शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
4
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
5
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
6
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
7
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
8
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
9
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
10
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
11
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
12
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
13
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
14
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
15
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
16
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
17
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
18
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
19
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
20
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
Daily Top 2Weekly Top 5

खते, बियाणांत फसवणूक झाल्यास अजामीनपात्र गुन्हा

By admin | Updated: June 14, 2016 00:04 IST

यावर्षी मान्सूनचा अंदाज चांगला असल्याने खरीप हंगामात मोठ्या प्रमाणात पेरणी होणार असून.

पालकमंत्र्यांचे निर्देश : जिल्हाधिकारी कार्यालयात आढावा बैठक अमरावती : यावर्षी मान्सूनचा अंदाज चांगला असल्याने खरीप हंगामात मोठ्या प्रमाणात पेरणी होणार असून शेतकऱ्यांना चांगल्या प्रतीचे बियाणे व खते पुरेशे उपलब्ध करून द्यावे तसेच खते व बियाणात शेतकऱ्यांची फसगत करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याचे निर्देश पालकमंत्री प्रवीण पोटे यांनी दिले आहे. विक्रेत्यांनी बोगस बियाणे, खते कीटकनाशक विकून शेतकऱ्यांना कर्जबाजारी केले. याला आळा घालण्यासाठी बोगस बियाणे, खते विके्रत्यांवर व कंपन्यावर थेट फौजदारीसह अजामिनपात्र गुन्हा नोंदविण्याचा इशारा पालकमंत्र्यांनी दिला.जिल्हाधिकारी कार्यालयात कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांसोबत पालकमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली सोमवारी आढावा बैठक ते बोलत होते. निसर्गाच्या अवकृपेने हवालदिल झालेल्या शेतकऱ्यांना मदत करून जोमाने उठविण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे पालकमंत्र्यांनी स्पष्ट केले. परंतु काही बोगस खते, औषधे आणि बियाण्यांच्या कंपन्या, पुरवठादार, दुकानदार, दलालांची साखळी यात शेतकऱ्यांची फसवणूक करतात. या पार्श्वभूमिवर उत्पादक, पुरवठादार आणि विक्रेत्यांनाच लगाम लावण्याचे ना.पोटे यांनी स्पष्ट केले. संबंधित अधिकाऱ्यांना नियमित तपासणी करून दोषींवर कारवाईचे आदेश त्यांनी अधिकाऱ्यांना दिले. हयगय करणाऱ्या अधिकाऱ्यांच्या विरोधात कडक कारवाई करण्यात येईल, असे पालकमंत्र्यांनी सांगितले. बियाणे किंवा खतांची विक्री करताना लिंकिंगच्या नावाखाली अनावश्यक बाबी शेतकऱ्यांच्या माथी मारल्या जातात. यंदाच्या खरीप हंगामात असे प्रकार टाळण्यासाठी जिल्ह्यातील सर्व कृषी सेवा केंद्रांना बियाणे, खते व कीटकनाशकांचा उपलब्ध साठा, त्याची किंमत दर्शविणारा फलक दुकानाबाहेर लावण्याची सक्ती करण्याच्या सूचना पालकमंत्र्यांनी दिल्या. बियाणे, खतांची साठेबाजी व काळाबाजार रोखण्यासाठी प्रत्येक तालुक्यात कृषी विभागामार्र्फत विशेष पथक स्थापन करण्याच्या सूचना त्यांनी दिल्यात. दुकानदार, कंपन्यांवर चौकशी करून फौजदारी स्वरूपाची कारवाई करण्याचा इशारा पालकमंत्री प्रवीण पोटे यांनी दिला आहे. (प्रतिनिधी)बियाणे, खते खरेदीच्या पावत्या सांभाळून ठेवायावर्षी शेतकऱ्यांनी बियाणे खते खरेदीच्या पक्क्या पावत्या, बियाणांच्या थैल्या सांभाळून ठेवाव्यात व काही तक्रार असल्यास शेतकऱ्यांकडे असलेले पुरावे कृषी अधिकाऱ्यांनी जमा करावेत. सर्व कागदपत्रांसह संबंधित कंपनीच्या विरोधात कडक कारवाई करता येईल, असे आदेशही पालकमंत्र्यांनी बैठकीतील उपस्थित अधिकाऱ्यांना दिले