवाल
12
"पाकिस्तानात ठेवलं जाणार इराणचं अण्वस्त्र साहित्य?"; ट्रम्प यांनी मुनीर यांना नेमकं का जेवायला बोलावलं? सगळं विचित्रच...!
13
"अमेरिकेनं इस्रायलला थेट लष्करी मदत केली तर..." आता इराण-इस्रायल युद्धात रशियाची 'एन्ट्री'; दिली खुली धमकी!
14
आरोपांची उठली राळ, मंत्री संजय शिरसाटांचा इम्तियाज जलीलांविरोधात कायदेशीर पलटवार
15
सोनम आणि राज कुशवाह यांना दिलासा नाही, न्यायालयाने पोलीस कोठडीत केली वाढ!
16
ऑपरेशन सिंदूर: मोदींनी अमेरिकेच्या न झालेल्या ५१ व्या राज्यात जाऊन सुनावले, ट्रम्प वठणीवर आले...
17
मेहुणीवर जीव जडला, प्रेमाच्या मर्यादा ओलांडल्या, प्रेग्नंट झाल्याचं कळताच केलं कांड!
18
देशातील सर्वात महागडा टीव्ही ३० लाखांना विकला गेला; कंपनीचे नाव पाहून तुम्ही म्हणाल...
19
परदेशातून २ किलो सोनं घेऊन आला, विमानातच सोडून बाहेर पडला! पुढे जे झालं ते ऐकून व्हाल हैराण
20
होणाऱ्या १८ वर्षीय सुनेच्या प्रेमात पडला ५५ वर्षीय सासरा, केलं लग्न; आता म्हणतो, "या जन्मात..."

कायमविना अनुदानित शाळांच्या मुख्याध्यापकांना मान्यता नाही

By admin | Updated: July 17, 2014 23:50 IST

शिक्षण विभागाने कायम अनुदानित इंग्रजी माध्यमांच्या प्राथमिक शाळांना दिलेल्या परवानगीनुसार जिल्ह्यातील १५६ शाळांतील मुख्याध्यापकांना मान्यता नाही. हा सर्व प्रकार संस्थाचालक

अमरावती : शिक्षण विभागाने कायम अनुदानित इंग्रजी माध्यमांच्या प्राथमिक शाळांना दिलेल्या परवानगीनुसार जिल्ह्यातील १५६ शाळांतील मुख्याध्यापकांना मान्यता नाही. हा सर्व प्रकार संस्थाचालक आणि शिक्षणाधिकाऱ्यांच्या संगनमताने होत असल्याचा आरोप मनसेचे उपजिल्हाप्रमुख राहुल कडू यांनी गुरुवारी येथे पत्रपरिषेदेत केला.कडू यांनी दिलेल्या माहितीनुसार, इंग्रजी माध्यमांच्या कायम अनुदानित शाळांनी प्रवेशाकरिता पालकांची एकिकडे लूट चालविली असून या शाळांवर असलेल्या मुख्याध्यापकांना मान्यता घेण्यात आली नाही. त्यामुळे या मुख्याध्यापकांच्या स्वाक्षरीने दिले जाणारे शाळा सोडल्याचे प्रमाणपत्रसुध्दा नियमबाह्य आहे. विद्यार्थ्यांच्या प्रवेशादरम्यान पालकांकडून मोठी रक्कम मागण्यासाठी मुख्याध्यापकांना संस्थाचालक पुढे करीत आहेत. मात्र या मुख्याध्यापकांना शिक्षण विभागाकडून मान्यता का घेत नाही, असा सवाल त्यांनी उपस्थित केला. आरटीई कायद्यानुसार शाळेतील प्रत्येक बाबीला मुख्याध्यापकांना जबाबदार धरण्याचे शासनाने निश्चित केले आहे. त्यामुळे शाळेत एखादी अप्रिय घटना घडल्यास त्याला कोण जबाबदार राहील, हे शिक्षण विभागाने स्पष्ट करावे, अशी मागणी त्यांनी केली. कायम विना अनुदानित इंग्रजी माध्यमांच्या प्राथमिक शाळांमध्ये मुख्याध्यापक व शिक्षकांना रीतसर मान्यता घेऊन त्यांना शिक्षण कायद्यानुसार वेतन, सोयी सुविधा प्रदान कराव्यात अन्यथा संस्था चालकांविरुध्द आंदोलन केले जाईल असा इशारा देण्यात आला आहे. पत्रपरिषदेला अजय शेळके, हनुमंत गाडगे, अनिल गायकवाड, गोपाल बायस्कर, हर्षद पाटील उपस्थित होते.